अमृतमहाल गाय
अमृतमहाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून कर्नाटक राज्यात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातीचा बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहे.[१]
ही प्रजाती हल्लीकर पासून निर्माण झालेली आहे. प्राचीन काळी यांचा वापर युद्ध क्षेत्री साहित्याची ने-आण करण्यासाठी होत असे. यांची काम करण्याची चांगली क्षमता आणि वेगवान गती यासाठी हे बैल वापरले जातात.[२] प्राचीनकाळा पासून गोला आणि हल्लीकर जमातींनी या प्राण्यांची पैदास आणि संवर्धन केले. त्याच सोबत विजयनगर चे तत्कालीन महाराज चिक्कदेवराय वोडियार, सुलतान हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी दिलेला राजाश्रयसुद्धा यसंवर्धनास कामी आला. .[३] जास्त वेळ काम, कमी चारा -पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याच्या गुणधर्मामुळे जरी ही प्रजाती चांगली वाढली तरी पण यामुळे यांची दूध देण्याची क्षमता कमी होत गेली. आणि सद्यस्थितीत तर कमी दूध देणारी प्रजाती म्हणून दुर्लक्षित होत आहे. याचा परिणाम म्हणून ही प्रजाती भविष्यात नष्ट होऊ शकते.
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
- ^ "Cattle Throughout History". Dairy Farmers of Washington.
- ^ Royalty to history: End of road for Amrit Mahal? - The Times of India
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |