साहिवाल गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साहिवाल गाय

साहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे.[१] उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे. दूध आणि शेतीकामासाठी बैल यासाठी उपयुक्त आहे.[२]

शारीरिक वर्णन[संपादन]

या गायींचा रंग तांबूस पिवळा असतो. कपाळ लांबट आणि अरुंद असते तर शिंगे लहान, काळसर, तांबूस असतात. कान लांबट चपटे असून वशिंड मध्यम तर कास गोलाकार, आटोपशीर असते. मान आखूड असते तर शेपूट मागच्या गुडघ्यापर्यंत पोचेल एवढी लांब असते.[३]

वैशिष्ट्ये[संपादन]

हा दुधाळ गोवंश आहे. दूध देण्याची सलगता आणि सातत्य चांगले असते.

उपलब्धता[संपादन]

भारताच्या पंजाब आणि हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर पैदासकार आहेत.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sahiwal". dairyknowledge.in. ३१ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
  3. a b डॉ.नितीन मार्कंडेय, अमित गद्रे (२०१७). देशी गोवंश. पुणे: सकाळ प्रकाशन. p. 40. ISBN 978-93-86204-44-8.
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.