विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडियावर उल्लेखनीय लेख व त्यासाठीचे निकष आणि तदनुषंदाची चर्चा येथे व्हावी.

उपयुक्त माहिती. पान काढू नये

हे सुद्धा पहा[संपादन]

लेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे[संपादन]

वासुदेव वामन बापट गुरुजी ह्या पृष्ठावर जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय ?

नक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल ?

मी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.

जाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.

विकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.

वैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय ?

पुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुहारण करण्यात येईल.

नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, तरच योग्य बदल करता येईल.

व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का?

ह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.

माधवी वाघ (चर्चा) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgमाधवी वाघ:

  • हे पान मूळातूनच बदलण्याची गरज आहे, आपण बदलण्याची तयारी दाखवीलीत त्याबद्दल आपले आभार.
  • ह्या पानातील, स्तुतीपर शब्द-वाक्ये काढून टाकणे आवश्यक आहे. सर्व अतिशयक्तीपूर्ण मजकूर काढून टाकावा लागेल.
  • व्यावसायीक हेतू साध्य करणाऱ्या बाबीं जसेकी, पुस्तके अमेझोन वर उपलब्ध आहेत वगैरे काढून टाकावे लागेल.
  • संदर्भ हे अनेक ठिकाणाहून द्यावे लागतील, फक्त बापट गुरुजींच्याच भक्तांच्या संकेतस्थळांचे चालणार नाहीत. विश्वसनीय ठिकाणचे पुस्तकांचे संदर्भ पान क्रमांकासकट द्यावेत.(येथे आपल्याला संदर्भ कसा द्यायचा ह्याची माहिती मिळेल.)
  • बापट गुरुजी हे विश्वकोशात उल्लेख होण्यासारखी व्यक्ती होते हे, सिद्ध व्हावे लागेल त्यासाठी बापट गुरुजींचा स्पष्ट उल्लेख असलेले वैध संदर्भ त्यांचे महत्व स्पष्ट करणारे संदर्भ हवेत (माझ्या शोधात मला असे कसलेही संदर्भ दिसले नाहीत, त्यामुळे मला बापट गुरुजी उल्लेखनीय वाटत नाहीत.)

म्हणून पर्याय असा आहे की, बापट गुरुजी ज्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असतील त्या पानावर हा मजकूर हलवावा. पण आवश्यक ते बदल करूनच.

  • सगळ्याचा परिपाक म्हणजे फक्त वास्तव, प्रत्येक विधानाला संदर्भ देत, वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्यास हा लेख टिकवता येईल. लेखाच्या चर्चापानावर मी संदर्भ शोधायचे कसे हे सुचवतो. उरलेली चर्चा लेखाच्या चर्चा पानावर करुयात. धन्यवाद!सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३१, १ सप्टेंबर २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgसुरेश खोले:

असाच देतात का प्रतिसाद? आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. फारच चांगली आणि मुद्देसूद माहिती दिलीत. आपल्यामुळे विकिपीडिया संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी लेखात योग्य ते बदल करायचा प्रयत्न करते. सोबतच मी विकिपीडियावरील संकेत, नियमावली, चर्चापाने आणि नवीन लेखन विषयक माहिती वाचण्यास आरंभ केला आहे. प्रयत्न असाच आहे की, लवकरात लवकर विकिपीडिया समजून घेता येईल आणि कार्यास हातभार लावता येईल.

Gnome-edit-redo.svgQueerEcoFeminist: नमस्कार आपल्या सुचने नुसार संदर्भासह वासुदेव वामन बापट गुरुजी हा लेख पुन्हा संपादित करून लिहिला गेला आहे. तेव्हा उल्लेख्ननीयता साशंक ह्या मथळ्यातून तो वगळण्यास हरकत नसावी.

लेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे[संपादन]

Gnome-edit-redo.svgSureshkhole: श्रीपाद वैद्य लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल. MA$HRVA (चर्चा) १९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)

उल्लेखनियता[संपादन]

हर्षित अभिराज या पानावर विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रता असा साचा लावण्यात आला आहे, काही संदर्भ जोडत आहे.

Shrinivaskulkarni1388 २०:०९, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)

उल्लेखनियता[संपादन]

श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक -

Shrinivaskulkarni1388 ११:२५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

आपली सहमती मिऴावी[संपादन]

नमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या रमेश औटी पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (चर्चा) ०६:२६, ६ जानेवारी २०१९ (IST)