चर्चा:वेद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य ती संपादने करून या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०५:४८, २५ मार्च २०१७ (IST)[reply]


वैदिक संकेत

१. वेद हे अपौरुषेय आहेत.

२. गुरूजवळ अध्ययन केल्याविना विद्या प्राप्त होत नाहीं.

३. महिन्यांतल्या दोन अष्टम्या, दोन चतुर्दशा, पौर्णिमा व अमावास्या असे सहा दिवस वेदाध्ययनास वर्ज्य मानिले आहेत.

४. मृत्यूनंतर पूर्व जन्म घेण्याच्या आधींच्या काळांत जीवात्मा ज्याचा आश्रय करतो त्यास लिंग देह म्हणतात.

५. वेदाक्षरांचा उच्चार हाहि एक प्रकाराचा वायु आहे. त्याला बाह्म वायुपासून पीडा होऊं नये म्हणून वेदवेत्ते ब्राह्मण वारा सुटला असता वेदाध्ययन करीत नाहींत. (म. भा. शांति अ. ३२८)

६. सर्वशक्तींची योग्य तर्‍हेनें जोपासना करून मनुष्यानें त्याचा लय यज्ञमध्यें करावा असा रुद्रांचा संकेत आहे. (माऊली मासिक)

७. वेदाध्ययन इतिहास व पुराण ह्यांच्या साह्यानें करावें. " इतिहासपुणाम्यां वेदं समुपबृंहयेत् " (म. भा. आदि १-६७)

८. ग्रंथारंमी कार्यसिद्धि व्हावी म्हणून श्रीगणेशाचे मंगलरूप आठबावे व यास तसेच गुरु व माता पिता यांस नमन करावे असा वैदिक संप्रदायाचा संकेत आहे.