धन्नी गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
धन्नी किंवा धानी बैल

धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.[१] [२]

शारीरिक रचना[संपादन]

हा गोवंश आकाराने मजबूत आणि मध्यम असतो. या गोवंशाचे डोके तुलनेने लहान असते. पाठीचा आकार सरळ आणि सपाट असतो. कातडी घट्ट असून शरीराला चिटकलेली असते. या गोवंशाची शिंगे आकाराने लहान असतात. कान छोटे, टोकदार आणि नेहमी सतर्क असतात. शेपटी लांब आणि झुपकेदार असून शेपटीचा गोंडा पांढरा असतो.

या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची १४० सेंमी असून वजन ४०० किलो पर्यंत असते. तर गायीची सरासरी उंची १२० सेंमी आणि वजन १३० किलो पर्यंत असते.

वैशिष्ट्य[संपादन]

हा गोवंश विविध प्रकारच्या रंगात आढळतो, परंतु पांढरा रंग आणि काळे किंवा लाल ठिपके जास्त प्रमानात आढळतो.

या गोवंशाच्या वेगवेगळ्या रंगानुसार त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

पांढऱ्या रंगावरील काळ्या ठिपक्याच्या गायीला चित्तबुर्गा असे म्हणतात काळ्या रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला कालाबुर्गा असे म्हणतात. तपकिरी आणि काळ्या रंगावर पांढरे ठिपके असल्यास त्याला नुक्कारा असे म्हणतात. लाल रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला रक्तबुर्गा असे म्हणतात.[३]

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[४] परंतु चांगली काळजी घेतली असता या गोवंशाच्या गायी दिवसाकाठी ८ ते १० लिटर दुध देऊ शकतात.

भारतीय गायीच्या इतर प्रजाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या इतर प्रजाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bajpai, Diti. "ये हैं भारत की देसी गाय की नस्लें, जिनके बारे में आप शायद ही जानते होंगे" (हिंदी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Khan, Bakhat B. (2011-11-13). "Breeds of Livestock in Pakistan - AgriHunt". Agrihunt.pk. Archived from the original on 23 July 2015. 5 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Muhammad Aslam. "Dhanni Cattle" (PDF). Fangrpk.org. 5 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.