रणधीर कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Randhir Kapoor in 2020.jpg

रणधीर कपूर (१५ फेब्रुवारी, १९४७:चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा हिंदी चित्रपट अभिनेता आहे. याने बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली व १९७१मध्ये कल आज और कल या चित्रपटाद्वारे अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपटात काम केले. याने हमराही, जवानी दिवानी, पोंगा पंडित, रामपूरका लक्ष्मण, कस्मे वादे सह अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.

हा राज कपूरचा सगळ्यात मोठा मुलगा असून ऋषी कपूर आणि राजीव कपूरचा भाऊ आहे. रणधीर कपूरने १९७१मध्ये बबिता शिवदासानीशी लग्न केले. त्यांना करिश्मा कपूरकरीना कपूर या दोन मुली आहेत.