Jump to content

मालवी गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालवी गाय
मालवी गाय
मालवी बैल
मालवी बैल

मालवी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः पश्चिमी मध्यप्रदेशच्या माळवा प्रांतात आढळतो.[१] या गोवंशाला स्थानिक भाषेत मंथनी किंवा महादेवपुरी असे सुद्धा म्हणतात. मालवी गोवंशाचा 'आगर, जिल्हा शाजापूर, मध्यप्रदेश येथील शासकीय पशु संगोपन केंद्रावर जवळपास ५० वर्षे बारकाईने अभ्यास केला गेला.[२]

हा गोवंश मध्यप्रदेश मधील एक महत्त्वाचा गोवंश असून, इंदूर, देवास, उज्जैन, मंदसौर , राजगड, रतलाम आणि शाजापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.

शारीरिक रचना[संपादन]

मालवी गोवंश हा पांढरा किंवा राखाडी पांढऱ्या रंगात आढळतो. बैलाची मान, खांदे, शिंग यांचा रंग काळा असतो. जसजसा काळ उलटतो, गाय आणि बैल दोघेही पांढरेशुभ्र दिसायला लागतात. या गोवंशाचा आकार मध्यम असून, बैल हे गायीपेक्षा मोठे असतात. या गोवंशाचे डोके मोठे पण कपाळ छोटे असते आणि डोळे काळे आणि पाणीदार असतात. या गोवंशाचे थुथन मोठे आणि काळे असते. पाय लहान आणि मजबूत असतात.

या गोवंशाचे कान लहान आणि टोकदार असतात. शिंगे अर्धचंद्राकृती असून मागे जाऊन वर वळलेली असतात. शेपटी जमिनीपर्यंत लांब असून शेवटी जाड आणि झुपकेदार असते.

बैलाची सरासरी उंची १३५ सेंमी तर लांबी १२० सेंमी पर्यंत असते. गायीची सरासरी उंची १२२ सेंमी तर लांबी ११० सेंमी पर्यंत आढळते. बैलाचे सरासरी वजन ५०० किलो तर गायीचे वजन ४०० किलो पर्यंत असते.[३]

वैशिष्ट्य[संपादन]

हा गोवंश मजबूत आणि मध्यम आकाराचा असून विशेष करून खडबडीत रस्त्यावर चालण्यास अतिशय उपयुक्त ठरतो. राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[४] परंतु विशेष लक्ष दिल्यास गायीची दुध देण्याची क्षमता वाढते.

भारतीय गायीच्या इतर प्रजाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Sharma Harish, Tomar S.S., Kumar Amit (2015). The Indian Journal of Veterinary Sciences and Biotechnology 10 (3): 32–35. Effect of genetic and some other sources of variation on dry period in Malvi cows.CS1 maint: multiple names: authors list (link).
  3. ^ "Domestic Animal Diversity Information System (DAD-IS". ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.