Jump to content

मलेशिया एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
MH
आय.सी.ए.ओ.
MAS
कॉलसाईन
MALAYSIAN
स्थापना १ ऑक्टोबर १९७२
हब क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एन्रिच
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ९४
मुख्यालय सुलतान अब्दुल अझीझ शहा विमानतळ, सुबांग, मलेशिया
संकेतस्थळ http://www.malaysiaairlines.com
झ्युरिक विमानतळावरून उड्डाण करणारे मलेशियाचे बोईंग ७७७

मलेशिया एरलाइन्स (मलाय: Sistem Penerbangan Malaysia) ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

सुरुवातीला मलेशिया एरलाइन्स मलेशियन एर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एरलाइन्सचे ब्रॅंडेड नाव मलेशिया एर लाइन होते. ही एरलाइन मुख्यतः क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि त्याच्या कोटा किनाबालू व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

मलेशिया एर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज ह्या दोन सहकारी एर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्जचे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.

२०१४ साली झालेल्या मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७०मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ ह्या दोन मोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.

मलेशियन एविएशन इतिहास

[संपादन]

सन १९३७ मध्ये जेव्हा वेयर्णे एर सेवा (WAS) सिंगापूर ते कौला लुंपूरव पेनांग चालू झाली तेव्हा मलाया येथे नियमित विमान प्रवाशी आणि टपाल सेवा सुरू झाल्या. वेयर्नेची विमान सेवा थियोडोर आणि चार्लस वेयर्नेस या ऑस्ट्रेलियन दोन बंधूंनी चालू केली.[] आठवड्यातून सिंगापूर ते पेनांग अशी तीन विमान उड्डाणे यानुसार ही विमान सेवा चालू झाली. या सेवेसाठी दिनांक २८ जून १९३७ रोजी ड्रॅगन रॅपिड या ८ बैठकीचे हेविलंड DH.89A या विमानाचा वापर केला. हे पहिले उद्घाटनचे विमान सिंगापूर येथील त्याच वर्षी १२ जून रोजी चालू झालेल्या अगदी नव्या कोऱ्या कलॉंग विमान तळावरून उड्डाण केले. त्यानंतर D.H.89A या दुसऱ्या विमानाची त्यात भर करून दैनंदिन सेवा तसेच इपोह या ठिकाणीही विमान सेवा चालू केली. दुसऱ्या महायुद्दात जपानने मलाया आणि सिंगापूर या राष्ट्रांचा ताबा मिळवल्यानंतर ही (WAS) विमान सेवा बंद केली.

इतिहास

[संपादन]

ही विमान सेवा मलायन एरवेझ लिमिटेड या नावाने सुरू झाली आणि सन १९४७ मध्ये तिने पहिले व्यावसायिक उड्डाण केले.[] त्यांनतर कांही वर्षांनंतर सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७२ मध्ये या विमान कंपनीची संपत्ति विभागली गेली त्याने सिंगापूर झेंडा धारी सिंगापूर एर लाइन (MSA) आणि मलेशिया झेंडा धारी मलेशीयन एर लाइन सिस्टम (MAS)उदयास आली. त्यांचा लोगो म्हणजे मलेयशियन पतंगाचे आकाराचा “बाऊ बुलण” आहे.

देश व शहरे

[संपादन]
देश शहर
ऑस्ट्रेलिया ॲडलेड, ब्रिस्बेन, डार्विन, मेलबर्न, पर्थ, सिडनी
बांग्लादेश ढाका
ब्रुनेई बंदर सेरी बेगवान
कंबोडिया पनॉम पेन, सिआम रीप
चीन बीजिंग, क्वांगचौ, कुन्मिंग, शांघाय, च्यामेन
फ्रान्स पॅरिस (चार्ल्स दि गॉल)
जर्मनी फ्रांकफुर्ट (फ्रांकफुर्ट विमानतळ)
हाँग काँग हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
भारत बंगळूर (बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ), कोचिन (कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ), हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशिया देनपसार, जाकार्ता, मेदान
जपान ओसाका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
मलेशिया क्वालालंपूर
मालदीव माले
म्यानमार यांगून
नेपाळ काठमांडू (त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
न्यू झीलंड ऑकलंड
फिलिपिन्स मनिला
सौदी अरेबिया जेद्दाह
सिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
दक्षिण कोरिया सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
श्रीलंका कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
तैवान तैपै
थायलंड बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत, क्राबी
तुर्कस्तान इस्तंबूल
संयुक्त अरब अमिराती दुबई
युनायटेड किंग्डम लंडन
व्हियेतनाम हनोई, हो चि मिन्ह सिटी

