केतकी मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केतकी मोडक
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण एम.ए. (मराठी), एम.एड., पीएच.डी.
पेशा प्राध्यापिका, लेखिका, भाषांतरकार


डॉ. केतकी मोडक (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका, भाषांतरकार आहेत, संतसाहित्याच्या अभ्यासक आहेत. आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका होत्या. इतिहासलेखन केले आहे.

शिक्षण[संपादन]

मोडक यांनी एम.ए (मराठी), एम.एड, पीएच.डी. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी पीएच.डी.च्या प्रबंधासाठी 'मराठी संत साहित्यातील नाथप्रतिपादित सोऽहम् साधना' या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करतानाच त्यांनी संत मुक्ताबाई यांच्या वाङ्मयावरही संशोधन करून ग्रंथलेखन केले.[१]

कारकीर्द[संपादन]

  • श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या साहित्याला वाहिलेल्या auromarathi.org या संकेतस्थळाच्या आणि auromarathi या युट्यूब चॅनेलच्या त्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

लेखन[संपादन]

  • Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लघुसंशोधन प्रकल्प सादर केला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shodhganga@INFLIBNET: Marathi santsahityatil nathpratipadit soham sadhna_ek abhyas".
  2. ^ "Kadkadoni Vij Nimalee Thayeeche Thayee". archive.org. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
  4. ^ "Upyojit Marathi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.