सीबी भगनारी गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलुचिस्तान मधील सीबी भगनारी बैल

सीबी भगनारी गाय किंवा सीबी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मोठ्या जातीच्या गोवंशापैकी एक मानला जातो. याचे मुख्य आढळस्थान बलुचिस्तान प्रांतातील सीबी शहरातील असले तरी देखील पाकिस्तान आणि भारताच्या वायव्य भागात हा गोवंश आढळून येतो.[१] 'भगनारी' हे नाव सिबीच्या दक्षिणेला आढळणाऱ्या 'भग' शहर आणि तेथील 'नारी' या नदीवरून पडले आहे. दरवर्षी बलुचिस्तान मधील सिबी मेळ्यात या महाकाय गुरांची प्रदर्शनी भरत असते.

वैशिष्ट्य[संपादन]

या गोवंशाचा रंग सामान्यत: पांढरा, राखाडी किंवा संमिश्र असून मान आणि शेपटीच्या गोंड्याचा रंग मात्र काळा असतो. डोक्याचा आकार मध्यम असून लहान पण मजबूत मान असते. यासोबत मध्यम-छोटे कान, लहान शिंगे, बैल पोळे किंवा गळ कंबळ जाडजूड आणि मध्यम आकाराची असते. सरळ आणि रुंद छाती असून वशिंडाचा आकार मध्यम असत. प्रौढ बैलांची उंची ८४ इंच (२१० सेमी) पर्यंत असून याचे वजन १६०० किलो पर्यंत वाढू शकते.[१] वजन आणि आकाराच्या बाबतीत या जातीचे बैल ब्राह्मण गोवंशाला मागे टाकतात. सिबी ही जगातील सर्वात मोठी गुरांची जात आहे की नाही यावर अजूनही वाद आहे.[२][३]

प्रतिकूल परिस्थितीत देखील सहज टिकणारी ही जात आहे. ० ते ५०°C पर्यंत बदलत असणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी ही जात प्रसिद्ध आहे. गुरांना मुख्यतः हिरवा चारा आणि ज्वारीचा कडबा दिला जातो. त्याच सोबत चांगले वजन वाढावे म्हणून गहू, बार्ली, बाजरी यांचा समावेश होतो. इतर पूरक पदार्थांमध्ये देशी तूप, दूध, दही, मोहरीचे तेल आणि कधीकधी अंडी यांचा देखील समावेश होतो.[३]

भारतीय गायीच्या इतर जाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Sibi Bhagnari - Sibi Bull Lovers". thecapitalpost.com. 3 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Sibi Bhagnari mela winner 6 Dant - video dailymotion". Dailymotion. 3 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ a b Illahi Bakhsh Marghazani. "Bhagnari Cattle - Cattle - Fodder". Survey Report on the present status of Bhagnari cattle in the Sibi region. Scribd. 3 January 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]