करीना कपूर
करीना कपूर | |
---|---|
करीना कपूर (२०१४) | |
जन्म |
२१ सप्टेंबर, १९८० मुंबई, महाराष्ट्र |
इतर नावे | बेबो |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००० - चालू |
भाषा | हिंदी |
पती |
करीना कपूर (सप्टेंबर २१, इ.स. १९८०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी चित्रपटांतील भारतीय अभिनेत्री आहे. ती अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर ची धाकटी बहीण आहे. रोमँटिक कॉमेडीपासून क्राइम ड्रामापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपट शैलींमध्ये विविध पात्रे साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
करिनाला सहा फिल्म फेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती हिंदी चित्रपट सृष्टी तील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.[१]
रोमँटिक विनोदी चित्रपट जब वी मेट (२००७) आणि एक मैं और एक तू (२०१२), थ्रिलर्स कुर्बान (२००९) आणि तलाश: द आन्सर लाइज विदिन (२०१२), हिरोईन (२०१२) आणि उडता पंजाब (२०१६). आणि वी आर फॅमिली (२०१२) यांमधील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. सिंघम रिटर्न्स (२०१४), गुड न्यूझ (२०१९), आणि ३ इडियट्स (२००९), बॉडीगार्ड (२०११) आणि बजरंगी भाईजान (२०१५) यांचा समावेश तिच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आहे.
अभिनेता सैफ अली खानशी तिचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुलगे आहेत. करिना कपूरचे ऑफ-स्क्रीन जीवन भारतात व्यापक चर्चेचा विषय आहे. तिचा स्पष्टवक्तपणा आणि खंबीरपणा यासाठी ती प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या फॅशन शैली आणि चित्रपटातील भूमिकांद्वारे चित्रपट उद्योगातील तिच्या योगदानासाठी ओळखली जाते.
चित्रपट अभिनयाव्यतिरिक्त करिना स्टेज शोमध्ये भाग घेते, रेडिओ शो होस्ट करते आणि तिने चार पुस्तकांसाठी सह-लेखक म्हणून योगदान दिले आहे. त्यापैकी दोन आत्मचरित्रात्मक संस्मरण आणि दोन पोषण मार्गदर्शक आहेत. तिने महिलांसाठी कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांची स्वतःची लाइन सुरू केली आहे आणि २०१४ पासून युनिसेफसोबत मुलींच्या शिक्षणासाठी आणि भारतात गुणवत्ता आधारित शिक्षणात वाढ करण्यासाठी काम केले आहे.
आरंभिक जीवन आणि कुटुंब
[संपादन]हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या रणधीर कपूर आणि बबिता यांच्या पोटी करीना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव ॲना कारेनिना या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.[२] करीना ही राज कपूर यांची नात आहे आणि पृथ्वीराज कपूरची पणती आहे. करिष्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करीनेची मोठी बहीण आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची ती पुतणी आहे.
शिक्षण
[संपादन]करीनाने मुंबईतील जमनाबाई नर्सी स्कूलमधून आणि नंतर डेहराडूनच्या वेल्हाम गर्ल्स बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतल्या मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने हार्वर्ड विद्यापीठामधून ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम पूर्ण केला.[३]
कौटुंबिक कलह
[संपादन]कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करीनानेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटांत काम करणे हे चांगले समजले जात नसे.[४] याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.[५] करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहीण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकऱ्या करत असे.[६]
कारकीर्द
[संपादन]- सुरुवातीचे चित्रपट
रेफ्युजी (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करून, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेर पुरस्कार पटकावला. परंतु मुझे कुछ कहना है (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करीनाने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. चमेली (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या देव (इ.स. २००४) आणि ओंकारा (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेर पुरस्कार मिळाले.
