Jump to content

देवणी गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवणी गाय
देवणी गाय
मूळ देश भारत
आढळस्थान धाराशिव, परभणी, लातूर, बिदर
मानक agris IS
उपयोग दुहेरी हेतुचा गोवंश
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    ५९० किलो (१,३०० पौंड)
  • गाय:
    २९५ किलो (६५० पौंड)
उंची
  • बैल:
    १३५ ते १४० सेंमी
  • गाय:
    १२२ सेंमी
आयुर्मान २० ते २२ वर्षे
डोके मोठे, फुगीर कपाळ,
पाय मध्यम काटक
शेपटी लांब, काळा शेपूट गोंडा
तळटिपा
हा दुधदुभत्या साठी सुद्धा वापरला जातो

देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, धाराशिव, परभणी जिल्हासह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.[][]

आढळस्थान

[संपादन]

देवणी गाय ही पाळीव जनावराची जात मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पाळले जाते. उत्तम दूध उत्पादन आणि शेताची नांगरणी यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवणी जातीला सध्या अस्तित्वात असलेल्या गुरांची दुहेरी हेतू असलेली जात मानली जाते. तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांमध्ये देखील ह्या गाईची मागणी आणि पोहोच वाढत आहे.

शारीरिक रचना

[संपादन]

या गोवंशाचे कपाळ मोठे आणि फुगीर असून, कान लोंबते व टोकाशी किंचित दुमडलेले असतात. शिंगे समान अंतरावर असून आकाराने मध्यम असतात. तसेच शिंगांची टोके बोथट असतात. यांच्या डोळ्यांचा आकार मोठा असतो. या गोवंशाची मान मोठी असून लोंबते पोळे व मोठी कास असते.[][][]

या गोवंशाची उंची माफक असून मध्यम, मजबूत व आकर्षक बांधा असतो. हा गोवंश पांढऱ्या रंगाचा असून अंगावर काळे किंवा तांबडे पट्टे असतात. या पट्ट्यांवरून याच्या काही उपजाती आढळून येतात. जसे की वांनेरा प्रकारात संपूर्ण शरीर पांढरे असून केवळ तोंड काळ्या रंगाचे असते. बालंक्या या उपप्रकरात शरीर पांढरे असून पोटावर काळे पट्टे असतात. तर शेवरा या उपप्रकारात पांढऱ्या शरीरावर अनियमित विविध ठिकाणी कमीजास्त काळे किंवा तांबडे चट्टे असतात.[][][]

वैशिष्ट्ये

[संपादन]

हा गोवंश अतिशय शांत, संयमी आणि संवेदनशील असतो. सामान्यतः देवणी गाय एका वेतात ८८० ते १५०० लिटर पर्यंत दूध देतात.[] गाय दूध देणारी तर वळू शेती कामास उपयुक्त असतो. मुळात हा गोवंश गिर गाय आणि महाराष्ट्रातील स्थानिक डांगी गोवंश यांचा संकर आहे. महाराष्ट्रात उदगीर आणि परभणी येथे तर आंध्रप्रदेशात गुड्गरीपल्ली, कंपासागर आणि कर्नाटक राज्यात बिदर मधील हल्लिखेड शासकीय फर्मवर या गोवंशाचे संवर्धन सुरू आहे.[][]

वापर

[संपादन]

ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यासह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Deoni". saveindiancows.org/deoni/. ७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Devni Cattle : रुबाबदार देवणी गोवंश". अ‍ॅग्रोवोन.
  4. ^ a b ""देवणी" गोवंश (महाराष्ट्र)". गोदान. ७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ a b "Deoni". dairyknowledge.in. ७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Deoni Cattle". ७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.