भारतीय गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गाय
कांकरेज या भारतीय वंशाची गाय
कांकरेज या भारतीय वंशाची गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बोस
जीव: इंडिकस
शास्त्रीय नाव
बोस इंडिकस
कार्ल लिनेयस, १७५८

बोस इंडिकस म्हणजे भारतीय उपमहाद्वीपातील पशु-गोवंश. याला वशिंडधारक असे म्हणतात. भारत, चीन, पश्चिम-दक्षिण आशिया, दक्षिण आफ्रिकेचा प्रांत इत्यादी भागात हा पशुगोवंश आढळतो. याचे उत्पत्ती स्थान भारत असून तेथून पुढे खुष्कीच्या मार्गाने आशियाखंडात पसरून आफ्रिकेपर्यंत विस्तार झाला.

यांची विशेषता म्हणजे, यांचा खांदा उंच असतो, ज्याला वशिंड असे म्हणतात. गळ्याखाली पोळी असते, ज्याला गळ पोळे/गळ कंबल असे म्हणतात. मध्यम, टोकदार आणि बहुतेक लटकते कान असतात. वशिंडापासून मागे पाठ थोडी उतरून आडवी सपाट असते. कमरेजवळ थोडी उंची वाढून पुढे हाडापासून परत उतार असतो. ही प्रजाती उष्ण, शुष्क आणि बदलत्या हवामानास अनुकूल असते. यांची युरोपियन गाईंपेक्षा दूध देण्याची क्षमता थोडी कमी असते.

भारतात गाय ही प्रामुख्याने दूध, दही, ताक, लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी, गोमूत्र तसेच शेतीसाठी उपयुक्त पशुवंश पैदाशीसाठी पाळली जाते. भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गऊ, गोमाता, धेनू इत्यादी नावे आहेत.

चांगली रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रतिकूल हवामानात जगण्याची क्षमता यामुळे गीर, साहिवाल, थारपारकर, ओंगल इत्यादी पशुगोवंश पाश्चिमात्य देशात नेऊन संकर आणि सरळ निवड पद्धतीने नवीन उत्तम गोवंश निर्माण करण्यात आला. उदाहरणार्थ.. ब्राह्मण गाय, स्वित्झर्लंडमधील दिवसाला ५० लिटर दूध देणारी शुद्ध गीर गाय.

भारतीय गायीच्या विविध जाती[संपादन]

उपयुक्ततेच्या आधारावर भारतीय गोवंश तीन वर्गात विभागला जातो.[१]

१. मशागतीचा गोवंश
२. दुभत्या जातीचा गोवंश
३. दुहेरी हेतूचा गोवंश

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय गायींच्या जाती पुढीलप्रमाणे आहे.[२]

 • भारतीय गोवंश
 1. अमृतमहाल
 2. आलमपाटी
 3. उंबलाचेरी
 4. ओंगल
 5. कोंकण कपिला
 6. कंगायम
 7. कासारगोड
 8. कांकरेज
 9. केनकाथा
 10. कोसली
 11. कृष्णा
 12. खेरीअर
 13. खेरीगढ
 14. खिल्लारी
 15. गवळाऊ
 16. गंगातिरी
 17. गीर
 18. घुमुसरी
 19. जवारी गाय
 20. थारपारकर
 21. थुथो
 22. दज्जल
 23. देवणी
 24. धन्नी
 25. नागोरी
 26. नारी
 27. निमारी
 28. डागरी
 29. डांगी
 30. पुंगनुर
 31. पुलिकुलम
 32. पोंवार
 33. पोडा थिरूपा
 34. बरगूर
 35. बद्री
 36. बचौर
 37. बिंझारपुरी
 38. बेलाही
 39. मलनाड गिड्डा
 40. मालवी
 41. मेवाती
 42. मोतू
 43. राठी
 44. लडाखी
 45. लखमी
 46. लाल कंधारी
 47. लाल पूर्णिया
 48. लाल सिंधी
 49. लोहानी
 50. वेचुर
 51. श्वेत कपिला
 52. साहिवाल
 53. सीबी भगनारी
 54. सिरी
 55. हल्लीकर
 56. हरियाना
 57. हिस्सार
 58. हिमाचली पहाडी


 • विदेशातील भारतीय गोवंश
 1. ब्राह्मण गाय - अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील
 2. गुझेरात - ब्राझील
 3. नेल्लूर - अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका|

गायीच्या दुधातील पोषक द्रव्ये[संपादन]

गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांच्या दुधातील पोषक द्रव्ये.

संदर्भ[संपादन]

 1. ^ "breeds | nddb" (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
 2. ^ "Registered Breeds Of Cattle". ICAR - National Bureau of Animal Genetic Resources. December 26, 2021 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]