विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पानाची सुरक्षितता पातळी बदला विनंत्या[संपादन]

इतर विनंती[संपादन]

  • सुरक्षित पानांचे स्थानांतरण *वगळलेल्या पानांचा इतिहास संदर्भाच्या विनंत्या

सदस्य प्रतिबंधन पातळी बदला विनंत्या[संपादन]

सदस्य चर्चा:Mahitgar[संपादन]

(सुरुवातीला एक खुलासा करतो की, ही चर्चा Mahitgar यांच्यासाठी आहे परंतु सदस्य चर्चा:Mahitgar हे पान सुरक्षित केले गेलेले असल्याने येथे लिहित आहे. कुणीही प्रचालकाने ही चर्चा तिथे हलवावी हे प्रचालकांना निवेदन.)

झाले. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३८, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

भानामती[संपादन]

अरे भानामती झाली का काय? माझी चर्चा इथून गायब झाली. भानामती करणारा नकीच भानामतीतला जाणकार कींवा माहीतगार असेल. बघतो मागमाग जावून कुढ गेली.अशोक जगधने (चर्चा) १७:३८, ३० जानेवारी २०१३ (IST)[reply]

झाले. आपण विदागारातील जुनी चर्चा शोधू शकला असे आपल्या संपादनावरून दिसते त्यामुळे झाले ची नोंद केली.विदागारातील काही दुवे अद्ययावत करावयाचे काम बाकी आहे, ते यथावकाश केले जाईल. आपण घेतलेल्या तसदी बद्दल आभारी आहोत. आपल्या आवडीचे विश्वकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०४, ३० जानेवारी २०१३ (IST)[reply]

मोडकी पुनर्निर्देशने[संपादन]

नमस्कार,
दरम्यानच्या काळात अनेक रिकामे लेख उडविण्यात आले, मात्र त्यांना जोडलेली पुनर्निर्देशित पाने तशीच आहेत.
मी काही लेखांमध्ये साचा:पानकाढा लावला आहे, मात्र विशेष:चुकीची पुनर्निर्देशने इथे बघून ती सर्वच पाने वगळून टाकावीत.
धन्यवाद क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:००, २ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

[योग्य सहाय्य विनंतीचे उत्तर बाकी]

हॉट कॅट[संपादन]

प्रचालकांना निवेदन आहे की मरठी विपी वर हॉट कॅट हे साधन आयात करावे. - प्रबोध (चर्चा) १२:१०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

पाठिंबा. क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:२१, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
पाठिंबा. AbhiSuryawanshi (चर्चा) ०१:४२, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

पाने काढा[संपादन]

सदस्य लक्ष्मण कुंडलिक वाठोरे यांनी संपादित केलेली सर्व पाने अवैश्वकोशीय आहेत.
कृपया ती काढून टाकावीत.
क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:५१, १२ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

सदस्य लक्ष्मण कुंडलिक वाठोरे यांची संपादने मराठी विकिबुक्सच्या कक्षेच्या आसपास दिसतात. बालभारतीतून कॉपीपेस्ट नसल्यास विकिबुक्सवर नेऊन संबंधीत सदस्यांना विकिबुक्सवर संपादने करण्याचे सुचीत करता येईल किंवा कसे .

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१७, ९ एप्रिल २०१३ (IST)[reply]

पाने काढा २[संपादन]

वर्ग:रतिअभिनेत्रींवरील अपूर्ण लेख या वर्गातील सर्व लेखांमध्ये "अमुक तमुक ही एक रतिअभिनेत्री आहे" एव्हढाच मजकूर आहे. त्यामुळे या वर्गातील सर्व पाने वगळण्यात यावी. २६४ पानांवर पानकाढा हा साचा लावण्यापेक्षा इथे निवेदन देणे सोइसकर वाटते. - प्रबोध (चर्चा) ०२:११, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]


संपादन गाळणीतून रिकामी पाने टाळण्याचे आवाहनास नवागत सदस्यांचा परिणाम आणि प्रतिसाद सकारात्मक आहे. एक ओळ लेखांच्या निर्मितीचे प्रमाण वस्तुत: जाणत्या सदस्यांकडून आहे.मराठी आणि महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेल्या लेखांच्या बाबतीत एक ओळ लेखांची मर्यादीत प्रमाणात निर्मिती समजण्यासारखी असू शकते.आणि त्यावर लेखन होण्याची शक्यता असते.पण मराठी लोकांना ज्या विषयात विशेष रस असण्याची शक्यता नाही त्या परकीय पार्श्वभूमी असलेल्या लेखांचे अनुवाद त्या प्रमाणात होण्याची शक्यता कमी. चांगल्या दर्जाचे मशीन ट्रांसलेशन उपलब्ध होण्यापुर्वी अशा लेखांची(एक ओळ लेखांची) भरमसाठ प्रमाणावर निर्मिती टळलेली बरी हे खरे.
आपण वर नमुद केलेलीच नव्हे तर इतरही एक ओळ लेखांची निर्मिती जाणत्या सदस्यांकडून वेळोवेळी झाली आहे आणि अजूनही होते.पण सरसकट वगळावगळी करण्यापुर्वी जाणत्या सदस्यांना सजग करावे आणि विश्वासात घ्यावे म्हणून वेगळ्या संपादन गाळणीवर काम चालू आहे.जाणत्या सदस्यांकडून २४ तासात ५ पेक्षा अधीक नवे लहान लेख होऊ लागल्यास संपादन गाळणी त्यांना सजगता संदेश देईल. साधारणत: ३००० ते ४००० बाईट्स अंदाजे दोन परिच्छेद लेखन नवीन लेख निर्मिती करताना जाणत्या सदस्यांनी असेल असे पहावे म्हणून गाळणीत आवाहन असेल.
ऊपरोक्त वर्गीकरणातील लेख बनवणाऱ्या सदस्यांनाही त्यांचा चर्चा पानावर सुचीत करून .जे लेख ते किमान दोन परिच्छेदपर्यंत नेऊ इच्छितात तेवढे सोडून बाकी वगळावेत असे माझे व्यक्तिगत मत आहे. अर्थात इतर प्रचालक ते परस्पर वगळू इच्छित असल्यास अथवा वेगळे मत मांडू इच्छित असल्यास माझी व्यक्तिगत हरकत सुद्धा नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१७, ९ एप्रिल २०१३ (IST)[reply]

मी अलीकडील जे बरेच लेख संपादित केले ते बहुधा एकमजकुरी आहे. आधी काही लेख लिहून नंतर त्याचा विस्तार करवा ह्या हेतूने मी तसे केले. तथापि, एखादा विस्तृत लेख लिहिणे मला मध्यंतरी कठीण जात होते, त्यामुळे नंतर मी त्याचा विस्तार करू शकलो नाही. (आणि त्यामुळेच अलीकडे मी नवी पाने संपादित करणे थांबविल्याचे आपल्या लक्षात आले असेलच.) नंतर मी किंवा आणखी कोणी सदस्य जमेल तसे ह्या लेखांचा विस्तार करू शकू. तरीपण, सद्य परिस्थितीनुसार जे योग्य वाटेल ते (पाने गाळण्याची किंवा तशीच ठेवायची) करावयास हरकत नाही. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १०:४४, १६ एप्रिल २०१३ (IST)[reply]

HotCat सूचना भाषांतरे[संपादन]

Since we are using Commons version of HotCat, the default language for buttons, tooltips etc is English.
Please create translations on the mediawiki. (somehow, I am not able to translate that. Some प्रचालक might be able to create page there.

क्षितिज पाडळकर (चर्चा) १२:२४, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

Please do not update commons:MediaWiki:Gadget-HotCat.js/mr. Instead create the localized messages in मिडियाविकी:Gadget-HotCat.js/local_defaults
Per Commons:
4.Write a local file "MediaWiki:Gadget-HotCat.js/local_defaults". In that file, modify the settings and messages in the HotCat object as appropriate. (Translate the messages into the wgContentLanguage of your wiki in that file.)
5.Optionally, write local files "MediaWiki:Gadget-HotCat.js/lang", where lang is some language code ("en" for English, "fr" for French, and so on). In those files, localize the messages, tooltips, and search engine names to the appropriate language for users having wgUserLanguage != wgContentLanguage
So, I guess we should create the localized messages in मिडियाविकी:Gadget-HotCat.js/local_defaults and leave the english defaults for users with wgUserLanguage != wgContentLanguage. Let me know if my understanding is correct. - प्रबोध (चर्चा) १२:३८, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
Good point. We can do that. क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:११, १५ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
चावडी/प्रचालक निवेदन वरील चर्चा तांत्रिक चावडीकडे वर्ग केली.- दिनांक १८ मे २०१३.प्रचालकांकडून काय सहाय्य हवे ते कृ. नेमक्या शब्दात मांडावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:११, १८ मे २०१३ (IST)[reply]

संवाद[संपादन]

माहितगारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांचे चर्चा पान सुरक्षित असल्याने तेथे शक्य नाही. त्यांच्या संवाद साधण्याचा सुयोग्य मार्ग कोणता आहे, याचे कुणी मार्गदर्शन करेल काय? धन्यवाद - निनाद

झाले. संवादाचे स्वागत आहे.आपल्या विनंतीस अनुसरून चर्चा पानाची सुरक्षा पातळी कमी केली आहे.अर्थात प्रचालकीय मुल्यांकनाचा उद्देश असल्यास त्या संबधाने वेगळे उपपान आहे त्याचाच वापर करावा हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५३, १९ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
धन्यवाद!- निनाद

विकि नवीन माहिती[संपादन]

कृपया साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती मध्ये खालील माहिती समाविष्ट करण्यात यावी. संदर्भ इथे

क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:२४, ९ एप्रिल २०१३ (IST)[reply]

झाले
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०९, ९ एप्रिल २०१३ (IST)[reply]

संपादन गाळणी अकार्यान्वित करावी[संपादन]

संपादन गाळणी क्रमांक २९ ही विशेष दुरुपयोग गाळणी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने ती काढून टाकावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४९, २० एप्रिल २०१३ (IST)[reply]

