कंगायम गाय
कंंगायम गाय | |
स्थिती | DM |
---|---|
मूळ देश | भारत |
आढळस्थान | कोइंबतूर, इरोड, दिंडुक्कल, करुर, नामक्कल, (तामिळनाडू) |
मानक | agris IS |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | मध्यम, लांब निमुळते, कपाळ फुगीर-खाच असलेले. मध्यम-छोटे आणि टोकदार कानं, डोळे, मुसक्या आणि कानाच्या कडा काळ्या. सहसा बैलाचा चेहरा पण काळा. |
पाय | लांब आणि काटक, खुर कणखर, खुराजवळचा भाग आणि गुडघे काळे |
शेपटी | लांब आणि काळी, शेपुटगोंडा झुपकेदार काळा |
तळटिपा | |
खास करून उसाच्या गाड्या ओढण्यासाठीचा वापर | |
|
कंगायम किंवा कंगेयम हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुुख्यतः तामिळनाडू मध्ये आढळतो.[१]
तामिळनाडूतील त्रिपुर जिल्ह्यातील कंगेयम गावावरून याचे नाव कंगायम असे पडले. हा गोवंश कोंगुमाडू किंवा कंगनाड या नावाने सुद्धा ओळखला जातो.
शारीरिक रचना
[संपादन]हा मध्यम उंच ते बुटका गोवंश असून हा पांढरा, तपकिरी, लाल व काळ्या रंगात आढळतो. यात उंचीनुसार दोन गोवंश आढळतात.
- बुटका-छोटे पण काटक पाय, लहान आणि मागे वळून टोके बाहेर असलेले शिंग. सरळ आणि टोकदार कानं. डोळ्याभोवती काळे वर्तुळ असा वर्ण आढळतो.
- मध्यम उंची-मध्यम काटक पाय, लांब टोकदार आणि पाठीमागे बाहेर जाऊन परत टोके आत वळलेले शिंग. सरळ टोकदार कान. काळे आणि ठळक डोळे असा वर्ण आढळतो. या प्रकारचा वळू जलीकट्टू ठी सुद्धा वापरल्या जात होता.[२]
या गोवंशाचे वैशिष्ट्य म्हणजे जन्मतःच याचा रंग लाल-तांबडा असतो. सहा महिन्यांच्या पुढे हा राखाडी, गडद राखाडी किंवा काळा बनत जातो. विशेषकरून बैलाचा चेहरा, मान, वशिंड आणि पुठ्ठे गडद काळ्या रंगाचे असतात. खुरापासून वर काळे सॉक्स घातल्याप्रमाणे पायाचा रंग असतो.
या गोवंशाच्या गायीचा रंग राखाडी, पांढरट राखाडी किंवा पांढरा असतो. मुसक्या, वशिंड, खुराजवळचा भाग आणि गुढगे, कानाच्या कडा आणि शेपुटगोंडा सुद्धा काळा असतो.
वैशिष्ट्य
[संपादन]हा गोवंश अतिशय मेहनती, कष्टाळू आणि ओझे ओढणारा असल्यामुळे याचा खास वापर ऊस कारखान्याच्या बैलगाड्या ओढण्यासाठी होतो.
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[३]
भारतीय गायीच्या इतर जाती
[संपादन]भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
[संपादन]- ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. 2015-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ "Kangayam". dairyknowledge.in. ३१ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.