Jump to content

तारा जौहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारा जौहर

तारा जौहर (जन्म ०५ जुलै १९३६)[] - वास्तव्य - दिल्ली.

भारतातील एक लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी आपले जीवन योगी श्रीअरविंद घोष आणि श्रीमाताजी यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी समर्पित केले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत.

बालपण

[संपादन]

तारा जौहर या श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेच्या अध्यक्षा आहेत. या आश्रमाची स्थापना त्यांचे वडील सुरेंद्र नाथ जौहर यांनी सन १९५६ मध्ये केली होती. श्री सुरेंद्र नाथ जौहर स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले होते, त्यांना त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती. सन १९३९ पासून ते श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित होते, त्यामुळे तारा जौहर आणि त्यांची भावंडे यांचे शिक्षण पुडुचेरी येथेच झाले. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे १९४४ मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमामध्ये आल्या आणि पुढे ३० वर्षे त्या तेथेच होत्या. त्यांना श्रीमाताजींचा निकट सहवास सुमारे तीस वर्षे लाभला होता.

जीवन व कार्य

[संपादन]
  • श्रीमाताजी साधकांसाठी अभ्यासवर्ग चालवीत असत, या वर्गांमध्ये तारा जौहर प्रश्न, शंका विचारून त्यांना बोलते करत असत. सन १९५९ ते १९७३ दरम्यानचा त्यांचा संवाद Growing up with The Mother या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्याचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.[]
  • श्रीमाताजी यांची तारा जौहर यांनी १०००० पेक्षा अधिक छायाचित्रे काढली होती, त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले आहे.[]
  • पुडुचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात शारीरिक शिक्षणाला बरेच महत्त्व आहे. तेथे शारीरिक शिक्षणाचे धडे घेऊन, नंतर त्या आश्रमातील शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका बनल्या. []
  • दिल्ली येथील श्रीअरविंद आश्रमाच्या ४० वर्षांहून अधिक काळ त्या मुख्य विश्वस्त आहेत.
  • द मदर्स इंटरनॅशनल स्कूल आणि मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या दोन शाळांच्या स्थापनेमध्ये व व्यवस्थापनामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
  • मिराम्बिका फ्री प्रोग्रेस स्कूल या शाळेला 'शिक्षणाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी' राष्ट्रीय स्तरारील मान्यताप्राप्त आहे. []
  • नैनिताल आणि रामगड, उत्तराखंड येथे आश्रमाची दोन केंद्र आहेत. त्यांच्या स्थापनेमध्येही तारा जौहर यांचा सहभाग आहे.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुला-मुलींसाठी श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखेच्या वतीने एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते. १९८० साली त्यांनी या केंद्राची स्थापना केली.[]
  • श्रीमाताजींनी फुलांचे आध्यात्मिक अर्थ सांगितले होते. त्यावर आधारित Flowers and their messages हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले, त्याच्या निर्मितीमध्ये तारा जौहर यांचा सहभाग होता. []

पुरस्कार

[संपादन]
  • २१ ऑक्टोबर २०२२ रोजी, The Conf. of Indian Universities तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • २१ मार्च २०२२ रोजी भारत सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
  • २०१७ साली त्यांना ओव्हरमन फौंडेशन, कोलकोता यांच्यातर्फे ऑरो-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ग्रंथ संपदा

[संपादन]
  • Learning with the Mother (सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.)
  • Growing Up with the Mother. New Delhi: Matri Store.(सोबतच्या दुव्यावर हे पुस्तक संपूर्ण उपलब्ध आहे.)
  • Growing Up with the Mother. या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील' - अनुवादक -सौ.मीरा श्रीकृष्ण दीक्षित, मार्च २०१५, ISBN 81-88847-63-1

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jauhar, Tara (1999). Growing up with The Mother. Delhi: Sri Aurobindo Ashram, Delhi Branch. ISBN 81-900175-4-3.
  2. ^ a b c तारा जौहर, अनुवाद - सौ. मीरा दीक्षित (२०१५). आत्मविकास माताजींच्या सान्निध्यातील. श्री ऑरोबिंदो आश्रम - दिल्ली शाखा. ISBN 81-88847-63-1.
  3. ^ "A Collection of photographs of The Mother and Sri Aurobindo". saaonline.net.in. 2023-02-24 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Sri Aurobindo Ashram". 24 February 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

०१) पद्मश्री पुरस्कार विजेते

०२) पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना (ध्वनीचित्रफीत)

०३) इंग्रजी विकिपीडियामधील लेख