हिरोहितो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिरोहितो / सम्राट शोवा
裕仁 / 昭和天皇
जपानचा सम्राट
Hirohito in dress uniform.jpg
अधिकारकाळ डिसेंबर २५, इ.स. १९२६ ते जानेवारी ७, इ.स. १९८९
राज्याभिषेक नोव्हेंबर १०, इ.स. १९२८
जन्म एप्रिल २९, इ.स. १९०१
ओयामा राजवाडा, तोक्यो, जपान
मृत्यू जानेवारी ७, इ.स. १९८९
फुकिआज राजवाडा, तोक्यो, जपान
पूर्वाधिकारी सम्राट तायशो
उत्तराधिकारी अकिहितो
वडील सम्राट तायशो
आई सम्राज्ञी तेयमे
पत्नी सम्राज्ञी कोजुन
संतती राजकुमारी तेरू
राजकुमारी हिसा
राजकुमारी ताका
राजकुमारी योरी
सम्राट अकिहितो
राजकुमार हिताची
राजकुमारी सुगा

Hirohito 1983.jpg

इचितोमिया हिरोहितो (१९०१ १९८९) जपानच्या पुनरुत्थानासाठी अथक परिश्रम घेणारे सम्राट होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, देश बेचिराख झाला तरीही प्राप्त परिस्थितीस सामोरे जाणारे सम्राट हिरोहितो हे आधुनिक जपानचे निर्माते होत.

हिरोहितो यांचे शिक्षण राजकुमारांच्या खास शाळेत झाले. राजकुमारासाठी आवश्यक सर्व शिक्षण त्यांनी घेतले, ते योद्धा बनले पण मनाने ते तत्त्वज्ञ व विचारवंत होते.

जपानी राजकुमारांची परंपरा मोडून हिरोहितो यांनी नागाकोवुनी या युवतीशी प्रेमविवाह केला. हिरोहितो यांनी सम्राट पद घेतले तेव्हा जपान अशांत होता, राजकीय खून, मारामाऱ्या यांना ऊत आलेला होता. हिरोहितो यांना शोवा हे नाव धारण केले. याचा अर्थ ज्ञानपिपासू, शांतता असा होतो. शांतताप्रेमी लोकांनाही आपल्या सम्राटाच्या शांततेच्या मार्गावर विश्वास होता.

दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभव झाला. सम्राट हिरोहितो यांनी २६ शतकांची परंपरा मोडून थेट सामान्य माणसाशी संवाद साधला, जनतेला उद्देशून सार्वजनिक भाषण केले. या भाषणात त्यांनी कुठेही पराभवाचा, शरणागतीचा उल्लेख केला नाही. जपानची लष्करी महासत्ता अशी ओळख पुसून लोकशाही पद्धतीने, सगळ्यांच्या सहभागाने देश पुढे नेण्यास मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे जपानचा विकास आरखडाही तयार करण्यात आला.