Jump to content

दज्जल गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दज्जल बैल

दज्जल गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा भारत आणि पाकिस्तानातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचा गोवंश मानला जातो. दज्जल गोवंश हा भगनारी गायीपासून निर्माण झाले असल्याचे मानतात. या दोन्ही गोवंशात मोठे साम्य आढळून येते. तथापि हा गोवंश भगणारी पेक्षा थोडा बुटका असतो.[१][२]

पंजाब प्रांतात भगनारी गायी नंतर या गोवंशाचा दूधारू गोवंश म्हणून नंबर लागतो. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहणारा गोवंश म्हणून देखील या गोवंशाची ओळख आहे. या गोवंशाचे बैल शेतीकाम, ओझे वाहून नेने आणि बैलांच्या शर्यतींसाठी वापरतात. तर गायी दुग्धोत्पादनासाठी जोपासल्या जातात. भरलेल्या अंगामुळे हा पाकिस्तान प्रांतात मांसाहारासाठी देखील वाढवला जातो.[३]

वैशिष्ट्य[संपादन]

या गोवंशाचे उगमस्थान हे सध्याच्या पाकिस्तान मधील पंजाब राज्यातील राजनपूर जिल्ह्यातील दाज शहराभोवती असल्याचे मानले जाते. यामुळे या गोवंशाचे नाव दज्जल असे पडले आहे. हा गोवंश पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील डेरा गाजी खान पासून ते भारतातील पंजाब राज्यांपर्यंत सर्वत्र आढळतो.[३][४]

शारीरिक रचना[४][५][संपादन]

 • या गोवंशाचा रंग मुख्यतः राखाडी किंवा कधीकधी पांढरा असतो.
 • खांदा, वशिंड, गळपोळ किंवा गळकंबल हे गडद राखाडी किंवा काळ्या रंगाचे असतात.
 • बैलांचा खांदा आणि वशिंड मोठे, मांसल व मजबूत असतात.
 • बैलाचे वजन सरासरी ५०० किलो तर गायीचे वजन ४०० किलोपर्यंत असते.
 • हा गोवंश एक आकर्षक, बांधेसूद आणि प्रमाणबद्ध असतो.
 • या गोवंशाचे डोके व कपाळ छोटे व मजबूत असते.
 • कानाचा आकार लहान असून शिंगे खुंटी सारखे आखूड आणि जाड असतात.
 • या गोवंशाच्या गायीची पाठ थोडी सरळ असून पाठीमागे शेवटी कमानिय स्वरूपाची असते.
 • या गोवंशाची शेपटी लांबसडक आणि शेपूटगोंडा झुपकेदार असतो.
 • या गोवंशाचा मुख्य आहार ज्वारीची कणसे व ताटे असून बाजरीची भाकरी देखील खाऊघातली जाते.
 • या गोवंशाची गाय पहिल्या वेतात सुरुवातीपासूनच ८ ते ९ लिटर पर्यंत दूध देते. चांगली काळजी घेतली असता १० ते १२ लिटर पर्यंत देखील वाढू शकते.
 • दोन वेतातील अंतर १८ ते २१ महिन्यांचे असून सरासरी भाकडकाळ हा ३ ते ५ महिन्यांचा असतो. * हा गोवंश उंचापुरा असून स्वभावाने अतिशय शांत असल्याचे मानले जाते.

हा गोवंश राष्ट्रीय डेअरी बोर्डावर नोंदणीकृत नसला तरी सामान्य माणसाच्या नजरेत हा 'दुहेरी हेतूचा गोवंश' म्हणून ओळखला जातो.[३]

भारतीय गायीच्या इतर जाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Breeds of Livestock - Dajal Cattle" (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
 2. ^ "TANT BREEDS OF CATTLE AND BUFFALOES IN INDIA" (PDF) (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ a b c Indian Council of Agricultural Research. A Survey of Important Breeds and Types of Cattle in India (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ a b "Dajal Cattle". allpedia.dkart.in. Archived from the original on 2022-01-14. १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ "cattle breeds UVAS" (PDF). uvas.edu.pk. १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]