प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (इं:Pradhan Mantri Awas Yojana (Urban)) ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे ज्यात एकाच ठिकाणी सर्व लाभ पोचविल्या जातील. सरकारने, ९ राज्यात ३५ अशी शहरे शोधली आहेत ज्यात शहरी गरीबांसाठी घरबांधणी सुरू केल्या जाईल.ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे. सर्वांसाठी घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).

योजनेबद्दल[संपादन]

प्रधानमंत्री आवास योजनेचे विमोचन जून २०१५ मध्ये केल्या गेले. या योजनेचा उद्देश गरीब शहरी लोकांसाठी परवडणारी घरे असा आहे. [१][२]

या योजनेअंतर्गत २ करोड घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात शहरी गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गनिम्न आय गट या गटांमधील शहरात राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.ही घरे सन २०२२ पर्यंत बांधली जातील. यात केंद्र सरकारचा सहभाग रु. २० करोड इतका राहणार आहे.[३][४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ एकॉनॉमिक टाईम्स: "प्रधानमंत्री आवास योजेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची मालकी महिलांची असावी:व्यंकय्या नायडू" Check |दुवा= value (सहाय्य). The Economic Times.[मृत दुवा]
  2. ^ एकॉनॉमिक टाईम्स: "मोदी सरकार इंदिरा आवास योजनेत बदल करुन त्यास प्रधानमंत्री आवास योजनेचा नवीन चेहरा देणार" Check |दुवा= value (सहाय्य). The Economic Times.
  3. ^ बिझिनेस टूडे: "'सर्वांसाठी घरे' योजनेसाठी ३०० शहरे निवडण्यात आलीत" Check |दुवा= value (सहाय्य). Business Today.
  4. ^ बिझिनेस टूडे: "सर्वांसाठी घरे योजनेस सरकारचा होकार:आपण जाणावे असे" Check |दुवा= value (सहाय्य). Business Today.
  5. ^ एनडीटीव्ही: "'सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत ३०५ शहरे निवडण्यात आलीत" Check |दुवा= value (सहाय्य). NDTV.

हे सुद्धा पहा[संपादन]