प्राणहिता नदी
river in India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | |||||
| लांबी |
| ||||
| नदीचे मुख | |||||
| Tributary | |||||
![]() | |||||
| |||||
प्राणहिता नदी ही महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एक नदी आहे जी वैनगंगा नदी आणि वर्धा नदीच्या संगमानंतर निर्माण होते.[१] हा संगम महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर तुमडी हेट्टी, कौठला मंडळ सिरपूर (टी) जवळ आहे. अगदी सुरुवातीलाच, नदीचे एक विस्तृत नदीपात्र आहे.
प्राणहिता नदी ११३ किलोमीटरचा एक छोटासा प्रवास पुर्ण करते, जो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांच्या सीमेला लागुन राहतो. अहेरी तालुक्यातील वडलापेठ जवळ प्राणहिता नदीला दिना नदी मिळते. प्राणहिता नदीची दिशा दक्षिणेकडे आहे. तिच्या मार्गावर नदी घनदाट जंगलांनी वेढलेली आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांची समृद्ध जैवविविधता आहे. तिचा छोटासा प्रवास पूर्ण केल्यानंतर, ही नदी कालेश्वरम येथे गोदावरी नदीत वाहते.
ह्या नदी काठावरील अनेक घाटांवर पुष्करम मेळा भरतो. कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प हा ह्या नदीवर २०१९ मध्ये सुरू झाला.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "District Gadchiroli – Rivers & Dams". Gadchiroli.gov.in. 20 August 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 August 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Why is Telangana's Kaleshwaram Lift Irrigation Project important?". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2017-07-01. ISSN 0971-751X. 2018-04-20 रोजी पाहिले.
- ↑ "Kaleshwaram project: World's largest multi-stage lift irrigation project inaugurated in Telangana" (इंग्रजी भाषेत). 2019-06-22 रोजी पाहिले.
