Jump to content

थुथो गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थुथो गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ उगमस्थान नागालँड राज्यातील आहे. या गोवंशाला “आमेशी”, “शेपी”, “चोकरू” आणि “त्सेसो” असेही म्हणतात. नागालँडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये थुथो गुरे उपलब्ध आहेत. ही जात प्रामुख्याने मांस, शेतीची मशागत आणि शेतीसाठीच्या खतासाठी वापरली जाते. प्राणी डोंगराळ प्रदेशात चांगले जुळवून घेतात आणि पावसाळ्यातही ते डोंगर उतारावर चरण्यास सक्षम असतात.[][]

शारीरिक रचना

[संपादन]
  • कातडीचा रंग काळा किंवा तपकिरी असतो, सुमारे 40% प्राण्यांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग असतात. काही प्राण्यांच्या पायावर आणि शरीराखालीही पांढरे डाग असतात. बैल हे गायींपेक्षा गडद रंगाचे असतात.
  • आकाराने मध्यम, कठोर, सुसज्ज आणि नम्र.
  • डोके आणि कपाळ लहान आणि सरळ आहे. कान मध्यम लांबीचे आणि आडवे असतात.
  • पाठीचा आकार असमान आहे. वशिंड लहान असून मागे उतार आहे आणि हिपबोन्सच्या दरम्यान टेंकाड आणि नंतर शेपटीकडे झपाट्याने खाली येते. शेपटी मध्यम ते लहान कोपरापर्यंत असून गोंड्याचा रंग देखील काळा असतो.
  • शिंगे बाहेर जाऊन टोकाशी वर वळलेली असतात. शिंगांचा आकार लहान आणि बुडाशी जाड असतो.
  • या गोवंशाचा रंग काळा किंवा तपकिरी असतो, कधीकधी चेहऱ्यावर आणि शरीरावर पांढरे ठिपके असतात.[][]

वैशिष्ट्य

[संपादन]

प्राण्यांची देखभाल कळपात, व्यापक व्यवस्थापन प्रणालीमध्ये केली जाते आणि सामान्यत: फक्त चरायला ठेवली जाते. गायी फारसे दूध देत नाहीत (अर्धा ते दीड लिटर प्रतिदिन).[][][]

'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[]

भारतीय गायीच्या इतर जाती

[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "thutho". dairyknowledge.in/. 2021-12-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Breeds of cattle & buffalo" (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Thutho Cattle" (इंग्रजी भाषेत). २९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]