श्वेत कपिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्वेत कपिला
स्थिती DM
मूळ देश भारत
आढळस्थान गोवा
मानक agris IS
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    ३५०–४०० किलो (७७०–८८० पौंड)
  • गाय:
    २८०–३२० किलो (६२०–७१० पौंड)
आयुर्मान १८ ते २० वर्षे
डोके छोटे, लहान पांढरे कान
पाय छोटे, मऊ खुर
शेपटी लांब, पांढरी

श्वेत कपिला हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः गोव्याच्या दोन्ही प्रांतातील, म्हणजे उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याच्या जिल्ह्यात आढळतो.[१][२]

शारीरिक रचना[संपादन]

हा गोवंश मध्यम ते लहान आकाराचा असून, नावाप्रमाणेच रंगाने मुसक्या म्हणजे नाकाच्या भागापासून ते शेपटीच्या टोकापर्यंत संपूर्ण पांढरा आहे. याच्या डोळ्याच्या पापण्या, कानाचा आतील भाग आणि शेपुटगोंडा सुद्धा पांढरा असतो.[२][३]

या गोवंशाचे डोके लहान आणि सरळ असून याचे कारण छोटे आणि टोकदार असतात. शिंगांचा आकार सुद्धा लहान असून, शिंग थोडे वर जाऊन बाहेरच्या बाजूला वळलेले असतात. कधीकधी सरळ बाहेर किंवा सरळ वर तिरके पण असतात.[२]

वैशिष्ट्य[संपादन]

हा गोवंश गोव्याच्या अति पावसाळी, दमट वातावरण ते उष्ण आणि गरम वातावरणात सहज वाढतो.[१] याच्या दुधाला औषधी गुणधर्माचे मानले जाते. तसेच दुधातील फॅटचे प्रमाण ४.५ ते ६ % पर्यंत असते. या गोवंशाला गोठा आणि गोशाळेत वाढवले जाते, शेतीकामासाठी इतर पशु किंवा ट्रॅक्टरचा वापर केला जातो.[३]

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा दुधारू गोवंश म्हणून ओळखला जातो[४]

भारतीय गायीच्या इतर जाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Scientists want Goa's Shwet Kapila in national list". Archived from the original on ३१ मार्च २०२१. ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Shweta Kapila". ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b "गोव्‍याची 'श्‍वेतकपिला' गाय अशी नवी ओळख; वाळपई गोशाळेत संवर्धनासाठी संधी". Archived from the original on २९ सप्टेंबर २०२०. ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]