ब्रॅंडिंग

[संपादन]

सन २०१३ पासून ही एर लाइन “जर्निज आर मेड बाय पीपल यू ट्रव्हलं विथ” या स्लोगनचा वापर करू लागली. तरीसुद्दा विमान ३७० आणि १७ यांचे साठी “कीप फ्लाइंग,’ “फ्लाइंगहाय”, “बेटरटुमारो” या स्लोगनचा वापर केला. १ सप्टेंबर २०१५ रोजी जेव्हा या विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा “टूडेइजहिअर” या स्लोगनचा वापर केला.

सहभागीदारी करार

[संपादन]

सन २०१५ अखेर या एर लाइन्स ने खालील विमान कंपन्याशी सहभागीदारी करार केलेले आहेत.

  • एर मॉरीशस
  • फायर फ्लाय
  • कतार एरवेझ
  • अमेरिकन एरलाइन्स []
  • गरुडा इंडोनेशिया
  • रॉयलं बृनेरी एर लाइन्स
  • बँकॉक एरवेझ
  • गल्फ एर
  • रॉयलं जोरडर्नियन
  • काथे पॅसिफिक
  • जपान एर लाइन्स
  • सिल्क एर
  • चायना सौथर्ण एरलाइन्स
  • जेट एरवेझ
  • सिंगापूर एर लाइन्स
  • ड्रॅगन एर
  • के.एल.एम.
  • श्रीलंकन एर लाइन्स
  • इजिप्त एर
  • कोरियन एर
  • थाई एरवेझ इंटर नॅशनल
  • एमिरेटस
  • मास विंग्ज
  • टर्किश एरलाइन्स
  • एथिओपियन एरलाइन्स
  • म्यानमार एरवेझ
  • उजबेकीस्थान एरवेझ
  • इतिहाद एरवेझ[]
  • ओमान एर
  • क्षीयमेण एरलाइन्स
  • फीन एर
  • फिलिप्पिन एरलाइन्स

विमान संच

[संपादन]

एप्रिल २०१६ अखेर या विमान कोमपेची ७६ विमाने प्रत्यक्ष उड्डाण सेवा करीत आहेत त्यात ५४ बोइंग आणि २२ एरबस आहेत आणि २० स्टोर मध्ये आहेत.[] सर्व बोइंग ७७७ सेवेतून बाजूला केल्यानंतर सध्या जी सेवेत आहेत ती साधारण ३.७ वर्ष वयाची आहेत. या विमान कंपनीचा विमान चालविण्याचा प्रशिक्षण योजनेचे नाव एंरीच आहे. त्यामार्फत विविध विमाने चालविणे, बँकिंग , क्रेडिट कार्ड देणे, हॉटेल, किरकोळ कामकाज अशा प्रकारचे जगभर प्रोग्राम आखले जातात.

विमानांचा ताफा

[संपादन]
प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
F C Y एकूण
एरबस ए-३३० 15 0 36 247 283
एरबस ए-३८० 5 8 66 420 494
बोईंग ७३७ 15 0 16 150 166
41 14/10 0 16 144 160
बोईंग ७४७ 1 12 41 306 359
बोईंग ७७७ 13 0 35 247 282
मालवाहू विमाने
एरबस ए-३३० 4 नाही
बोईंग ७४७ 2 नाही
एकूण 92 11/20

व्यवसाय

[संपादन]

या विमान कंपनीचे ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अहमद जौहरी याहया यांनी २८ फेब्रुवरी २०१३ रोजी या विमान कंपनीला RM५१.४ मिल्लियन निव्वळ नफा चौथ्या त्रैमाशिकचे शेवटी झाला त्यात गत वर्षातिल तोटा RM१.३ बिल्लियन भरून काढलेला आहे असा रीपोर्ट दिला.

पुरस्कार

[संपादन]

सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "मलेशिया एयरलाइन्सचे संस्थापक" (PDF). 2011-07-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ "मलेशिया एरलाइन्स विषयी".
  3. ^ "अमेरिकन एरलाइन्स आणि मलेशिया एरलाइन्स यांच्यात नवीन कोडशेअर करार".
  4. ^ "मलेशिया एयरलाइन्स आणि इतिहाद एयरवेज यांच्यात कोडशेयर भागीदारी".
  5. ^ "विमान संच माहिती - मलेशिया एरलाइन्स". 2016-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-10 रोजी पाहिले.
  6. ^ "मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार".