Jump to content

पवित्र (फिलीप बार्बियर सेंट हिलरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री. पवित्र (जन्म १६ जानेवारी १८९४ – मृत्यु १६ मे १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire) श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे हे पहिले फ्रेंच शिष्य होते. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

ते पॅरिस-निवासी होते. शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते.

१९१४ मध्ये पॅरिसमधील पॉलिटेक्निक स्कूलमधून पदवी प्राप्त केली. मग ते अधिकारी म्हणून पहिल्या जागतिक-युद्धामध्ये सहभागी झाले. युद्धानंतर त्यांनी पॅरिसमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयात काम केले.

गूढवादात रस असल्याने झेन बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते १९२० साली जपानला रवाना झाले. १९२४ मध्ये त्यांनी जपान सोडले आणि उत्तर चीन आणि मंगोलियातील मठांमध्ये तिबेटी लामांसोबत काळ व्यतीत केला. []

श्रीअरविंद आश्रमातील कार्य

[संपादन]
  • झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून १९२५ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. श्रीअरविंद आश्रमाच्या उभारणीच्या काळापासून पुढे चार दशके ते आश्रमाच्या विविध कार्यामध्ये सहभागी होते.
  • अभियंता असल्याने त्यांनी वीज व यंत्रांशी निगडित अनेक कामे केली. त्यांनी आश्रमाच्या पहिल्या स्वयंचलित वाहनांच्या कर्मशाळेची उभारणी केली.
  • त्यांनी सुगंधी द्रव्यांच्या निर्मितीसाठी प्रयोगशाळा तयार केली.
  • अनेक वर्षे ते श्रीमाताजींचा परदेशी व्यक्तींसोबतचा पत्रव्यवहार सांभाळत होते.
  • नव्याने स्थापन केलेल्या श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर (नंतरचे नाव - श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन) च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी १८ वर्षे सांभाळली. श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'फ्री प्रोग्रेस' शिक्षणपद्धती विकसित करण्यात हातभार लावला. येथे त्यांनी पहिली रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र प्रयोगशाळा उभारली.[]
  • या शाळेच्या बुलेटिन नावाच्या द्वैभाषिक नियतकालिकामधील फ्रेंच विभागाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती.[]
  • ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी होते.

अन्य कार्य

[संपादन]
  • पाँडिचेरीच्या गव्हर्नर-हाउस समोरील सेन्ट्रल पार्कच्या उभारणीमध्ये सहभाग. []

'पवित्र' नावाविषयी

[संपादन]

फिलीप यांना पवित्र हे टोपणनाव श्रीअरविंद यांनी दिले होते. []

ग्रंथसंपदा

[संपादन]
  • Le message de Sri Aurobindo et son ashram - फ्रेंच (१९४७) आणि इंग्रजी
  • Education and the Aim of Human Life (१९६१)
  • The Future Evolution of Man (१९६३) - श्रीअरविंद यांच्या साहित्याच्या संकलनाच्या आधारे लिहिण्यात आले.
  • Sri Aurobindo and The Mother on Love (१९६६) - श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आणि संवादाच्या आधारे लिहिण्यात आले.
  • Le yoga de la Bhagavad Gita (१९६९) - श्रीअरविंद कृत 'एसेज ऑन गीता'चा फ्रेंच सारांश []
  • Conversations with Sri Aurobindo (२००७)
  • On Meditation and Discipline - ISBN: 81-7058-696-8.
  • रशियन आणि स्पॅनिश भाषेत त्यांच्या निवडक पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Pavitra". www.searchforlight.org. 2023-05-25 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Pavitra (Philippe Barbier Saint Hilaire) (2007). Conversations with Sri Aurobindo. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 978-81-7058-879-5.
  3. ^ "The Incarnate Word". incarnateword.in. 2023-10-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Personalia / Pavitra". sri-aurobindo.co.in. 2023-05-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Personalia / Pavitra". sri-aurobindo.co.in. 2023-05-25 रोजी पाहिले.