- आघाडीची अभिनेत्री म्हणून कारकीर्द (२००७ - २०११)
इ.स. २००७ साली करीनाने तिच्या जब वी मेट चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करीनाने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
आत्मचरित्र
[संपादन]- The Style Diary of a Bollywood Diva हे करीना कपूरच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
चित्रपट कारकीर्द
[संपादन]वर्ष (इ.स.) | चित्रपट | भूमिका | माहिती |
---|---|---|---|
२००० | रेफ्युजी | नाजनिन "नाज" एम. एहमद | विजेती, सर्वोतकृष्ट नवोदित नायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार |
२००१ | मुझे कुछ कहेना है | पूजा सक्सेना | |
यादें | इशा सिंग पुरी | ||
अजनबी | प्रिया मल्होत्रा | ||
असोका | कौरवंकी | नामांकन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
कभी खुशी कभी गम | पूजा "पू" शर्मा | नामांकन, सर्वोतकृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
२००२ | मुझसे दोस्ती करोगे! | टिना कपूर | |
जीना सिर्फ़ मेरे लिये | पूजा/पिंकी | ||
२००३ | तलाश: द हंट बिगिन्स ... | टिना | |
खुशी | खुशी सिंग (लाली) | ||
मैं प्रेम की दिवानी हूं | संजना | ||
एल ओ सी कारगिल | सिमरन | ||
२००४ | चमेली | चमेली | विजेती, 'विशेष फिल्मफेअर पुरस्कार |
युवा | मिरा | ||
देव | आलिया | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार) | |
फ़िदा | नेहा मेहरा | पहिला खलनायिका अभिनय | |
ऐतराज | प्रिया सक्सेना/मल्होत्रा | ||
हलचल | अंजली | ||
२००५ | बेवफ़ा | अंजली सहाय | |
क्यों की | डॉ. तन्वी खुराणा | ||
दोस्ती: फ्रेंड्स फोरेव्हर | अंजली | ||
२००६ | ३६ चायना टाउन | प्रिया | |
चुप चुप के | श्रुती | ||
ओंकारा | डॉली आर. मिश्रा | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्री (समिक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कार) नामांकन, सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
डॉन- द चेझ बिगिन्स अगेन | कामिनी /सोनिया | पाहुणी कलाकार | |
२००७ | क्या लव्ह स्टोरी है | स्वतः | विशेष भूमिका (आयटम नंबर) |
जब वी मेट | गीत ढिल्लों | विजेती, सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार | |
२००८ | हल्ला बोल | स्वतः | पाहुणी कलाकार |
टशन | पूजा Singh | एप्रिल २५, इ.स. २००८ला प्रदर्शित होणार | |
गोलमाल रिर्टन्स् | एकता | २४ आॅ क्टोंबर, इ.स. २००८ला प्रदर्शित होणार | |
रोडसाइड रोमिओ | २४ आॅ क्टोंबर, इ.स. २००८ला प्रदर्शित होणार प्रवाचक अभिनेत्री | ||
मिलेंगे मिलेंगे | प्रिया | लांबणीवर | |
मै ओर मिसेस. खन्ना | मिसेस. खन्ना | चित्रीकरण चालू | |
कंबख्त इश्क | उत्पादनपूर्व | ||
२००९ | लक बाय चान्स | स्वतः | पाहुणी कलाकार |
बिल्लू | स्वतः | पाहुणी कलाकार | |
कंबक्खत इश्क | सिमरिता राय / बेबो | ||
में और मिसेस खन्ना | रैना खन्ना | ||
कुर्बान | अवंतिका आहूजा (खान) | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेर पुरस्कार | |
3 इडियट्स | पिया सहस्त्रबुद्धे | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेर पुरस्कार | |
२०१० | मिलेंगे मिलेंगे | प्रिया मल्होत्रा | |
वी आर फॅमिली | श्रेया अरोरा | सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेर अवॉर्ड | |
गोलमाल 3 | दाबू | नामांकित - सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेर पुरस्कार | |
२०११ | बॉडीगार्ड | दिव्या | |
रा.वन | सोनिया सुब्रमण्यम | ||
२०१२ | एक में और एकक तू | रिआन ब्रागांझा | |
एजंट विनोद | आराम परवीन बिलाल /डॉक्टर.रुबी मेंडीस | ||
राउडी राठोड | |||
हेरॉईन | माही अरोरा | ||
तलाश | |||
दबंग २ | |||
२०१३ | सत्याग्रह | यास्मिन अहमद | |
गोरी तेरे प्यार में | दिया शर्मा | ||
२०१४ | सिंघम रिटर्न्स | ||
द शौकीन्स | |||
२०१५ | गब्बर इस बॅक | ||
बजरंगी भाईजान | |||
२०१६ | कि आणि का | ||
उडता पंजाब |
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकॄत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील करीना कपूर चे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ
[संपादन]- ^ "Happy Birthday! How Kareena Kapoor made it big". web.archive.org. 2015-02-18. 2015-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ इंडीयाएफएम न्यूझ ब्यूरो. "व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ?" (इंग्लिश भाषेत). 2008-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जानेवारी२००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ वर्मा, सुकन्या. "आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स" (इंग्लिश भाषेत). २१ ऑक्टोबर २००६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ स्क्रीन वीकली. "द फॅमिलीज दॅट हॅव चेंज्ड द फेस ऑफ बॉलिवूड" (इंग्लिश भाषेत). 2008-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ ललवाणी,विकी. "रणधीर-बबिता बॅक टुगेदर!" (इंग्लिश भाषेत). २० ऑक्टोबर २००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ ठकरानी, अनिल. "बेबो, फुल-ऑन" (इंग्लिश भाषेत). 2007-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ डिसेंबर २००७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)