समता पक्ष
समता पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | उदय मंडल[१] |
स्थापना | 1994 |
संस्थापक | जॉर्ज फर्नांडिस |
मुख्यालय | Q32/A, शर्मा कॉलोनी, बुध बिहार फेज - २, नई दिल्ली - ११००८६ |
विभाजित | जनता दल |
युती | NDA (1994 - 2003) |
राजकीय तत्त्वे | समाजवाद, राष्ट्रवाद |
संकेतस्थळ | समता पक्ष.ऑर्ग |
समता पार्टी हा एक राजकीय पक्ष आहे जो जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी 1994 मध्ये स्थापन केला होता. 2000 मध्ये पहिल्यांदा नितीश कुमार 8 दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले, नंतर त्यांनी 2003 मध्ये जनता दल (युनायटेड)ची स्थापना केली आणि समता पक्षाचे विलीनीकरण केले, परंतु ब्रह्मानंद मंडळाच्या विरोधामुळे समता पक्ष विलीनीकरण झाले नाही.निवडणूक आयोगाने पक्ष चालवण्यास परवानगी दिली, त्यानंतर ब्रह्मानंद मंडल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले[२]. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020[३] मध्ये, पक्षाने उदय मंडल[४] यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा लढवल्या पण पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही. समता पक्षाची संघटनात्मक निवडणूक नोव्हेंबर 2021 मध्ये झाली ज्यामध्ये पुन्हा ब्रह्मानंद मंडल राष्ट्रीय अध्यक्ष आणि उदय मंडल राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवडून आले[५].
मुख्यमंत्र्यांची यादी
[संपादन]नाव | कालावधी | राज्य | |
---|---|---|---|
नितीश कुमार[६] | ३ मार्च २००० | १० मार्च २००० | बिहार |
राधा बिनोद कोईजम[७] | १ फेब्रुवारी २००१ | १ जून २००१ | मणिपुर |
चिन्ह वाद
[संपादन]शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल या चिन्हाचे वाटप केले, ज्यावर समता पक्षाने दावा केला आहे. समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे,तिथे ही मागणी फेटाळली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे,परंतु अंतरीम स्थगितीसुद्धा मिळाली नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- ^ "Uday Mandal – SAMATA PARTY" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-28 रोजी पाहिले.
- ^ "BBCHindi". www.bbc.com. 2022-01-21 रोजी पाहिले.
- ^ "प्रिया रंजन ठाकुर, Samata Party प्रत्याशी | Priya Ranjan Thakur, Samata Party Candidate From Jale, Delhi Assembly Elections 2020, बिहार विधानसभा चुनाव २०२०". News18 India (हिंदी भाषेत). 2022-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-21 रोजी पाहिले.
- ^ "महंगाई व बेरोजगारी के खिलाफ किया प्रदर्शन". Hindustan (hindi भाषेत). 2022-01-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "National Office Bearers – SAMATA PARTY" (इंग्रजी भाषेत). 2022-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-21 रोजी पाहिले.
- ^ March 20, SWAPAN DASGUPTA Sanjay Kumar Jha. "Nitish Kumar's government in Bihar not outvoted as much as outmanoeuvred by Laloo Yadav". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-05-02 रोजी पाहिले.
- ^ "rediff.com: Radhabinod Koijam is new Manipur CM". in.rediff.com. 2022-05-02 रोजी पाहिले.