वेणा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वेणा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते वर्धा नदी
धरणे वेणा धरण

वेणा नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. वेणा नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नावाच्या नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला मिळण्यापूर्वी वेणा नदीला नंद, बोर आणि पोन्ना या नद्या क्रमाक्रमाने मिळतात. वेणा नदीला इंग्रजीत Wunna म्हणतात. या नदीवर नागपूरजवळ एक बरेच मोठे धरण आहे.

वेणा धरण : धरणाची लांबी २५२५ मीटर आणि उंची १८ मीटर आहे. धरणात २३,५६० घन किलोमीटर इतक्या पाण्याचा साठा होऊ शकतो.

  • महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी वेण्णा नदी ही वेगळीच नदी आहे.
  • ब्रम्हदेशात Wunna नावाचे एक शहर आहे.


पहा : जिल्हावार नद्या