आपण या विषयात लक्ष दिल्या बद्दल धन्यवाद.वस्तुत: संपादन गाळणी बद्दलच्या विनंत्या विकिपीडिया:संपादन गाळणी/अनपेक्षित क्रिया येथे जावयास हव्यात त्या प्रमाणे हि चर्चा कालौघात त्या पानावर स्थानांतरीत केली जाईल.
  • सर्वच संपादन गाळण्या वेळोवेळी अद्ययावत कराव्या लागतात, केल्या जातात त्या प्रमाणेच अभिनंदन गाळणी (क्र.२९) सुद्धा वेळोवेळी अद्ययावत केली गेली आहे.अगदी अलिकडचे विशेष:योगदान/यशोधन_वाळिंबे यांचे आपण योगदान तपासलेत तर अभिनंदन सूचना केवळ एकच वेळेस गेली आहेत आणि सदर सदस्याने त्या नंतर संपादने व्यवस्थीत पार पाडली आहेत.
  • अलिकडील बदल मध्ये अभिनंदन संदेशाचा टॅग दिसतो त्यामुळे नोंदी दोन आहेत असे दिसते वस्तुत्: सूचना एकदाच जाते आहे.
  • वस्तुत: टप्पेवार अभिनंदन आणि मार्गदर्शन या बाबतीत अभिनंदन गाळण्या कोणत्याही त्रुटींशिवाय व्यवस्थीत काम करू शकतील इतपत यश मिळाले आहे.
  • सांगकाम्याच्या बाबतीत तसेच अभिनंदन गाळण्यांच्या माझ्या स्वत:च्या सांगकाम्या मार्फत टेस्टींग होतेच आहे आणि टेस्टींग करतच पुढचे टप्पे लावले जातील आणि पुढच्या टप्प्यांना अजून बराच कालावधी आहे. ५० संपादनांनतरचे टप्पे तसेही बॉटफ्लॅग घेतलेल्या सांगकाम्यांना अडथळा होणार नाहीत कारण त्यांना अपवाद केलेले असेल.
  • बॉट्स ना पहिली पन्नास संपादने बॉटफ्लॅग शिवायच करावी लागतात त्यामुळे १० संपादनांच्या गाळणीतून(गाळणी क्र. २९मधून) पूर्ण अपवाद देता येत नाही पण पूर्ण स्वयंचलीत बॉट ना सोईचे जावे म्हणून !contains_any (summary,"सांगकाम्या") हा अपवाद जोडला आहे . बदलांच्या आढाव्यात सांगकाम्या हा शब्द असल्यास त्यांना सूचना जाणार नाही अशी व्यवस्था केली आहे. बदलांच्या आढाव्याकरिता अजून काही अपवाद जोडावयाचे सूचल्यास कळवावे त्यांचा यथोचीत समावेश करण्याचा प्रयत्न करू.
    • [(गैरसमज होऊ नयेत म्हणून एक सजगता तळटीप): ॲटो कन्फर्म न झालेल्या सदस्यांची अती वेगवान संपादने , ग्लोबल उत्पात प्रतिबंधका कडून अल्प काळ प्रतिबंधीत केली जातात. या सूचना मराठी विकिपीडियावरून येत नाहीत.]

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०७, २१ एप्रिल २०१३ (IST)[reply]

मिडियाविकी extension वाढवणे[संपादन]

मराठी विकिपीडियावर Module हे एक नामविश्व आहे याची कल्पना असेलच! हे नामविश्व वापरात येण्यासाठी Scribunto हे extension मिडियाविकित वाढवता येत असेल तर पहावे.

धन्यवाद. -- संतोष दहिवळ (चर्चा) १२:२८, २८ एप्रिल २०१३ (IST)[reply]

आपल्या विनंतीची नोंद घेतली आहे. या विनंतीची पूर्वकल्पना चावडी/तांत्रीक येथे नोंदवावी (संबधीत तांत्रीक चर्चा चावडी/तांत्रीक च्या संबधीत विभागात कराव्यात;तीथेही विषयांतरे टाळावीत हे वेगळे सांगणे न लगे) आणि त्या नोंदीचा दुवा येथील उपरोक्त नोंदीत नोंदवावा हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:४९, २८ एप्रिल २०१३ (IST)[reply]

च्चिक्कट्टून्न राहा.- हा मजकूर चावडी/प्रचालक निवेदनच्या संकेतक्र. ४.२ अनुसार " मुद्द्याला सोडून लिहिलेला मजकूर या सदरात मोडतो आणि वगळला जाईल. -प्रशासक

::इतरत्र (हा विभाग सोडून कोठेही) इतरांनी (तुमच्यासह) मुद्द्याला सोडून लिहिलेल्या मजकूरावेळी बरा पाहुण्याच्या काठीने साप मरतो या विकिपीडियावरील प्रचालकांच्या/प्रशासकांच्या स्वार्थी विचारसरणीचा मी धिक्कार करतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:३०, २८ एप्रिल २०१३ (IST) [reply]

कोणत्याही लेखनसंकेतानुसार कुठेही लिहिले तरी वरील ठळक मजकुराचा मतितार्थ बदलेल असे वाटत नाही. लेखनसंकेतानुसार अमुकतमुक ठिकाणी लिहा हे सांगणे म्हणजे सत्य नाकारण्यासाठी प्रशासकाने काढलेली स्वार्थी पळवाट आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:५९, २८ एप्रिल २०१३ (IST) [reply]
आपल्या पुर्वग्रहदुषीत असत्य असले तरी कटू वर्तनाच्या पण मनमोकळ्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.पण तरी सुद्धा प्रचालक निवेदन चावडीच्या उद्देशा संदर्भाने चर्चा होऊन संबंधीत संकेताची आखणी केली गेली आहे.मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण आणि मी वाद घालणे श्रेयस्कर ठरत नाही आणि याच कारणाने मी प्रत्यूत्तरे देण्याचे गेला काही काळ टाळत आहे संयम बाळगून आहे.आपणही संयमाने काम घ्यावे, संकेतांचे आग्रहाने पालन करणे हि पुन्हा एकदा नम्र विनंती. या चावडीचा लेखन संकेत ४.६ अनुसार प्रचालक प्रशासक विषयक आक्षेप केवळ विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथेच जावयास हवेत. -प्रशासक

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:४३, २८ एप्रिल २०१३ (IST)[reply]

दृश्यता[संपादन]

फायरफॉक्स
फायरफॉक्स
क्रोम
क्रोम
इंटरनेट एक्स्प्लोरर
इंटरनेट एक्स्प्लोरर

पानाच्या विभागाला असणार्या शब्दात जर उकार असतील तर ते दिसत नाहीत. बग नोंदवण्याची तसदी घ्यावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) ००:१२, १ मे २०१३ (IST)[reply]

ता.क. लॉगआऊट झाल्यावर उकार पूर्ण दिसतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) ०१:०१, १ मे २०१३ (IST)[reply]


मार्गदर्शन हवे[संपादन]

विद्याधर पुंडलिक आणि रेबीज या पानांच्या अलीकडील काही संपादनांना (पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा ) असा टॅग प्रचालकीय कृतीने (संपादन गाळणी) जोडलेला आहे तरी या पानातील काय काय बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करावे याचे मार्गदर्शन हवे आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १४:४३, १ मे २०१३ (IST)[reply]

संबंधीत फाल्सपॉझीटीव्हची प्रचालकांनी स्वत:हून दखल घेऊन आवश्यक संबधीत संपादन गाळणीत त्वरेने सुधारणा केली आहे. फाल्स पॉझीटीव्हज येणे हि संपादन गाळण्यांच्या बाबतीत नियमीत बाब असते.आपण लक्ष वेधले तसे संबंधीत चर्चा पानावर लक्ष वेधणे सोईचे पडते. संबंधीत चर्चेकरता वेगळे पान असल्याची मागच्या चर्चेत कल्पना दिली गेली आहे .कृपया संबंधीत पानाचाच उपयोग केल्यास सर्व संबंधीत चर्चा एके ठिकाणी उपलब्ध राहून,संदर्भा करिता तसेच भविष्यातील सहाय्य पानांच्या निर्मिती करिता बरे पडते या कारणास्तव पुन्हा एकदा विनंती.
सहकार्या करिता धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३३, १ मे २०१३ (IST)[reply]

अलीकडील बदल पानावरील त्रुटी[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

अलीकडील बदल या विशेष पानावरील त्रुटी विकिपीडिया:चावडी/तांत्रिक_प्रश्न#अलीकडील बदल पानावरील त्रुटी येथे नोंदवली आहे. सदर त्रुटी दूर करणे प्रचालकीय अधिकारक्षेत्रात येत असल्याने प्रचालकांचे लक्ष वेधण्यासाठी येथे परत नोंद केली. -- संतोष दहिवळ (चर्चा) १६:१३, १ मे २०१३ (IST)[reply]


चावडीच्या जुन्या पानांचे विभाग संपादनक्षम करुन द्यावेत[संपादन]

खाली नोंदविलेल्या चावडीच्या जुन्या पानांचे विभाग संपादनक्षम करुन द्यावेत

चावडीच्या वरील जुन्या पानांत अनेक विभाग आहेत पण त्यातील कोणताही विभाग संपादनक्षम नाही म्हणजेच विभागाच्या नावासमोर संपादन हा दुवा दिसत नाही तरी या पानांतील चर्चेचे संदर्भ दुसरीकडे देण्यासाठी wikisyntax/wikitext सह मजकूर कॉपी करता येत नाही, येतो पण संबंधित विभाग संपादनक्षम नसल्याने पूर्ण पान संपादनखिडकीत घ्यावे लागते व पानांचा आकार मोठा असल्याकारणाने हवा असलेला विभाग/चर्चा/मजकूर सापडवणे वेळखाऊ आणि किचकट बनते आहे तरी वर उल्लेखिलेल्या चावडीच्या जुन्या पानातील __NOEDITSECTION__ काढून पानांचे विभाग संपादनक्षम करुन द्यावेत. -- संतोष दहिवळ (चर्चा) ११:१२, ३ मे २०१३ (IST)[reply]


गूगल सर्चवरून आलेल्या नवागत संपादकांनी जुन्या अर्काईव्ह केलेल्या चर्चेत अजाणतेपणे संपादन/बदल करू नयेत म्हणून जुन्या चर्चांना __NOEDITSECTION__ असते. सवय असलेले संपादक विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा#विभागाचे‌_नाव असा दुवा देऊ शकतात किंवा ब्राऊजर ॲड्रेसबार मधूनही बहुतांश वेळा दुवा कॉपी करता येतो. आणि असे विभाग दुवे व्यवस्थीत कामही करतात. हा मेसेज लिहिण्यापुर्वी सुद्धा एक परिक्षण पुन्हा करून पाहिले.
>>wikisyntax/wikitext सह मजकूर कॉपी<<
हे करण्या करिता मी सर्वसाधारणत: कॉपी करावयाच्या वाक्यावरील मजकुरास क्ंट्रोल एफ ने मजकुर ब्राउजर शोधात घेऊनठेवतो आणि नंतर मुख्य संपादनात जाउ शोधून कॉपी करतो .बहुधा सध्या आपणही असेच करत असणार.समजा विभागांना संपादन आहे तरी विभाग खूप मोठा असेल तर आपल्याला तसेही हेच करावे लागते.
माझ व्यक्तिगतमत (कमी आग्रही असलेल) सध्याची पद्धत,व्यवस्थीत चालू असेल तर चालू ठेवावी.
तरी सुद्धा सदस्यांची सर्व साधारण इच्छा असेल तर जुन्या चर्चांना संपादन गाळणीतून नवागतांपासून संरक्षीत करता येईल आणि इतरांना संपादनक्षम दुवा दिसेल. इतर जाणत्या सदस्यांची /प्रचालकांच्या मतांचा आदमास घेऊन गरजेनुसार बदल करूयात.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१८, ३ मे २०१३ (IST)[reply]

जुन्या चर्चांमध्ये बदल न होऊ देणे यातच सुज्ञपणा आहे. नकलडकव करण्यासाठी ही पाने संपादनक्षम करू नयेत.

