Jump to content

आलमपाटी गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आलमपाटी बैल, तामिळनाडू

आलमपाटी गाय किंवा आलंबडी गाय (तामिळ:ஆலம்பாடி மாடு) हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान तमिळनाडू राज्यातील आलमपाटी गावातील आहे. सध्या हा गोवंश जवळपास नामशेष झाला असून, याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.[१]

आढळस्थान[संपादन]

आलमपाटी हे तामिळनाडू राज्यातील एक छोटेसे एक छोटेसे गाव असून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याच्या सीमारेषेवर आहे. याचे स्थान होगेनक्कल पासून तीन ते चार मैल अंतरावर आहे. या गावाचे नाव येथे आढळणाऱ्या 'आलमपाटी गायीच्या' जातीवरून पडले. हा गोवंश सध्या अत्यंत दुर्मिळ आहे. यांचा मुख आढळ धर्मपुरी जिल्ह्यातील पेन्नागरम, कुरिरी, होगेनक्कल, उट्टमलाई, पेरुमपालाई, एरियुर भागांत तसेच कृष्णगिरी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात देंकनिकोट्टई, नाट्रमपालयम, अनचेट्टी भागात होता.[२]

वैशिष्ट्य[संपादन]

या गोवंशाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लांब पाय, उभारलेले रुंद कपाळ आणि मजबूत शिंगे होय. या गोवंशाला चारा अल्प प्रमाणात लागतो. हा गोवंश श्रमिक कामासाठी जसे की बैलगाडी ओढण्यासाठी व नांगरणीसाठी योग्य आहे.[३] राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्थेच्या निकषानुसार हा गोवंश मशागतीच्या म्हणून ओळखला जातो.[४][५]

तामिळनाडू पशुवैद्यकीय संशोधन विद्यापीठाने 'आलमपाटी पशुवैद्यकीय संशोधन केंद्राची' तपासणी करून तामिळनाडू सरकारला कोटी रुपयांच्‍या खर्चाचे अंदाजपत्रक असलेला प्रस्‍ताव सादर केला आणि या गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची परवानगी मिळवली. यानंतर, ८ ऑक्टोबर २०१८ रोजी तामिळनाडू सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. बैलगाडी शर्यती तसेच जलीकट्टी सारख्या जैव-सांस्कृतिक खेळांवर बंदी आणणे आणि विदेशी संकरित गायींचा अतिरेकी प्रसार यामुळे ही जात नष्ट होत असल्याची तक्रार शेतकरी आणि प्रजनक करत आहेत.[६]

भारतीय गायीच्या इतर जाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Conserve Alambadi cattle breed, farmers told". The Hindu. 26 April 2015. 19 October 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Exhibition of Alambadi cattle". The Hindu. 29 March 2015. 19 October 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Adam (16 January 2016). "Cattle breed: Alambadi cattle". Free Range Goats. Archived from the original on 30 January 2017. 19 October 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Registered Breeds Of Cattle" (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ Foundation laid for Alambadi cattlebreeding and research station