Jump to content

भारताचे संरक्षणमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संरक्षणमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताचे संरक्षणमंत्री
Minister of Defence
विद्यमान
राजनाथ सिंग

३० मे २०१९ पासून
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४७
पहिले पदधारक बलदेव सिंह
संकेतस्थळ संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेनाभारतीय तटरक्षक दलासाठी सर्व निर्णय व धोरणे आखण्यासाठी जबाबदार आहे.

संरक्षणमंत्री संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

भारतीय संरक्षणमंत्र्यांची यादी

[संपादन]
नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(युती)
पंतप्रधान
बलदेव सिंह २ सप्टेंबर १९४६ १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
कैलाश नाथ काटजू १९५५ १९५७
व्ही.के. कृष्ण मेनन १९५७ १९६२
यशवंतराव चव्हाण १९६२ १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सरदार स्वर्णसिंग १९६६ १९७० इंदिरा गांधी
जगजीवनराम १९७० १९७४
सरदार स्वर्णसिंग १९७४ १९७५
इंदिरा गांधी १९७५ १९७५
बंसीलाल २१ डिसेंबर १९७५ २४ मार्च १९७७
जगजीवनराम २४ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चिदंबरम सुब्रमण्यम २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरणसिंग
इंदिरा गांधी १४ जानेवारी १९८० १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण १९८२ १९८४
शंकरराव चव्हाण १९८४ १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंह राव १९८४ १९८५ राजीव गांधी
राजीव गांधी १९८५ १९८७
व्ही.पी. सिंग १९८७ १९८७
के.सी. पंत १९८७ १९८९
व्ही.पी. सिंग २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
व्ही.पी. सिंग
चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० २६ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
शरद पवार २६ जून १९९१ ६ मार्च १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव ६ मार्च १९९३ १६ मे १९९६
प्रमोद महाजन १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
मुलायमसिंह यादव १ जून १९९६ १९ मार्च १९९८ समाजवादी पक्ष
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
जॉर्ज फर्नान्डिस १९ मार्च १९९८ २००१ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंतसिंग २००१ २००१ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
जॉर्ज फर्नान्डिस २००१ २२ मे २००४ समता पक्ष
जनता दल (संयुक्त)
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
प्रणव मुखर्जी २२ मे २००४ २४ ऑक्टोबर २००६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ए.के. ॲंटनी २४ ऑक्टोबर २००६ २६ मे २०१४
अरुण जेटली २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
मनोहर पर्रीकर ९ नोव्हेंबर २०१४ १३ मार्च २०१७
अरुण जेटली १३ मार्च २०१७ ३ सप्टेंबर २०१७
निर्मला सीतारमण ३ सप्टेंबर २०१७ ३० मे २०१९
राजनाथ सिंग ३० मे २०१९ विद्यमान

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]