अभय नातू (चर्चा) ११:४०, ४ मे २०१३ (IST)[reply]

माहितगार सावधान[संपादन]

प्रचालकीय कार्याबद्दल सावधानता संदेश विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#माहितगार सावधान येथे हलवला आणि सुयोग्य उत्तरही नोंदवले.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०९, १९ मे २०१३ (IST)[reply]


प्रचालक निवेदन चावडीचे विषयांतर होणे टाळून केवळ सहाय्य उपलब्ध करण्या करता आपण सध्या भर देत आहोत.प्रचालकीय सहाय्य उपलब्ध करण्या करता आहे.प्रचालकांना आत्मपरिक्षणे करावयास सांगणारी निवेदने मुल्यमापन चावडीच्या कक्षेतच येतात.प्रचालक निवेदन आणि प्रचालकीय मुल्यांकन मध्ये ठळक फरक असा की प्रचालक निवेदन करावयाच्या प्रचालक कृतींच्या विनंत्याकरिता आहे. जे प्रचालकीय काम झाले आहे त्याचे मुल्यमापन मुल्यांकन चावडीच्या कक्षेतच जावयास हवे.तीथे ते अयोग्य असे ठरले तर कदाचित प्रचालक निवेदनला पुन्हा येइल पण बहूधा तशी आवश्यकताच भासणार नाही.

प्रचालक मुल्यमापन वर आपण सविस्तर चर्चा करू काही घाई नाही अभिव्य्क्ती स्वातंत्र्याची गळचेपीही नाही फक्त मुक्ततेचा अर्थ मोकाटपणा होणार नाही याची तुम्ही आम्ही सर्वांनीच काळजी घ्यायची नाही का कारण तुमच्या माझ्या पेक्षा मराठी मोठी.

सध्या काही संकेतांचे कठोरतेने पालन करून घेत आहे.प्रचालकीय कार्यात आपल्या सहकार्या करता धन्यवाद. चावडी/प्रचालक निवेदन प्रचालकीय सहाय्य देण्यापुर्ती मर्यादीत उद्देशाकरिता आहे. विषयांतरे टाळून सहाकार्य करावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१५, १९ मे २०१३ (IST)[reply]

फाँटबदल[संपादन]

आजपासून येथील फाँट आपोआप बदललेला दिसत आहे. कालपर्यंत हा फाँट पूर्ववत करण्याची सोय होती ती दिसत नाही.

नवीन फाँट (माझ्या २-३ संगणकांवर) अत्यंत अवाचनीय आहे. पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती कोणाला आहे?

अभय नातू (चर्चा) २२:३०, ११ जून २०१३ (IST)[reply]

डाव्या स्तंभात लॅंग्वेज टूलच्या बाजूस एक चक्र दिसते आहे चक्रावर टिचकी मारावी.दर्शवा निवडा भाषा च्या बाजूस टंक आहे टंकवर टिचकी मारावी लोहीत मराठी किंवा सिस्टीम फाँट ड्रॉप डाऊन मेनूत दिसतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३९, ११ जून २०१३ (IST)[reply]

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०५:५१, १२ जून २०१३ (IST)[reply]

आयपी 117.219.35.189, 14.97.112.64 आणि 117.219.35.241 ब्लॉक करा[संपादन]

वरील तीन आयपी वरून मोठ्या प्रमाणात मजकूर वगळला जात आहे. क्रुपया तीन्ही आयपींना ब्लॉक करावे. Anti delete (चर्चा) ०२:५८, २५ जुलै २०१३ (IST)[reply]

नमस्कार,अशा संपादकांकरीता सध्या विकिपीडिया संस्कृतीत अभिप्रेत अंगाचे मार्गदर्शन करणारे प्रेत्येकवेळी एक वेगळा मार्गदर्शन संदेश दिसेल अशी त्री स्तरीय व्यवस्था संपादन गाळणींच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे.हे संदेश संबंधीत पृष्ठावर संपादन करणाऱ्या प्रत्येक संपादकास दिसावयाची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांनी जेवढी अधिक सम्पादने केली तेवढा विकिपीडिया धोरणांबद्दलचा परीचय हळूवार वाढत जाईल आणि भावी संवादांकरीता सकारात्मक दृष्टीकोण होण्यास मदत होईल अशी व्यवस्था आहे. गाळणी संदेशाचा पहीला स्तर व्यवस्थीत काम करतो आहे. आणि पुढील स्तरांना अधीक सटीक करण्याचे काम चालू आहे.
अर्थात संबधीत सदस्यांनी आपापसात परस्पर संवाद साधून मार्ग काढणे सहमती साधणे अधिक उचीत असेल.उत्तराची लांबी वाढू नये म्हणून सध्या उत्तर आवरते घेत आहे. संवाद साधण्या बद्दल आभारी आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५४, २५ जुलै २०१३ (IST)[reply]

म्हणजे सध्या आयपी
१.117.219.35.189,
२.14.97.112.64
३.117.219.35.241
४ 1.38.31.127.
कडून मोठी माहिती वगळण्याचा जो कार्यक्रम चालू आहे तो उत्पात विषयाच्या बाहेरचा आहे असे दिसते.
ठिक आहे म्हणजे आता मोठा मजकुर वगळणे उत्पात सदरात मोडले जाणार नाही व अश्या आयपींना अथवा सदस्यांना उत्पात यादीत देखिल टाकले जाणार नाही.
हा नियम सर्वा विषयांवर माहिती वगळण्यात लागु पडेल का काही विषयांपुरताच मर्यादीत आहे.
::Anti delete (चर्चा) ११:३९, २५ जुलै २०१३ (IST)[reply]


उत्पात, मजकुर जोडण्यात आणि वगळण्यात दोन्हीतही असू शकतो, केवळ मजकुर जोडला अथवा वगळला एवढ्यावर उत्पाताची व्याख्या होत नाही.विकिपीडिया संकेत नितींवर कोणतीही Phd ची पूर्व अट न लावता विकिपिडिया मजकुर जोडण्यास प्रोत्साहन देतो; तेव्हा , विकिपिडिया संपादक खिडकी खाली, येथे तुम्ही लिहिलेला मजकूर कोणीही बदलू शकते हि सूचना प्रत्येक वेळी दिसत असते त्या मुळे मजकूर जोडला अथवा वगळला हे एकमेव कारण उत्पात हि संज्ञा डोळे झाकुन देण्यास पुरेसे नाही. अविश्वकोशीय मजकुर पुन्हा पुन्हा जोडणे आणि विश्वकोशीय मजकुर पुन्हा पुन्हा वगळणे या दोन्हीतही उत्पात अंतर्भूत असू शकतो.




तुमचे लेखन सध्या चालू आहे परंतु तुमचा निर्णय तुम्ही आता पर्यंत लिहिलेल्या मुद्द्या वरून दिसतो की तुम्ही ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था‎ लेखातील मजकुर वगळण्याला समर्थन देता कारण तुमच्या म्हणण्या प्रमाणे वगळलेला मजकूर अविश्वकोशीय होता. हा मजकूर अविश्वकोशीय मानुन तुम्ही मजकूर वगळण्याची परवानगी दिली कुठे हि चर्चा न करता.
Anti delete (चर्चा) १२:५९, २५ जुलै २०१३ (IST)[reply]
मित्रवर्य मी कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करत नाही आहे.मी उपरोक्त लेखनात संबधीत मजकुर विश्वकोशीय आहे अथवा नाही याचा कोणताही निर्णय केलेला नाही.प्रचालक नात्याने हस्तक्षेप करण्याची गरज भासल्यास कोणताही निर्णय शक्यतो संबधीत लेखपानाच्या चर्चा पानावर चर्चा करूनच केला जाईल. मराठी विकिपीडियाचे प्रचालक आपल्या प्रमाणेच केवळ स्वेच्छेने स्वयंसेवी काम करतात,कोणत्याही इतरांनी जोडलेल्या अथवा वगळलेल्या मजकुराचे दायीत्व घेत नाहीत.
>>हा नियम सर्वा विषयांवर माहिती वगळण्यात लागु पडेल का काही विषयांपुरताच मर्यादीत आहे.<< १) मी नियम या शब्दास विकिपीडियावर संकेत हा शब्द वापरतो. संकेत (काही अपवादात्मक स्थिती वगळता) सर्व लेख आणि विषयांवर माहिती जोडण्यास आणि वगळण्यास लागू असतो पण केवळ विश्वकोशीयता आणि अविश्वकोशीयतेच्या परीघातच. मी येथे कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा प्रमाणपत्र देत नाही आहे. आपलेही माझ्या प्रमाणेच मराठी भाषेवर नितांत प्रेम आणि तेही आपल्या व्यक्तीगत अस्मितांच्या पलिकडे जाणारे असणार आहे असा विश्वास आहे.आणि म्हणूनच सहसा कोणतेही विवाद्य विषय संबधीत लेखाच्या कक्षेपर्यंतच मर्यादीत ठेऊन,या लेखाचा बदला त्या लेखात अशा प्रकारे न होऊ देण्याची संस्कृती मराठी विकिपीडियाने आपण आणि इतर मराठी मंडळी सहकार्याच्या बळावच जपली आहे आणि पुढेही आपण सर्व मिळून एका संपन्न संस्कृतीच्या निर्मितीत सहभागी राहू असा विश्वास आणि विनम्र विनंती आहे.

मी प्रचालकीय कार्य मराठी भाषेवरील प्रेमाने आणि शक्य तेवढ्या तटस्थतेने पार पाडत असतो (मराठी विकिपीडियाकरताच्या) वेगवेगळ्या आघाड्यांवर व्यस्तही असतो त्यामुळे काही वेळा उशीर होतो आपल्या सोबत रोज दररोज मीही काही नवीन शिकत असतो.मराठी विकिपीडियापर्यंत पोहोचणारा प्रत्येक मराठीजन कोणत्याही भेदभावा विना मला आपलासा आहे. घरातली आणि मित्रमंडळी उभी हयात सोबत घालवून समजून घेण्यास अवघड जातात पण तरीही परस्पर विश्वासाच्या सहाय्याने आपण पुढे जात असतो.आम्ही आपल्या घरचे नसलो तरी मराठी आहोत दूर आहोत क्वचीतच संपर्कात येतो तर समजून घेण्यास बऱ्या पैकी कालावधी लागू शकतो हे समजण्या सारखे आहे पण तरीही विश्वास श्रद्धा आणि सबुरी या गोष्टी आपणा सर्वांना सोबत जाण्यास मार्गदर्श्क असतील तेव्हा माझ्या बद्दल, घाई घाईने निष्कर्ष काढू नयेत मीही चुकू शकतो आपल्या संवादाने आणि मार्गदर्शनाने मला उत्साह येतो तो करत रहावा हि विनम्र विनंती.

संबधित लेखपानाच्या चर्चापानावर सर्वच संबधीत सदस्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन मार्ग काढण्यास प्रोत्साहन देण्याचा मी अवश्य प्रयत्न करेन आपणही तो तसा करून सहकार्य करावे हि नम्र विनंती.

माझ्या लेखनास दीर्घ लेखनाचा दोष असल्याचे म्हटले जाते. त्या बद्द्ल क्षमस्व

आपला

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४५, २५ जुलै २०१३ (IST)[reply]


अभिनंदन व धन्यवाद.

अजुन एक विनंती आहे की शुध्दलेखनासह जेजे लोक अशुध्द हेतुने अशुध्द लेख निर्माण करतात त्यांच्या योगदान वर विकि स्ंकेतानुसार व तटस्थतेने कार्यवाही करावी.

Anti delete (चर्चा) ०३:१९, २७ जुलै २०१३ (IST)[reply]


धन्यवाद. b:महाराष्ट्र_राज्य_सांस्कृतिक_धोरण_२०१०#लेखन यात . ‘शुद्ध’ नव्हे, ‘प्रमाण’ लेखन - लेखनाच्या बाबतीत सर्वत्र आणि विशेषत: अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात प्रमाण लेखनाला शुद्धलेखन संबोधले जाते. त्याऐवजी प्रमाण लेखन असे संबोधण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे आणि महाराष्ट्र_राज्य_सांस्कृतिक_धोरण_२०१० अस्तीत्वात येण्यापुर्वीपासून माझी भूमीका अशीच आहे.मराठी विकिपीडियावर, केवळ 'प्रमाण भाषा' हे दोनच शब्द वापरले तर प्रमाण मराठी भाषा आणि मराठी विकिपीडियातील लेखन शैलीचे प्रमाण संकेत या पैकी नेमके कोणते या बाबत संभ्रम निर्माण होतो म्हणून मी अद्याप शुद्धलेखन शब्द व्यवस्थीत टाळू शकलो नाही. मराठी विकिपीडियावर त्याच्या अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल. या उद्दीष्टाशी मी जेव्हा बांधील असतो आणि प्रत्येक मराठी माणसाकडून ज्ञान स्विकारणे आणि त्याच्या पर्यंत पोहोचवण्या करता मी मराठी विकिपीडियावर लोकभाषा मराठी वापरली जावी केवळ विज्ञानासारख्या कोणत्या विषयात जिथे शब्दाचा विशिष्ट अर्थच दाखवायचा आहे तेथेच प्रमाण मराठी वापरावी असे माझे मत आहे. अर्थात हि चर्चा विकिपीडिया चावडी/धोरणच्या कक्षेत येते म्हणून अधिक लांबवत नाही.


संवाद साधण्याकरता धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५३, २७ जुलै २०१३ (IST)[reply]

शुध्दलेखनासह अशुध्द लेख[संपादन]

सध्या धूळपाटीवर नेलेल्या लेखांच्या विश्वकोशिय उल्लेखनीयते बद्दल साशंकता दिसते. तेव्हा अश्या लेखामध्ये शुध्दलेखन् किंवा इतर कारणांसाठी बदलांवर रोक घालावी.

विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था ह्या लेखातील बदल पहावेत.

२०१४ निवडनूकांच्या आधी आपल्या पक्षाचा अजेंडा लोकांपर्यत पोह्ंचवण्यासाठी अनेक कार्यकर्ते इतर व्यासपीठांसह विकि चा वापर करण्याची शक्यता आहे. शुध्दलेखनासह असे अनेक लेख तयार करण्यात आलेले आहेत.

विकि ज्ञानकोश आहे , व्यक्तीगत कोश नाही व राजकीय कोश तर मुळीच नाही तेव्हा विनाकारणाचे एडिट वॉर टाळण्यासाठी अश्या कार्यकर्त्यांच्या योगदानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

काही विचारसरनीच्या सदस्यांना सदोदीत झुकते माप मिळते यासाठी शुध्दलेखनासह असलेले अनेक लेख पहावेत व सदस्य बॅन / ब्लॉक यादी पहावी.

हि केवळ एक विन्ंती आहे , माझी विन्ंती कोणत्याही व्यक्ती किंवा विचारसरनी बद्दल नाही . व्यक्तीगत किंवा राजकीय मते नोंदवण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध असतांना विकिचा दुरपयोग टाळण्याबाबत हि विन्ंती आहे.

Anti delete (चर्चा) ०२:५४, २९ जुलै २०१३ (IST)[reply]

  • >>माझी विन्ंती कोणत्याही व्यक्ती किंवा विचारसरनी बद्दल नाही .<<
आपल्या मनाच्या मोकळेपणाच आणि तटस्थतेच स्वागत आहे.
  • >>व्यक्तीगत किंवा राजकीय मते नोंदवण्यासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध असतांना विकिचा दुरपयोग टाळण्याबाबत हि विन्ंती आहे.<<
मी आपल्याशी सहमत आहे.
>>२०१४ निवडनूकांच्या आधी आपल्या पक्षाचा अजेंडा लोकांपर्यत पोह्ंचवण्यासाठी अनेक कार्यकर्ते इतर व्यासपीठांसह विकि चा वापर करण्याची शक्यता आहे.<<
इतर व्यासपीठांपेक्षा विकि ज्ञानपीठ वेगळे आहे.अजूनही भारतातल राजकारणाच स्वरूप बहुतांश सहकार,संघटना, जनसंपर्क, मास पॉलीटीक्स ग्रामीण आणि नीमशहरी असून.माध्यमांचा प्रभाव अंशत: आणि मर्यादीत शहरी नवीन पिढी पर्यंत मर्यादीत आहे. त्यातही सध्यातरी विकि किती लोकांपर्यंत पोहोचतो या बद्दलही साशंकतेची स्थिती आहेच पण त्याही पेक्षा विकि हे माध्यम एवढ प्रचंड तटस्थ आहे की पक्षाचा अजेंडे पोहोचवण्यात त्याचा फायदा किती आणि किती नाही ते येथे येणाऱ्याने स्वत:च विचार करावा.
एवढ करूनही कुणी आलेच तर आपल्या संपादन गाळण्या निष्पक्षपणे विकिसंकेतांची सजगता संदेश देण्याची व्यवस्था आहे.
आणि सर्वात महत्वाच विकिचा ज्ञानकोशीय वाचक आपल्या प्रमाणेच वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो. या बद्दल सजग असतो आणि विकिच्या सदस्यांच्या अनुभवाने दशकपुर्तिही केली आहे.
विकिवरील लेखात लेखन केल्यानंतर त्यात इतरही लोक सुधारणा करू शकतात आणि इत:पर जिथे मतभेद असतील तर त्यांची चर्चा संबधीत लेखपानाच्या चर्चापानावर करून त्याची विश्वकोशीय संकेतांना धरून तर्कसंगत सोडवणूक करून घेणे अभिप्रेत असते.
बऱ्याचदा आपण इतर व्यक्तींच्या द्र्ष्टीकोणांबद्दल साशंक असतो म्हणून सरळ संवाद टाळतो पण पहिल्या पायरी सरळ सौहार्दपुर्ण संवादाची साधणे श्रेयस्कर असते यात आपणही पुढाकार घ्यावा.संबंधीत लेखपानांच्या चर्चा पानांवर आपल्या मुद्दांची चर्चा करावी.संबधीत सदस्यांची आपापसात चर्चा त्यांना इतर सदस्यांनी विश्वकोशीय आणि तर्क संगत मार्गदर्शन आणि प्रचालक सगळ्यात शेवटी आले तर प्रचालक पदाची तटस्थता आणि गरिमा पाळणे सोपे जाते.
>>विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था <<
याद्या (मग कोणतीही यादी असो) लेखांबद्दल विकिसमुदायांनी लवचिकता दर्शवली असली तरी मुलत: यादी लेखांना विकिपीडियात सुरवातीच्या काळात उल्लेखनीयता नाही असेच समजले जाई त्यामुळे ह्या बद्दल काळाच्या ओघात नवीन संकेत तयार होतील परंतु तो पर्यंत जो काही मजकुर आपण लिहू तो विश्वकोशीय संकेतांना अनुसरून ठेवण्याची काळजी घेणे गरजेचे रहातेच .या पानाबाबत आपण त्या पानाच्या चर्चा पानावरील चर्चा अभ्यासली असेलच. तशी ती पुढेही होईल आणि लेखात आवश्यकतेनुरूप सुधारणाही होतील पण संबंधीत चर्चापानावर आपणास हवे असलेले बदल नेमके स्पष्टपणे नमुद केल्यास इतर सदस्यांना त्याचा विश्वकोशीय संकेतांस अनुसरून उहापोह करणे सोपे पडेल.
>>एडिट वॉर टाळण्यासाठी <<
  • आपल्या या पुर्वीच्या विनंती नंतर संपादनांना संपादनयुद्धाचे स्वरूप येऊ नये म्हणून संपादने जोडताना आणि वगळली जाण्यात संपादन गाळण्यांच्या माध्यमातुन काही अधिक मर्यादा घातल्या आहेत.पण चर्चा पानावर मुद्दांची सुस्पष्ट मांडणी आणि चर्चा महत्वाची रहाते कारण संपादन गाळण्या सर्व मानवी प्रक्रीया पूर्ण करू शकत नाहीत.
  • सरते शेवटी परस्पर कुणी काहीही बदल केले तरी सरते शेवटी संबंधीत लेखपान चर्चा पानावरील चर्चा हिच त्या लेखाच्या दूरगामी स्वरूपा करता प्रभावी ठरत असते. प्रचालक म्हणून सर्व लेखातील सर्व बदल तपासून होणे किंवा सर्व पैलू एकाच व्यक्तीस लक्षात येणे शक्य नसते त्या शिवाय प्रचालक सामाजीक आणि राजकीय संवेदनशील विषयात इतर सदस्यांची चर्चा होई पर्यंत संयम बाळगण्याचे पथ्य शक्यतो पाळतात त्यामुळे, प्रचालकेतर सदस्यांनी मुद्दे मनात ठेवणे अथवा उडत उडत मांडण्या पेक्षा संबंधीत मुद्यांशी संबंधीत चर्चा संबधीत चर्चा पानावर वेळीच मांडलेली चांगली. कारण मुद्दा खूपवेळ मनात राहीला की त्याचा अचानक स्फोट होतो आणि वादविवाद विकोपाला गेल्या नंतर गुंता सोडवण्यास अजूनच कालापव्यय होतो. त्या पेक्षा संबंधीत व्यक्ती समोर संबंधीत ठिकाणी मुद्दा लगेच स्पष्टपणे मांडावा आणि नंतर संयम पाळावा समोरच्या व्यक्तीस त्यांचा मुद्दा मांडण्यास संधी द्यावी.इंग्रजीत टॉलरेट करू नका पण पेशन्स ठेवा अशा अर्थाची एक म्हण आहे.त्या सोबत 'अभ्यासोनी प्रकटावे' हि मराठी म्हण लक्षात घेत चिकित्सामक विचार प्रक्रीया बळकट केल्यास समोरच्या व्यक्तीस आपले मुद्दे लक्षात आणून देणे सोपे जाते.
>>सध्या धूळपाटीवर नेलेल्या लेखांच्या विश्वकोशिय उल्लेखनीयते बद्दल साशंकता दिसते. तेव्हा अश्या लेखामध्ये शुध्दलेखन् किंवा इतर कारणांसाठी बदलांवर रोक घालावी.<<
धूळपाटीवर लेख नेऊन अर्धसुरक्षीत करण्याचा उद्देश कोणत्याही चर्चेत सहभागी न होता केवळ संपादन युद्ध करत रहाण्याच्या प्रव्र्त्तीवर रोक लावणे आहे.खाते उघडून संपादन करणाऱ्या सदस्यांना थांबवण्याचा खरेतर उद्देश नाही.हां जर ते चर्चेत सहभागीच झाले नाहीतर वेगळ्या कृतींचा विचार करता येईल पण ज्यास शंका आहे त्याने चर्चापानावर स्वत:च्या मनातील शंका आणि आक्षेप स्पष्ट केल्यास दुसऱ्या व्यक्तीस त्या बद्दल चर्चा करता येईल त्या करता कृपया आपले मुद्दे संबंधीत चर्चा पानावर मांडावेत हि विनंती. चर्चेचा तर्कसंगत मदत करण्यास इतर जाणते सदस्य आणि शेवटी प्रचालक आहेतच.
आपल्या पुढील चर्चेसाठी शुभेच्छा. शंका वाटल्यास अजूनही चर्चा करू शकता आपले स्वागत आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१७, २९ जुलै २०१३ (IST)[reply]

RSS Feed मध्ये बदल करता येऊ शकेल इतपत तांत्रिक ज्ञान असलेल्या प्रचालक-प्रशासकांनी येथे कळवावे म्हणजे करावयाच्या बदलांसदर्भात मला त्यांच्याशी चर्चा करता येईल. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:०२, १० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

कारवाईची मागणी[संपादन]

सर्व प्रचालक आणि प्रशासक,

माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही म्हणून माझ्यासाठी लांडगा हा प्राणीवाचक शब्द उपहासात्मक अर्थाने वापरणार्या सदस्य:‎Mahitgar यांच्यावर आपण प्रथमत: कारवाई करावी अशी नम्र मागणी मी आपणाकडे नोंदवित आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) १६:०७, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]


विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत येथे स्पष्टीकरण दिले आहे.मनमोकळ्या चर्चेचे स्वागत आहे
अहो आदरणीय मान्यवर, असा अचानक आश्चर्याचा धक्का का देत आहात . आपण एकतर हि चर्चा चावडी/प्रचालकांचे मुल्यांकन वर करावी.निवेदनचा असा उपयोग या पुढे करू दिला जाणार नाही निश्चीत.
>>माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही<<
प्रत्येक गोष्ट आपणास दाखवून केली पाहिजे असे काही आहे का ? कदाचित आपणास कल्पना नसेल पण आपल्या माहिती करता संबंधीत सदस्य खात्यांवर संपादन गाळणीच्या माध्यमातून सुयोग्य निर्बंध घातले गेले होते.
>>हा प्राणीवाचक शब्द उपहासात्मक अर्थाने वापरणार्या सदस्य:‎Mahitgar यांच्यावर आपण प्रथमत: कारवाई करावी अशी नम्र मागणी मी आपणाकडे नोंदवित आहे.<<
हा कोणता नवा आरोप आहे. मी आपल्या चर्चा पानावर सुस्प्ष्ट शब्दात संवाद साधून माहिती दिली की मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणत्याही मार्गाने कुणासही अपशब्द वापरलेला नाही आणि आपणा सारख्या शिक्षक व्यक्तीशी असे वर्तन माझ्याकडून स्वप्नातही व्हावयाचे नाही. या बद्दल मी आपल्या चर्चा पानावर स्वत:हून संवादही साधला. आपण तथाकथीत उपहासात्मक उपयोगाचा संदर्भ देऊ शकाल किंवा कसे ?
आणि गोष्टी आपण मनात ठेवण्या पेक्षा वेळीच संवाद साधल्यास बरे,मनात अजूनही काही किल्मिषे समज मनात असतील तरतीही समजू द्यावीत. आपल्या सर्व चर्चा आणि आरोपांनतरही माझ्या मनात आपल्या बद्दल यत्किंचीतही किल्मीष नव्हते आणि नाही. आपल्या आरोपांनी मी दुख्खी होतो आहे पण तरीही आपले मन समजावून घेणे मला नश्चितच आवडेल.


विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत येथे स्पष्टीकरण दिले आहे.मनमोकळ्या चर्चेचे स्वागत आहे
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२७, २० ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

टाकणकार समाज[संपादन]


Wikivoyage सहप्रकल्प[संपादन]

मराठी विकिपीडियाच्या मुख्यपृष्ठावर सहप्रकल्प पाहिले तर त्यात Wikivoyage सहप्रकल्प दिसला नाही. मराठीत तो अजून सुरु झालेला नाही का? नसेल तर तो सुरू करावा अशी माझी सूचना आहे कारण मराठी भाषक माणसे आता मोठ्या प्रमाणात देशात, जगात प्रवास करू लागली आहेत. -मनोज (चर्चा) ११:१०, ९ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

उर्मटपणा[संपादन]

आणि दुर्दैवाने ऋषिकेश या नवीन लेखकाचे स्वागत फारच वाईटपणे केले गेले आहे. ते माहितगार बिचारे संकेतस्थळांवर लेखक शोधत फिरतात. आणि इथे आपणहून येणाऱ्या लेखकांना इतकी वाईट वागणूक का दिली जाते?

अत्यंत मेहेनतीने मराठी विकिविषयी कोणतीही माहिती नसतांना त्यानी तो लेख येथे आणला. इतका मोठा लेख लिहिल्याबद्दल कौतुक सोडाच पण लेख काढण्याच्या धमक्या? काही खातरजमा कराल की नाही? त्यांनी लेखातच दुवेही दिले आहेत. ते तपासले असते तरी लगेच लक्षात आले असते.

ऋषिकेश हे स्वत: एका संस्थळावर संपादक आहेत. प्रताधिकाराविषयी त्यांची मते अभ्यापूर्ण आहेत. या शिवाय मराठी विकिविषयी मनापासून कळकळ आहे. या नवीन सदस्याने इतका मोठा लेख येथे दिल्याबद्दल किमान दोन शब्द चांगले बोलण्याचे तरी सौजन्य दाखवले गेले पाहिजे होते.

अशी उर्मटपणाची वागणूक जुने सदस्य नव्यांना देणार असतील तर नवीन सदस्यांनी येथे का यावे? बरं ज्यांनी हा संदेश टाकला त्यावर साधी सही पण नाही... निनाद १६:५८, १३ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

निनाद,
ही बाब येथे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
ज्या संपादकाने असा संदेश ऋषिकेष यांना दिला त्यांच्या पानावरही हे नोंदवावे. जर निनावी संदेश असेल तर त्यासाठी काय करता येईल हे माहिती नाही. निनावी संदेशांना कितपत महत्व द्यावे ते वाचणाऱ्यानेच ठरवावे हा सुज्ञपणा.
जरी लिहिण्यात उर्मटपणा वाटला तरीही ऋषिकेष यांनी आपला अपमान झाल्याचे दाखविलेले नाही. त्यांच्या समंजसपणाची दखल घेतलेली आहे.
माहितगार यांनी लिहिल्याप्रमाणे मूळ संदेशातील प्रश्न विचारण्यात वावगे नाही. गेल्या अनेक वर्षांत अनेक सदस्यांनी आपल्याला आवडलेला मजकूर थेट नकल-डकव केल्याची अनेक उदाहरणे सापडतील. तरी एखाद्या सदस्याने (विशेषतः नवीन सदस्य ज्यांना प्रताधिकाराबद्दल कितपत माहिती असेल हे कळण्यास मार्ग नसतो) मोठा मजकूर टाकला तर प्रश्न विचारण्यास हरकत मुळीच नाही. त्यास उत्तर देण्याबद्दल ऋषिकेष यांचे धन्यवाद.
आपण स्वतःही अनेक वर्षे येथे कार्यरत आहात आणि त्याचे आम्हा सर्वांस कौतुकच आहे. आपणही ऋषिकेष यांना दोन शब्द कौतुकाचे द्यावेत ही विनंती. जुन्या सदस्याकडून दखल घेतली गेल्यास नवीन सदस्यांना बरेच वाटावे.
असो, आपणास येथील कामाबद्दल कळकळ आहे आणि तुम्ही त्यातूनच वरील संदेश दिला असे मी समजतो आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५६, १३ डिसेंबर २०१३ (IST)[reply]
धन्यवाद अभयराव. मी श्री ॠषिकेश यांच्या संपर्कात होतो. एकुण परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर त्यांनीही हे सर्व खेळीमेळीने घेतले आहे. अर्थात येथील कामाबद्दल कळकळ आहे म्हणूनच हे सर्व केले. मराठीविकीची प्रगती व्हावी याच साठी खटाटोप चालला आहे. माझ्या निवेदनाची अतिशय चांगल्या पद्धतीने दखल घेतल्या बद्दल आभार. निनाद ०४:१५, १६ डिसेंबर २०१३ (IST)[reply]
नमस्कार,निनाद यांनी संवाद विषयाचे स्मरण करवण्या बद्दल धन्यवाद.
संवादाच्या भाषेत सद्भावना आणि सौजन्य या गोष्टी महत्वाच्या आहेतच.विकिबुक्सवर उणीव दर्शन आणि टिका करताना काय काळजी घ्यावी या संदर्भाने मी काही लेखांची सुरवात केली आहे.अद्यापी सदर लेख अपूर्णावस्थेत आहेत पण त्यातील एक महत्वाची नमुद केलेली पद्धत म्हणजे सॅंडवीच थेरपी.यात संवादाची सुरवात समोरच्या व्यक्तीच्या कृतीतील सकारात्मक भागाचे कौतुकाने करावयाची मग तुम्हाला न पटलेला भाग आणि नंतर शेवट सुद्धा कृतींच्या सकारात्मक भागाचे कौतुक करून करावा.
विशेष म्हणजे आपल्या मराठी विकिपीडिया संपादन गाळण्यांच्या संरचनेत गाळणी क्रमांक ६९, सदस्यांच्या आपापसातील चर्चेत सद्भावना शब्द सुचवणीकरता राखीव ठेवली आहे.गाळणी घाईघाईने साधल्या जाणाऱ्या संवादात सद्भावना शब्दांचा अभाव असेल तर योग्यवेळी आपोआप स्मरण करून देईल. संबधीत गाळणीवर काम करण्यास वेळ न मिळाल्यामुळे सदर गाळणी अद्याप अकार्यान्वित आहे.या निमीत्ताने विकिबुक्सवरील सदर लेखांचे आणि सदर गाळणीचे कामा कडे लक्ष देईन.
तसेच वारंवार वापराव्या लागणाऱ्या संवाद संदेशाकरता साचे उपलब्ध आहेत जसे की {{copyright?}} हा साचा आहे.साचांचा संवादा करता उपयोग काही वेळा कृत्रीम वाटतो पण असे साचा संदेश मागे झालेल्या संवादांतूनच निर्मित केलेले असल्यामुळे त्यांची उपयूक्तता सिद्ध झालेली असते.माहिती आणि दुव्यात अधिक परिपूर्णता साधता येते आणि भाषा सुद्धा सुयोग्य आणि सौजन्यपुर्ण असल्याची खात्री बाळगता येते.
कॉपीराईटच्या संदर्भात काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वभाषेत लिहिण्याच्या नैसर्गिक मानवी क्षमतेच्या बाहेरचा मजकुर सुयोग्य संदेशासहीत थांबवण्यास संपादन गाळण्या अधिकाधीक परीपक्व होत चाललेल्या आहेत.अर्थात मोठा मजकुर आहे पण नैसर्गिक क्षमतेच्या आत बसणारा आहे त्यास गाळण्या फारतर दिशानिर्देश करू शकतात.
विशेषणे टाळण्याच्या आणि वर्णनात्मकता इत्यादी टाळण्याच्या गाळण्या संपादने अशी संपादने व्यवस्थीत टिपू शकतात.वर्णनात्मकता आणि विशेषणे काढली तरी मजकुराच्या कॉपीराईटचे प्रश्न बऱ्यापैकी हलके होण्यास मदत होते.पण या संपादन गाळण्यांचा दुसरा अनुभव संबधीत सजगता संदेशांची संपादक पुरेशी दखल घेत नाहीत.या यूजर बिहेवीअरचा अभ्यास करून संबंधीत काही गाळण्यातील सजगता संदेश रद्द करावे लागले.त्या जागी सेमी ॲटोमेटेड बॉट्स वापरता येतील.गाळण्या अशी संपादने टिपण्याचे आणि शक्य फाल्स पॉझीटीव्हजच्या अभ्यासाची संधी देतात.सेमी ॲटॉमेटेड बॉट्स फाल्स पॉझीटीव्हजचा अभ्यास काळजी आधीच घेऊन बनवले गेल्यास संपादन गाळणीने टिपलेली अशी संपादने क्रॉल करून वेगाने बदल करून देऊ शकतील. अर्थात या सर्व स्वयमेव गोष्टीं आदर्श अवस्थेत उपलब्ध होण्या साठी अजून बऱ्या पैकी कालावधी लागेल.
अजूनही काही चांगल्या आयडीया सूचल्यास उपयूक्त ठरतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:१९, १४ डिसेंबर २०१३ (IST)[reply]
धन्यवाद माहितगारशेट, तुम्हीही त्वरेने यात लक्ष घालून ऋषिकेश यांच्या पानावर संवाद साधल्या बद्दल धन्यवाद. संवादाच्या भाषेत सद्भावना आणि सौजन्य या गोष्टी महत्वाच्या आहेतच या विषयी मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. तुम्ही बनवत असलेल्या गाळण्या काही काळाने व्यवस्थितपणे चालू लागतील आणि मग कदाचित अशी वेळ येणार नाही. तुमच्या शैलीदार आणि सर्व खाचा खोचा आणि त्यावरील चालू असलेले उपाय समजावून सांगणाऱ्या प्रतिसादा बद्दल परत धन्यवाद निनाद ०४:१५, १६ डिसेंबर २०१३ (IST)[reply]
निनाद, ऋषिकेश ह्यांच्या चर्चापानावर तो मेसेज मीच टाकला होता, सही करायची राहून गेली असावी. सध्या अनेक कॉपी पेस्ट केलेले लेख तयार होताना दिसत आहेत. ह्या लेखाचा इतिहास पाहिल्यास केवळ १८ मिनिटांत प्रचंड मोठा लेख तयार झाला होता. ह्यावरून मला हा कॉपी पेस्टचा प्रकार वाटला. मशीन ट्रांसलेशन केले असावे हे माझ्या ध्यानात आले नाही. ह्याबद्दल ऋषिकेश ह्यांची मी माफी मागतो. - अभिजीत साठे (चर्चा) ०७:२३, १४ डिसेंबर २०१३ (IST)[reply]
अभिजीतराव मला वाटते माफी वगैरेची आवश्यकता नाही हो! तरी तुम्ही माफी मागताय हा तुमचा मोठेपणा आहे. अशा घटनातून उमदा स्वभाव जाणवतो. असे सदस्य येथे आहेत हेच मराठी विकिचे मुख्य आधार आहेत. तुमची कॉशन योग्य होती या विषयी माझ्या मनात शंका नाही. पण नवीन लेखकास विकिच्या संवादांची आणि संवाद साधनांची कल्पना येई पर्यंत काही वेळ लागतो. त्यात सदस्य दुखावला गेला आणि परत आलाच नाही तर काय, अशी मला भीती वाटते. त्यात ऋषिकेश सारखे मेहेनती, समतोल विचारांचे, आंतरजालाची प्रताधिकारांची खोल जाण असणारे सदस्य आपण अजिबात घालवता कामा नये हे माझ्या मनात होते. असो हे प्रकरण आता अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आहे. तेव्हा सर्वांना त्वरेने लक्ष घालून संवाद साधल्या बद्दल धन्यवाद! कळावे असाच लोभ असावा आणि वृद्धींगत व्हावा हीच सदिच्छा! आपला निनाद ०४:१५, १६ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

दोन्ही पाने बघावीत[संपादन]

कृपया हे आणि हे दोन्हीही पाने बघावीत. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४१, १३ जानेवारी २०१४ (IST)[reply]

धीर धरण्याची विनंती[संपादन]

मायबोलीवर केलेल्या जाहिरातीचा परिणाम म्हणून काही नवीन लेखक मरठी विकीकडे वळत आहेत. हे लेखक विकिवर नवीन असल्याने सुरुवातीला काहीवेळा चूका होण्याची शक्यता आपण गृहीत धरली पाहिजे. यास्तव मी सर्व प्रचालकांना व प्रबंधकांना विनंती करतो की नव्या लेखकांबाबतीत थोडा सबूर ठेवावा. प्रोत्साहन देणारा संवाद साधावा. यामुळे हुरुप वाढून येथे लिहावेसे वाटेल. मी ही लक्ष ठेऊन आहे आणि मदतीचा प्रयत्नही करतो आहे. आशा आहे की आपल्याला लवकरच अजून लेखक मिळतील. आपला विनित निनाद १६:३४, २५ जानेवारी २०१४ (IST)[reply]

आपले व्ही नरसीकर साहेब यांनी नवीन लेखकांना फार छान प्रोत्साहन दिले आहे याची नोंद येथे केलीच पाहिजे! निनाद १७:०९, २५ जानेवारी २०१४ (IST)[reply]

विकीपिडीयावर मुळ लेखकाची परवानगी न घेता लेख टाकण्यात आलाय.[संपादन]

नमस्कार! मी इथे नविनच सदस्यत्व घेतलं आहे. मी लिहिलेला हा लेख इथे www.khandeshkanya.blogspot.in/2011/09/blog-post.html आणी इथे http://www.maayboli.com/node/29490 विकीपिडीयावर कुणीतरी माझी परवानगी न घेता इथे टाकलाय. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE

कृपया हा लेख त्वरीत काढुन टाकण्यात यावा,ही विनंती

उपरोक्त सही न केलेला संदेश सदस्य:Nayana Sonie यांनी प्रस्तुत केला असण्याची शक्यता आहे.
झाले.
नमस्कार प्रथमत: आपणास झालेल्या तसदी बद्दल खेद व्यक्त करतो.उचलेगिरी आणि प्रताधिकार उल्लंघनाकडे लक्षवेधल्या आणि जागरूकते बद्दल धन्यवाद. सदर मजकुर संबंधीत लेखातून वगळून त्यावर आता पानकाढा साचा लावला आहे.
आपण मराठी विकिपीडियाचे सदस्यत्व घेतलेत या बद्दल आभार. आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:४१, ३० जानेवारी २०१४ (IST)[reply]
माहितगारसाहेब, तातडीने लेख वगळल्या बद्दल धन्यवाद! हे मी लेखिकेस मायबोलीवर कळवले आहे. आशा आहे मराठी विकिपिडियाला एक सशक्त लेखिका लवकरच मिळेल. हा दुवा पाहा http://www.maayboli.com/node/47348#comment-3018463 येथे मी मराठी विकिच्यावतीने सदस्यांना येथे लिखाण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. येथे इतरांना येण्यासही निमंत्रण देत आहे. या धाग्यात काही सुधारणा असल्यास अवश्य कळवाव्यात! निनाद ०३:३१, ३१ जानेवारी २०१४ (IST)[reply]
निनाद नमस्कार आपला मायबोलीवरील धागा पाहीला मला वाटते की आपण अधिक माहिती द्यावयास जावे आणि कृत्रिमता यावी या पेक्षा चर्चा व्यासपिठांच्या दृष्टीने तो तसाच चांगला आहे असे वाटते. नाही म्हणण्या करता उर्दू कसे शिकावे पाककृतीकशी करावी हे विषय मराठी विकिबूक्सच्या बंधूप्रकल्पाच्या कार्यकक्षेत येतात त्या बद्दल संबंधीतांना केव्हा कल्पना दिलेली बरी हे आपणच अधिक व्यवस्थीत ठरवू शकाल. या पुर्वी मायबोलीवर संपादने थॉन अभियान आणि विकिपीडियाची रिक्षा अभियानाच्या वेळी सुद्धा मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद मिळाला असे आठवते तसाच प्रतिसाद आपल्या धाग्यासही मिळतो आहे.
मीही अशात गीतारहस्य विषयक मि.पा. वर धागा काढला होता त्यास तिथे भरभरून प्रतिसाद मिळाला आणि मुख्य म्हणजे तेथिल सहकार्यातून संपूर्ण गीतारहस्य विकिस्रोत बंधू प्रकल्पास उपलब्ध झाले.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिने हि मराठी संकेतस्थळांवरून अभियान राबवण्याकरता निश्चितच चांगले छान प्रतिसाद मिळतो. या निमीत्ताने शुभेच्छा आणि धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४५, ३१ जानेवारी २०१४ (IST)[reply]

रमेश मंत्री[संपादन]

मी त्यांचा मुलगा आहे. मला त्यांच्या विषयी बरीच माहिती द्यायची आहे. कशी द्यावी ते कळवावे.

