वर्धा नदी
वर्धा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
वर्धा नदी | |
---|---|
उगम | मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील जाम या खेड्याजवळ सातपुडा पर्वत रांगेत, अमरावती जिल्ह्यात वरुळ तालुक्यातील निमठण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | रुपांतरण त्रूटी: मूल्य "455km" अंकातच आवश्यक आहे |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | 46186 चौरस किलोमीटर |
वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.
वेणा (वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी शहराजवळ मिळते. यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते. राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयेस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.
एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.
भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्नेय भाग निग्न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी लांबी नुसार मोठी नदी आहे वर्धा ही विदर्भातली प्रमुख नदी असून, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 455 कि मी आहे तर जलवाहिनी क्षेत्र 46,186 चौ कि मी आहे.
वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने)
[संपादन]पहा : जिल्हावार नद्या
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |