उपनिषदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे. श्रीमद्भगवद्गीता हे एक उपनिषद आहे.उपनिषदेही ब्राह्मण ग्रंथातच येतात. उपनिषदालाच वेदान्त असेही म्हटल्या जाते. वैदिक ज्ञानाचे अंतिम निष्कर्ष व ध्येय यात सांगण्यात आले आहे. वेबरच्या मतानुसार २३५ उपनिषदे आहेत. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची संख्या दिलेली आहे. यामधे ईश केन कठ प्रश्न मुण्डक मांडुक्य तैतरीय ऐतरेय छांदोग्य बृहदारण्यक कौषीतकी श्वेताश्वर ही उपनिषदे प्रसिद्ध आहेत.