राजेंद्र मंत्री

सदस्य चर्चा:Rajendra1956 येथे प्रतिसाद नोंदवला. अजून काही शंका असल्यास पुन्हाही संपर्क करावा. आपणास शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०१, ७ मे २०१४ (IST)[reply]

चाळणी[संपादन]

khandoba-jejuri.blogspot.com या संकेतसथळाच्या खंडोबा या पानावर असलेल्या नोंदीमुळे या पानावर केलेले संपादन बदल जतन होऊ शकले नाही. ? -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:५७, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

नोंद घेतली तपासतो आहे. माहिती साठी आभार
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:०७, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]
हो हि सूचना मलाही धूळपाटी पानावर khandoba-jejuri.blogspot.com जतन करताना मलाही तुम्ही जतन करू इच्छित असलेले पान केर-उत्पात रोधक चाळणीने प्रतिबंधित केले आहे. अशी सूचना आली. अर्थात तरीही १०० टक्के हि क्रिया मेटा ब्लॅकलिस्टींगने केली आहे आणि मराठी विकिपीडियाच्या संपादन गाळण्यांनी केलेली नाही.
बहुधा वैश्विक फिल्टरद्वारा थांबवली गेली असावी असा अंदाज आहे. सर्वच ब्लॉगना प्रॉब्लेम येतो आहे अथवा या ब्लॉगचालकांनी इंग्रजी किंवा इतर विकिपीडियांशी खूपवेळा पोस्ट करून पंगा घेऊन अस्विकार्य यादीत नोंदले गेले आहे हे तपासावयास हवे. इन एनी केस किमान प्रचालकांनी जतन करताना थांबवले जावयास नक्कीच नको.
मी अधिक शोध घेतोच आहे तुम्हालाही काही माहिती मिळाल्यास अवश्य कळ्वणे.
माहिती साठी आभार
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२२, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]
@संतोष दहिवळ: मेटावरील या बॉट रिपोर्टने अनामिकपणे पुन्हा पुन्हा दुवा जोडण्याचे प्रयत्न नोंदवले असावेत असे दिसते. त्या नंतर या मेटा ब्लॅकलिस्ट च्या माध्यमातून khandoba-jejuri.blogspot.com आणि jejuri\.net थांबवले गेले आहे. संबंधीत संकेतस्थळाच्या उल्लेखनीयते विषयी आपण आश्वस्त असल्यास स्थानिक स्तरावर (मराठी विकिपीडियावर) आपण एखादा दुवा व्हाईट लीस्ट करू शकतो. (तसे करून हवे असल्यास स्पेसीफीकली सांगावे). अर्थात मेटा ब्लॅकलीस्टींग रद्दकरण्याची वैश्विक विनंती करावयाची असल्यास मात्र मेटावर न्यावी लागते.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:११, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

@Mahitgar:या संकेतस्थळाचे मराठी विकिपीडियावर दोन ठिकाणी तर इंग्रजी विकिपीडियावर दहा ठिकाणी दुवे नोंदवले गेले आहेत. संभवत: May 2010, June 2010 आणि February 2011 या चर्चांचा या संकेतस्थळाला अवरोध करण्यामागे संबंध असावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:२०, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

पुन्हा आता माझ्यापुढे प्रश्न असा आहे की दहा-बारा दिवसांपूर्वी या संपादनाच्यावेळी वैश्विक गाळणीने अवरोध का केला नसावा ? -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:३३, १८ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

माहितीसाठी आभार. मला वाटते अवरोध 'वैश्विक अवरोध यादी'ने (ब्लॅकलीस्ट) ने केला आहे. अवरोध यादी तेवढ्या विशीष्ट शंब्दांपुरती क्रिया मर्यादीत ठेवण्यात अधीक यशस्वी होत असाव्यात. (त्यामुळे आपण म्हणता ते संपादन डायरेक्टली लागू पडत नाही) संपादन गाळण्यात सर्वसाधारणपणे आजुबाजूचे क्षेत्रही गृहीत धरले जाते तसे अवरोध यादीत होत नसावे. (संपादन गाळणीतही अत्यंत विशीष्ट क्षेत्र नमुद करता येते पण त्यासाठी अधीक स्रोत खर्च होतात.) .चु.भू.दे.घे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:३६, १९ ऑगस्ट २०१४ (IST)[reply]

correction of main page[संपादन]

I request u to correct the main page. Their is mistake in order of writing the वर्ग it written as " व स श ष ह ". Instead it shld be " व श ष स ह ". As I have not get right to edit main page, so I request any one to correct this minor mistake.

उपरोक्त सही न केलेले लेखन सदस्य Akshay Deokar यांनी केले असावे असे प्रथम दर्शनी दिसते.


झाले.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३४, २९ जून २०१५ (IST)[reply]

फुफ्फुसाचा कॅन्सर[संपादन]


पदभ्रमण ( भटकंती )[संपादन]


वी.पी.च्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन[संपादन]

मला प्रचालकांचा संपर्क इ पत्ता हवा आहे. जेणेकरून मी त्यांना शंका विचारू शकेन. हे कसे करावे हे अद्याप मला माहिती नाही.

मराठी विकिपीडिया साचा documentation[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (माझी विनंती मागे घेतली).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

प्रचालकांना विनंती कि ते हा कोड मिडियाविकी:Common.css ला टाकावे यांनी साचेला रंग येते.

/* For template documentation */
.template-documentation {
    clear: both;
    margin: 1em 0 0 0;
    border: 1px solid #a2a9b1;
    background-color: #ecfcf4;
    padding: 1em;
}

अधिक माहिती करिता पाहावे https://en.wikipedia.org/wiki/User_talk:Jonesey95#Marathi_Wikipedia --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२६, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

टायवीन, याचे एखादे उदाहरण देता येईल का? हा रंग असलेला साचा आणि नसलेला साचा यांची चित्रे (किंवा उदाहरणे) असल्यास हा commons.css मध्ये घालावे कि नाही यावर प्रचालक तसेच इतर सदस्यांना मत देता येईल.
अभय नातू (चर्चा) ११:२९, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
@अभय नातू: हो मास्टर, हा साचा पाहा साचा:माहितीचौकट वह en:Template:Infobox यात अंतर रंगांचे आहे.आकर्षित करण्यासाठी याचा वापर करावे असे विनंती
अन्य रंग असेल तरीही चालेल पण सगळे विपीवर हिरवा आहे यामुळे हिरवा रंग कोड दिला.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:४९, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

धन्यवाद.
असा रंग बदलण्यास माझा पाठिंबा आहे. इतरांचे मतही जाणून घेउयात.
अभय नातू (चर्चा) ११:५३, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
इन प्रिंन्सीपल साचा डॉक्यूमेंटेशन पेजला वेगळा रंग असण्यास हरकत नाही. किंबहूना साचा:पोकळी मध्ये डॉक पेज बद्दलची माहिती हिरव्या रंगात दिसते आहे पण संपूर्ण डॉक पेजेस वेगळ्या रंगात दिसण्याची व्यवस्था नाही आहे का हे तपासावे.
टेक्नीकली साऊंड पद्धतीने बदल केला जात असेल तर हरकत नसावी. हे माझे मत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२९, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
माझा विरोध आहे.तो रंग माझ्या-मते नीट दिसत नाही. आहे तोच राहू द्यावा.--वि. नरसीकर (चर्चा) २०:१५, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
नरसीकरजी,
उदाहरण देता येईल का?
अभय नातू (चर्चा) २०:२५, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
@V.narsikar: आपले उत्तर अपेक्षित आहे---टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:२०, ३ मार्च २०१७ (IST)[reply]
लाईट रंग डोळ्याला सुखावणारे असतात.(green is an eye tonic -असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.) साचा:माहितीचौकटen:Template:Infobox या दोहोंतील रंग माझ्या ब्राउझरमध्येतरी सारखेच दिसत आहेत.जास्त ब्राईट पृष्ठभूमीवर/रंगांवर असलेला मजकूर वाचावासा वाटत नाही.येथे विकिवर महत्त्वाचा तो मजकूर असतो. नाटकातील देखावे/नेपथ्य थोडेसे कमी-जास्त झाले तरी, अभिनेते ताकतीचे असतील तर,ते गौण ठरते. हवे तर स्काय ब्ल्यू तोही अत्यंत फिकासा असेल तर चालेल. User:Tiven2240 यांची आतावरची संपादने बघता त्यातील रंगसंगती भडक दिसते. तरीपण, सर्वानुमते बदल होत असतील तर मी एकटा बापडा काय करील? योग्य ते ठरवा अशी विनंती आहेच व ठरवालच ही खात्रीही आहे. बदल कधीही चांगलाच असतो पण तो योग्य रितीने व्हावा ही अपेक्षा.--वि. नरसीकर (चर्चा) १३:३७, ३ मार्च २०१७ (IST)[reply]

@V.narsikar: मी कधी बापडा हा शब्द कोन्हाला वापरला नाही. हर गोष्टीचे दोन बाजू असते. विरोध करणे योग्य आहे यांनी आपल्याला चूक माहीत पडते. भडक रंगविषयी अभय साहेब यांनी सांगितले मुखपुष्ठची ती कल्पना मला समजली की फिका रंग असावा. माझ्या मनात विचार असा की रोज डाळ का काही वेगळे मेनू असेल तर संपदनात मजा येईल फिका रंग असला तर स्मशानभूमी वाटते परंतु रंग आकर्षक असेल तर जास्त लोग प्रोत्साहित होतील. लोकांना काही वेगळा पाहिजे कारण ही डिजिटल दुनियात नवीन बदले होतात. मी माझा प्रस्ताव या विचाराने मांडला होता जर ते जोग्य नसेल तर प्रस्तावाला नकार करा कारण मला एक्सपेरियन्स नाही फक्त ६ महिनात १००० संपादन केला आहे गैरसोयीबद्दल क्षमस्व --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:२२, ३ मार्च २०१७ (IST)[reply]

बापडा=poor fellow (in nature)(nothing concerning with Father=बाप) - मी लिहिले आहे कि सर्वानुमते करावे (बाय मेजॉरिटी).
  • >>फिका रंग असला तर स्मशानभूमी वाटते<< - (Different people have different tastes)
  • >>गैरसोयीबद्दल क्षमस्व<< - माझी काहीच गैरसोय झाली नाही.
  • (It is not necessary that one gets 100% votes to every proposal everywhere. It is to be passed by majority)
--वि. नरसीकर (चर्चा) १४:३९, ३ मार्च २०१७ (IST)[reply]


Bot करिता मदत हवी[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (माझी विनंती मागे घेतली).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

माननीय प्रचालकांना ठाऊक असेल मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती म्हणून मी सुरवात केली होती. याचे संधर्भात मी काहीक विकिपीडियन सोबत संवाद केला, परंतु खूप शोध घेतला वह एक विचार केला की याचा समाधान आपल्याला बॉट करू शकते. इंग्लिश विकिपीडियावर एक प्रचालकांनी सुंदरसा बॉट निर्माण केलाय. (MifterBot) नावाचा हा बॉट आपल्याला खूपच काम येणार. याचा निर्माण करणारे व्यक्ती सोबत मी संवाद साधला ते तयार आहे मदत करायला परंतु भाषणतर करण्यास वह बॉट सपोर्ट करण्यास तुम्ही मदत करा आपले मत याविषयात द्यावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:२८, १६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


कॉपीराईट च्या संदर्भाने मागे संतोष दहिवळांनी बॉट वापरलेला आहे, बॉट येणाऱ्यांपैकी ते तुलनेने कॉपीराईट विषय जबाबदारीने हाताळतात.
टायवीनच्या उत्साहावर पाणी टाकावे वाटत नाही परंतू कॉपीराईट ज्ञान अद्यापी प्राथमीक स्तरावरही आलेले नाही, इतरही क्षेत्रात प्रमाण मराठीच्या संदर्भाने त्यांना अभ्यस्त होण्यास बराच कालावधी लागेल तेव्हा त्यांना बॉट वापरण्यास परवानगी देण्या बाबत मी साशंक आहे.
टायवीन त्यांच्या बोली भाषेत परिच्छेद लेखन चांगले करु शकतात आणि त्यांनी तुर्तास त्याकडेच लक्ष द्यावे, मराठी विकिपीडिया साठी कंटेंट पॅरेग्राफ रायटींग प्रियॉरीटी आहे. ॲडमिनीस्ट्रेटीव्ह गोष्टींना प्रियॉरीटी देण्यासाठी त्यांनी प्रचालक आणि जाणत्या सदस्यांना प्रेशर टाकून प्रियॉरीटीज बदलणे योग्य नाही. असा माझा त्यांना सल्ला आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३८, १७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


मुखपृष्ठ[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (done).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

@Mahitgar:@अभय नातू:@V.narsikar:

आपले मराठी विकिपीडिया मुखपृष्ठवर मराठी भाषा गवरव दिवस असा उल्लेख केलेला दिसतो. माननीय प्रचालक @Rahuldeshmukh101: यांनी खूप मेहनत घेतली आहे यात. काही ठिकाणी ते चुकले आहे असे मला वाटते तुम्ही त्यात आपले योगदान द्यावे असे माझी विनंती

1= मराठी विकिपीडियाचा मुखपुष्ठवर काही व्हिडिओ दिले आहे ज्याचे मूळ स्रोत कॉमन्स आहे. मी ते पहिले परंतु त्यात स्रोत own work असे दिले आहे. माज्या दृष्टीत ते काही गडबड दिसते. स्वतः जर विडिओ केले आहे तर महाराष्ट्र शासन असे का दिले आहे? जर विडिओ cc4.0 licence नसेल तर कृपा मराठी विकिपीडियाचे इंटर्नल अपलोड विझर्ड वर चदा. कंमोंसवर copyrighted विडिओ चालत नाही.

