बजरंगी भाईजान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बजरंगी भाईजान
दिग्दर्शन कबीर खान
निर्मिती सलमान खान
रॉकलाईन वेंकटेश
कथा कबीर खान
पटकथा के.व्ही. विजेंद्र प्रसाद
प्रमुख कलाकार सलमान खान
हर्षाली मल्होत्रा
करीना कपूर
नवाजुद्दीन सिद्दिकी
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १७ जुलै २०१५
वितरक इरॉस इंटरनॅशनल
एकूण उत्पन्न ₹६२६ कोटी (अंदाजे)


बजरंगी भाईजान हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानचे दिग्दर्शन असलेला व सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १७ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला. हर्षाली मल्होत्रा ह्या बालकलाकाराची मुख्य असलेल्या ह्या चित्रपटात करीना कपूर सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकली तर नवाजुद्दीन सिद्दिकी, शरत सक्सेना ह्यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे संगीत प्रीतमने दिले आहे.

ह्या चित्रपटामध्ये शाहिदा नावाची एक मुकी पाकिस्तानी मुलगी आपल्या आईसमवेत दिल्ली-लाहोर रेल्वेने प्रवास करीत असताना हरवते व भारतामध्येच राहते. बजरंगी नावाच्या एका इसमाला ती सापडते व तो तिला सुखरूपपणे पाकिस्तानात तिच्या पालकांकडे पोचवण्याची जबाबदारी हाती घेतो अशी कथा बजरंगी भाईजानमध्ये रंगवली आहे.

रमजान ईदच्या काळात प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील अनेक विक्रम तोडले. सध्या हा भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उत्पन्न मिळवलेला चित्रपट आहे.

कलाकार[संपादन]

सलमान खान - पवन कुमार चतुर्वेदी

करीना कपूर खान - रसिका

नवाजुद्दीन सिद्दीकी - पाकिस्तानी प्रतिनिधी

ओम पुरी - मौलाना साहेब

हर्षाली मल्होत्रा - मुन्नी, छोटी मुलगी

अली कुली मिर्जा -

दिप्ती नवल -

नजीम खान - बजरंगी

बाह्य दुवे[संपादन]