Jump to content

दालन:क्रीडा/temp

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


क्रीडा

क्रिडा आणि खेळ
क्रिडा आणि खेळ

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.

संक्षिप्त सूची

विशेष लेख

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली.

पुढे वाचा...

Sport in Focus

क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.

अधिक माहिती..



बदला

सद्य क्रीडा स्पर्धा

Gola fek

-->

सद्य क्रिकेट स्पर्धा
सद्य हॉकी स्पर्धा‎
सद्य इतर स्पर्धा
gola fek
  • ...की भारताच्या १९वर्षाखालील खेळाडू अंबाटी रायुडूने २००४/५ मध्ये खेळल्या गेलेल्या १९वर्षाखालील कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती?
  • ...की ऑगस्टीन केली हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज व यष्टीरक्षक १९२० आणि १९३० दरम्यान आयर्लंड क्रिकेट संघाकडून २५ वेळा खेळला होता?
  • ...की महिला एशिया कप स्पर्धा आता पर्यंत तीन वेळा खेळली गेली आहे?



बदला

महत्वाच्या स्पर्धा

तुम्ही काय करू शकता

नविन लेख
विस्तार