2= चित्र:3515265-lg.jpg यात मंत्री मोहोदयचे चित्र दिले आहे यात उचित टॅग नाही दिले आहे परंतु या चित्रात गडबड दिसत आहे (ओव्हर रायटिंग)

मराठी मुखपुष्ठ खूप लोग पाहतात जर आपण कायदेचे पालन केले नाही तर आपण दुसऱ्याला काय उधारण देणार. जर मी चुकलू असेल तर मला मार्गदर्शन घ्या परंतु जे वर प्रसन्न मी दिले आहे त्याचा समाधान व्यक्त करा --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:५७, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@Rahuldeshmukh101: चित्रांचे टॅग लावण्याकरिता धन्यवाद. व्हिडिओच्या बाबत डॉ. विजय भटकर वह श्री. सुदीप नगरकर यांचे विडिओ https://marathibhasha.maharashtra.gov.in/Site/Home/index.aspx#content दिले आहे. हे दुवे youtube वर घेऊन जाते. ज्याचे लायसन कंमोंसवर मान्य नाही. माझी विनंती असे विडिओ मराठी विकिपीडिया:संचिका चढवा इथे चढावे वह उचित टॅग घ्यावे. मराठी विकोपेडियाची अपमान नाही व्हावी अशी माझी अशा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२२, २६ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


मराठी भाषा गवरव दिन[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे .जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

@अभय नातू:@V.narsikar:@Mahitgar: मराठी भाषा गवरव दिनाची शुभेच्छा

माझी विनंती अशी की आज जे नवीन लेख येतील त्याला पान काढा साचा नाही लावू परंतु सर्व आज निर्मनीत लेख वर्ग:मराठीदिवासलेख यात असो. प्रोत्साहन देण्यास सदस्य चर्चापणावर {{subst:२७feb धन्यवाद}}~~~~ असे संदेश असावा.. यात आपले मत द्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:४९, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख असा वर्ग मराठी भाषा दिवसास संपादीत लेखांच्या चर्चा पानावर लावावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. सदस्य चर्चा पानावर प्रोत्साहनपर संदेश देणे चांगली कल्पना आहे. पानासाठी 'फेब्रुवारी' असे देवनागरीत लिहावे. शुभेच्छा आणि आभार
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५८, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


आर्टिकल विझर्ड[संपादन]

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (माझी विनंती मागे घेतली).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: यांनी "कोणत्या विषयावर लिहायचं ? त्यासाठी नवं पान कुठे उघडते ? असं खूप विद्यार्थ्यांनी विचारलं." असे आपल्या कार्यशाळा अनुभवत म्हटले. या करिता आर्टिकल विझर्डची सुरुवात मराठी विकिपीडियावर ही करायची असे मला वाटते. यांनी आपले खूप काम सोप्प होणार नवीन लोकांना मार्गदर्शन ही मिळणार. इंग्लिश वह हिंदीवर हे सुविधा उपलब्ध आहेत याची एक version मराठीवर यावी म्हणून निवेदन. प्रचालकांना जर जमले तर याचे निर्माण करा --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:०६, १ मार्च २०१७ (IST)[reply]

संतोष दहिवळांनी यावर काही काम केले आहे असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१५, १ मार्च २०१७ (IST)[reply]

सर ते कामाची माहिती जर दिली तर चांगले होणार --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:३०, १ मार्च २०१७ (IST)[reply]

@संतोष दहिवळ: चर्चा व मार्गदर्शनाची विनंती
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३३, १ मार्च २०१७ (IST)[reply]
@Mahitgar: बघतो. सध्या कुठे काय केले ते आठवत नाही.
पण नवीन Article साठी शक्यतो {{विकिपीडिया:नवीन लेख बनवा}} हे पान वापरावे.
नवीन लेख बनवा...
-- संतोष दहिवळ (चर्चा) ०९:०१, १ मार्च २०१७ (IST)[reply]


विकिमीडिया भारत[संपादन]

http://wiki.wikimedia.in/Marathi इथे पहा व मराठीची माहिती द्यावे असे वाटते --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:००, ४ मार्च २०१७ (IST)[reply]

मुखपृष्ठ २०१७ (प्रस्ताव व अंमलबजावणी)[संपादन]

दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ मी @Mahitgar: चर्चा:मुखपृष्ठ इथे इंग्लिश भाषेत नवीन मुखपृष्ठ/पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव टाकला होता. त्याविषयावर अनेक प्रचालांची संवाद झाले. यावर @Rahuldeshmukh101: यांनी माझ्या चर्चापानावर मुखपृष्ठ सुधारण्याचा स्वर्ण संधी दिली. त्यांचा बोलण्या प्रमाणे मी सदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ इथे आपले काम सुरु केले. या वेळी @अभय नातू: यांनी @Nitin.kunjir: सोबत सदर निवडले आणि त्याची पहिला टेस्ट मी धूळपाटीवर केला. मथळा करीता झालेली चुके @V.narsikar:@संतोष दहिवळ: यांनी सुधारविली काही वेळी सूचना शिफारसी आणि दुरुस्त्या भेटली त्याचे संपूर्ण द्यान ठेवून मी याची संरचना/पुनस्थापान केली. रंगाच्यामाती काही दुरुस्ती मी केली आहे जर काय चुकले असेल तर आवश्यक ते करावे

वैशिष्ट्य[संपादन]

मुखपृष्ठ मराठी विकिपीडियाची शान आहे याकरिता मंदिर कसे सजवतात तसे याला सजवले गेले आहे. पहिला वेळी याची संग्रचना विविध रंगात केली आहे याचे जे बॉर्डर आहेत त्याला कर्व्ह दिला आहे ज्यांनी ते आकर्षित दिसते. काही वेगळे असला पाहिजे म्हणून मी इतर विकीच्या पान पहिले कमीच ५० शोध घेतल्यावर मी मथळा पोर्तुगी विकिपीडियापासून रचित केला. दालन यात रंगबिरंगी असून थोड्याजागेत जास्त दालन असा हा मथळा.हा युग सोसिअल मीडियाचा आहे यामुळे पाहिलांडा सोसिअल मीडिया प्लग-इन मराठी मुखपुष्ठ वर दिला आहे

आजचे चलचित्र[संपादन]

आजचे चित्र रोज पाहती परंतु आजचे चलचित्र असा संतोष दहिवळ यांनी मराठी विकिपीडियाला भेट दिली आहे.

आयकॉन व इतर[संपादन]

आयकॉन सदर व इतर विभागाचे बद्दल केले आहे. नवीन व आधुनिक तर्फेच्या आयकॉन घातला आहे. विराट कोहली लेखकरिता मी चित्र शोधला आहे हे सदर म्हणून मुखपृष्ठवर आहे. इतर म्हणजे index बदलून आधुनिक index बनवला आहे यांनी १ साच्यात २ काम होते. पहिला वेळी नवीन लेखाची संरचना मुखपृष्ठवर होणार. नवीन काळ्या रंगाचे भारतीय विकिपीडियाची माहिती दिली आहे यात विकिमीडिया एक सूर्यमाला असे रचना आहे.

पर्ज[संपादन]

इतकी फीचर असले तर लोड होण्याकरिता गडबड नाही झाली पाहिजे म्हणून मुखपुष्ठ पर्ज अशी खाली एक छोटी बटन दिला आहे.

काम[संपादन]

जे नवीन पान बनवले असेतील त्यांना सुरक्षित करणे व जर काही संपादन करायचे असेल तर करावे व याचे सोर्स मुखपृष्ठवर कॉपी करणे.

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीत --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:२०, ७ मार्च २०१७ (IST)[reply]

यावर जर काही आपत्ती नसेल तर आज महिला दिवशी याला प्रकाशीत करा --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४९, ८ मार्च २०१७ (IST)[reply]


आपण खूप छान प्रयत्न केला आहे त्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद, तरीही काही गोष्टी वेगळ्या आहेत, अजून अभ्यासाव्या आणि सुधारीत कराव्या लागतील म्हणून जरासा अधिक वेळ लागेल.
तो पर्यंत महिलां विषयी काही लेखन करुन पहावे. शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:००, ८ मार्च २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: कृपा जर अभ्यासाचे व सुधार करायला थोडे कष्ट घ्याल तर मेहेरबानी होईल १ तारिकेले फक्त ३ दिवस बाकी आहेत --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२०, २९ मार्च २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: आपण कष्ट घेतले म्हणून धन्यवाद. पृष्ठ १ एप्रिल २०१७ यादिवशी अंमलबजावणी कराल अशी शेवटची अशा ठेवून हे संवाद इथेच थांबू. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:०१, ३१ मार्च २०१७ (IST)[reply]
आपले कदाचित साईट नोटीसवरील संदेशाकडे अद्याप लक्ष गेले नसावे, किंवा ब्राऊजर कॅशे रिकामी न केल्यामुळे दिसत नसावा. इतर प्रचालक १ एप्रिल किंवा इतर कोणत्याही दिवशी बदल करण्यासाठी वेळ देत असतील तर माझी हरकत नाही.
माझ्या दृष्टीने आपण केलेले डिझाईन चांगले असले त्तरी दुवे जिथे जातात ती पाने अद्याप व्यवस्थित व्हावयाची आहेत आणि ते काम बरेच असावे आणि अधिक वेळ लागेल साईट नोटीसवरुन इतर सदस्यांना सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. इतर प्रचालकांनी न केल्यास २० एप्रिल नंतर मी वेळ देईन.
आपल्या ज्ञानकोशीय लेखनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२९, ३१ मार्च २०१७ (IST)[reply]