डांगी गाय
Jump to navigation
Jump to search
डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो.[१] यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे.[२]
शारीरिक वर्णन[संपादन]
या गोवंशामध्ये संपूर्ण पांढऱ्या रंगावर काळे लहान आकाराचे गोल ठिपके असतात. मस्तक रुंद असून शिंगे लहान, गोलाकार असतात तर डोळे काळे, पाणीदार असतात.
वैशिष्ट्ये[संपादन]
जास्त पावसाच्या प्रदेशात यांची कार्यक्षमता टिकून राहते. यांच्या कातडीवर तेलकट स्त्राव पसरलेला असल्याने पाण्यापासून अपाय होत नाही.[३] काटक आणि ताकदवान असल्यामुळे या जातीच्या गायी डोंगरात जाऊन चरतात.[४]
हे सुद्धा पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. 2020-12-31 रोजी पाहिले.
- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
- ^ "Dangi". dairyknowledge.in. ३१ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ डॉ. नितीन मार्कंडेय, अमित गद्रे (२००७). देशी गोवंश. पुणे: सकाळ प्रकाशन. pp. ४२. ISBN 978-93-86204-44-8.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |