चेतनेची उत्क्रांती
श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभाभूत विचार म्हणजे चेतनेची उत्क्रांती.
मूळ सच्चिदानंद ब्रह्मापासून चेतना अंतर्लीन होत गेली - तिचे अवरोहण झाले (involution)आणि सृष्टीची निर्मिती झाली. पुन्हा तिचे आरोहण होऊन ती आपल्या मूळ स्वरूपाकडे चालली आहे. चेतनेची उत्क्रांती (evolution) समजावून घेण्यासाठी आरोहण आणि अवरोहण या दोन संज्ञादेखील महत्त्वाच्या आहेत.
निसर्गामध्ये पुढील क्रमाने चेतनेची उत्क्रांती झाली आहे असे ते म्हणतात.[१] पंचकोश म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते यातील एकेक टप्प्याशी निगडीत आहेत.[२]
क्र | तिरोधान क्रम
(involution) |
चेतनेचा स्तर | विकासक्रम
(evolution) |
इंग्रजी संज्ञा | कोश |
---|---|---|---|---|---|
०१ | सत | (Truth) | |||
०२ | चित | (Consciousness) | |||
०३ | आनंद | (Bliss) | आनंद कोश | ||
०४ | अतिमानस | (Supramental Consciousness) | विज्ञान कोश | ||
०५ | अधिमानस | (Overmind) | |||
०६ | अंतर्ज्ञानात्मक मन | (Intuitive Mind) | |||
०७ | प्रदीप्त मन | (Illumind Mind) | |||
०८ | उच्च मन | (Higher Mind) | |||
०९ | भौतिक मन | (Physical Mind) | मनोमय कोश | ||
१० | प्राण | (Vital) | प्राणमय कोश | ||
११ | जडभौतिक / शरीर | (Physical) | अन्नमय कोश |
चेतनेची उत्क्रांती - श्रीअरविंदकृत मांडणी
[संपादन]''प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे.
त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे.
अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.
मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी 'अतिमानस' (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वतःमध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.'' - श्रीमाताजी.[३]
डार्विनची उत्क्रांतीची संकल्पना
[संपादन]डार्विनची उत्क्रांतीची संकल्पना आणि श्रीअरविंद यांची उत्क्रांतीची संकल्पना यामध्ये मूलभूत फरक आहे. [४]
पूरक[edit]
[संपादन]०१) अतिमानस उत्क्रांतीची झेप - भाग ०१
०२) मानवी विकासक्रम
संदर्भ
[संपादन]- ^ डॉ.ग.ना.जोशी (१९८२). श्रीअरविंदांचे तत्त्वचिंतन. पुणे: पुणे विद्यापीठ. pp. १०८-१८८.
- ^ वा.ना.अभ्यंकर (२००१). पंचकोश विकासानातून शिक्षण. पुणे: ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.
- ^ The Mother (1978). COLLECTED WORKS OF THE MOTHER - Vol 12. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 116. ISBN 81-7058-670-4.
- ^ Sri Aurobindo (2012). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 28. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 273.