बलदेव सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरदार बलदेव सिंह (जुलै ११,इ.स. १९०२-इ.स. १९६१) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारताच्या घटना समितीचे सदस्य आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षणमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.