फायरफ्लाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फायरफ्लायचा लोगो
पेनांग विमानतळावर थांबलेले फायरफ्लायचे ए.टी.आर. ७२ बनावटीचे विमान
Disambig-dark.svg

फायरफ्लाय ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. २००७ साली स्थापन झालेली व पेतालिंग जया ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये मुख्यालय असलेली फायरफ्लाय पूर्णपणे मलेशिया एअरलाइन्सच्या मालकीची आहे. फायरफ्लायचे मुख्य वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळपेनांग विमानतळ येथे असून जोहोर बारूकोटा भारू ही तिची प्रमुख शहरे आहेत.

मलेशियाखेरीज इंडोनेशिया, सिंगापूरथायलंडमधील शहरांना देखील फायरफ्लाय प्रवासी विमानसेवा पुरवते.

बाह्य दुवे[संपादन]