अन्वरा तैमूर
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २४, इ.स. १९३६ आसाम | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. २०२० | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
![]() |
सय्यदा अन्वरा तैमूर (२४ नोव्हेंबर १९३६ - २८ सप्टेंबर २०२०) ह्या एक भारतीय राजकारणी होत्या. त्या ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ दरम्यान भारतीय आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. [१] त्या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य होत्या. २८ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे ऑस्ट्रेलियात निधन झाले.[२]
वैयक्तिक जीवन
[संपादन]त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. अन्वरा १९५६ मध्ये देबीचरण बरुआ गर्ल्स कॉलेज, जोरहाटमध्ये अर्थशास्त्राच्या लेक्चरर होत्या.
राजकीय कारकीर्द
[संपादन]आसामच्या इतिहासात त्या राज्याच्या एकमेव महिला आणि मुस्लिम मुख्यमंत्री होत्या. [३] ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ पर्यंत त्या आसामच्या मुख्यमंत्री होत्या.[४] [३] भारतीय इतिहासातही सय्यदा अन्वरा तैमूर या कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री होत्या. [५] राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट असताना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपला.
सन् १९७२, १९७८, १९८३ आणि १९९१ मध्ये त्या आसाम विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य (आमदार) होत्या.[३] [४] १९८८ मध्ये त्यांना राज्यसभेत नामांकित करण्यात आले.[३] [६] १९९१ मध्ये त्यांची आसाममध्ये कृषी मंत्री पदावर नियुक्ती झाली.[७]
अन्वरा २०११ मध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये सामील झाल्या.[३]
मृत्यू
[संपादन]२८ सप्टेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियात हृदयविकाराच्या झटक्याने तैमूर यांचा मृत्यू झाला, जिथे त्या त्यांच्या मुलासोबत गेली चार वर्षे राहत होत्या.[३] [४] [८] [२]
संदर्भ
[संपादन]- ^ "'Spurned' Taimur in AIUDF - Denied a ticket, one deserts, the other turns mentor". 1 February 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ a b "Assam's lone female chief minister Syeda Anwara Taimur passes away". The News Mill (इंग्रजी भाषेत). 2020-09-28. 2020-09-28 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "Assam's only woman CM Syeda Anwara Taimur passes away in Australia at 83". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 28 September 2020. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ a b c Bikash, Singh (28 September 2020). "Syeda Anwara Taimur, the only woman chief minister of Assam, breathed her last on Monday". The Economic Times. 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Kudos to Mehbooba Mufti, but where are Kashmir's female politicians?". 29 March 2016.
- ^ "Archived copy" (PDF). 19 December 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 July 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Anwara Taimur – the First Lady CM of Assam | Sevendiary.com | Discover Northeast India - Culture, Lifestyle and Travel". 13 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Former Assam CM Anwara Taimur no more". News Live (इंग्रजी भाषेत). 28 September 2020. 12 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 September 2020 रोजी पाहिले.