कासारगोड गाय
Appearance
कासारगौड, कासारगोड किंवा साह्य हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून केरळ आणि कर्नाटकात आढळतो. याचे उगमस्थान दक्षिण सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला साह्य पशु असे सुद्धा म्हणतात. कर्नाटकातील गौड जिल्ह्यावरून याचे नाव कासारगौड असे पडले.[१]
हा मध्यम बुटका गोवंश असून उत्तम प्रतीच्या दुधासाठी ओळखला जातो. याला केरळातील अति पर्जन्यमान, उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. याची उत्पत्ती कोकण कपिला आणि सुवर्ण कपिला पासून झाली असे मानल्या जाते.
शारीरिक रचना-
याचा रंग बहुतांश काळा असून काही वेळा तपकिरी सुद्धा दिसून येतो. शिंगे मध्यम लहान, कानं आडवे टोकदार आणि तीक्ष्ण असतात. शेपटी लांब आणि जवळजवळ जमिनीला टेकलेली असते. दुधाची कास लहान आणि वाटीसारखी असते. बैलाची उंची ९० सें मी आणि वजन १५० किलो, तर गाईची उंची ८० सें मी आणि वजन ११० किलो पर्यंत असते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. 2015-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-31 रोजी पाहिले.