युग्मखुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युग्मखुरी
Artiodactyla
युग्मखुरी प्राण्यांच्या पायाचे खुर
युग्मखुरी प्राण्यांच्या पायाचे खुर
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ:  • गवयाद्य,

 •  सारंगाद्य,
 •  उष्ट्राद्य,
 •  जिराफाद्य,
 •  हयानूपाद्य,
 •  वराहाद्य

युग्मखुरी (इंग्रजी:Artiodactyla) हा एक सस्तन प्राण्यांचा गण आहे. या गणातील प्राण्यांच्या पायांना दोन किंवा चार खुर असतात. यांना द्विखुरी किंवा समखुरी असे पण म्हटले जाते. उत्क्रांतीमध्ये पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये परिवर्तित झालेली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडी वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात.

शारीरिक रचना[संपादन]

या प्राण्यांना वरच्या जबड्यातील पुढचे दात नसतात. त्याऐवजी कडक भाग असतो. त्या कडक भागाला डेंटल पॅड असे म्हणतात. चारा खाताना ही जनावरे जिभेने चारा तोंडात ओढून अर्धवट चावून तुकड्याच्या स्वरूपात गिळतात. यांच्या जठराचे चार भाग असतात. आतड्या ऐवजी अन्न जठरात पचायला सुरू होते. यांची दुसरी विशेषता म्हणजे यातील डुक्कर वर्गीय प्राणी वगळता बहुतेक प्राणी हे रवंथ करणारे आहेत. रवंथ करणे म्हणजे प्रथम हे प्राणी चारा भराभर अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. हा चारा जठराच्या पहिल्या कप्प्यात जाऊन बसतो. नंतर निवांतपणे बसून पहिल्या कप्प्यातील चाऱ्याचे मोठमोठे घास परत तोंडात ओढून व्यवस्थित चर्वण केले जाते आणि मग तो घास पुढील प्रक्रियेसाठी जठराच्या पुढच्या कप्प्यात जातो.

बहुतेक युग्मखुरी वर्गातील बहुतांश प्राण्यांना डोक्यावर शिंगे असतात. त्यांच्या अंगावर केस असून ते शरीराचे ऊन पाऊस तसेच परजीवी कीटकांपासून संरक्षणाचे काम करतात.

यांच्यामधील माद्यांच्या मागील दोन पायात स्तनांच्या सम जोड्या (स्तनाग्रे) असतात. याद्वारे ते आपल्या बछड्यांंना म्हणजे पिलांना दूध पाजतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]