पोंवार गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोंवार गाय

पोंवार किंवा पोनवार हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा मुख्यतः उत्तरप्रदेश राज्यातील एक महत्त्वाचा गोवंश मानला जातो. या गोवंशाला पूर्णिया किंवा काबरी नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील यादव आणि पासी समाजाकडून जास्त पालन केले जाते.[१]

या गोवंशाचे गोवंशाचे उत्पत्तीस्थान उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील पूरणपूर तालुक्यातील पोनवार याठिकाणी या आढळते. पीलीभीत, लखीमपूर, खेरी या जिल्ह्याच्या आसपास हा गोवंश पाळला जातो.

शारीरिक रचना[संपादन]

पोंवार हा गोवंश प्रामुख्याने गतीमान व मजबूत असतो. त्यामुळे शक्यतो आजार या गोवंशात क्वचितच आढळतात. या गोवंशाची त्वचा कडक असते त्यामुळे रक्तशोषण करणाऱ्या उवा पिसवांचा त्रास थोडा कमीच असतो. तसेच मध्यम आकार आणि कमी मांसल शरीर हे याचे वैशिष्ट्य. रंग एकमेकांत मिसळलेला काळा आणि पांढरा असा मिश्र असतो. सहसा काळ्या रंगावर मोठमोठे पांढरे ठिपके असतात. तेजस्वी डोळे तसेच पापण्या आणि खुरांचा रंग काळा असतो. शेपटी मध्यम लांब आणि पांढरी असते.

चेहरा छोटा आणि अरुंद असतो. लहान ते मध्यम आकाराचे शिंगे असून टोकदार टिपांसह आत वळलेले असतात. कान सुद्धा लहान आणि टोकदार असतात. तर वशिंड मोठे असतात.

बैलाची सरासरी उंची ११५ सेमी तर गायीची ११० सेमी असते. बैलाची सरासरी लांबी १०० सेमी आणि गायीची ९० सेमी असते. बैलाचे सरासरी वजन ३२० किलो असते, तर गायीचे वजन २२५ किलो आहे.

वैशिष्ट्य[संपादन]

पोंवार हा गोवंश मध्यम दुधारू असून याचा उपयोग मुख्यत्वेकरून शेतीची कामे व भारवाही कामांसाठीच केला जातो. हा गोवंश अत्यंत रागीट असतो.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड (NDDB)च्या निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[२] .

भारतीय गायीच्या इतर प्रजाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (हिंदी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Breeds । nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.