निर्मला सीतारमण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहे. त्या भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.[१] नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. सध्या ३ सप्टेंबर २०१७ पासून त्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम करीत आहेत.[२] कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्याम्हणून निवडल्या गेल्या.[३][४]

सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.[५]

वैयक्तिक जीवन[संपादन]

तमिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारमण यांचा जन्म नारायणन सीतारमण आणि सावित्री या दांपत्त्याच्या पोटी झाला. नारायणन हे रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे निर्मला यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे गेले. तिरुचिरापल्ली येतील सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर पदवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्राप्त केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची पहिली भेट त्यांचे पती परकाला प्रभाकर यांच्याशी झाली.

संदर्भ[संपादन]