Jump to content

सदस्य चर्चा:मनोज

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्चा पानावर इंग्लिश भाषेतील लिखाण

[संपादन]

मनोज,

येथे इंग्लिश भाषेतील लिखाण दिसण्याचे एक कारण म्हणजे येथे काही अमराठी मंडळीसुद्धा योगदान करीत असतात. ते बहुतांश इंग्लिशमधून आपल्याशी संवाद साधतात.

अभय नातू १९:३१, ३ जुलै २००८ (UTC)

ज्यांना मराठी लिहीतासुद्धा येत नाही ते योगदान कसे काय करणार बुवा?... ऑं? मनोज १९:३८, ३ जुलै २००८ (UTC)

यात मुखत: आंतरविकि सदस्य आहेत. इतरही आहेत. थोडासा धीर धरा, आपसूकच कळेल.
अभय नातू १९:५७, ३ जुलै २००८ (UTC)

MSRTC मधल्या C चा अर्थ कॉपोर्रेशन अर्थात महामंडळ

[संपादन]

चूक दाखवून दिल्याबद्दल आणि तुम्ही स्वतःच दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:०६, १४ जुलै २००८ (UTC)

मराठवाडा

[संपादन]
मराठवाडा लेखात आपण खूप चांगले संपादन केले आहे.आपल्याला विकिकरणात विशेषतः दुवे देण्यात काही अडचण येत आहे काय तसे असल्यास कळवावे.

आपल्या संपादनातील दोन गोष्टींकडे लक्ष वेधावयाचे आहे. एकतर शक्यतो व्यक्तीपर लेखांची शिर्षके व्यक्तिच्या पूर्ण नावाने असावित असा संकेत आहे आणि लेख शीर्षकात काही अपवाद वगळता पदवी आणि पुरस्कार आंतर्भूत केले जात नाहीत. [[यु.म. पठाण|डॉक्टर यु.म.पठाण]] असे लिहिलेतर डॉक्टर यु.म.पठाण असे दिसते पण टिचकी मारल्या नंतर मात्र आपण यु.म. पठाण येथे पोहोचतो. [[हैदराबाद राज्य|हैदराबाद राज्या]]त/चे असे लिहावे ते हैदराबाद राज्यात/चे असे दिसेल व हैदराबाद राज्य येथे जाईल

अधिक माहिती करिता विकिपीडिया:टाचण हे पान वापरता येईल.
आपला मराठी मित्र माहितगार ०७:५४, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)

माहितगार, आपला माणूस म्हणून पूर्ण आदर ठेवून सांगतो, विचारल्याशिवाय आगाऊ सूचना/सल्ले या पानावर देण्याची गरज नाही. कुणीही न विचारता काहीही शिकवणे/सल्ले देणे मला निखालस अप्रिय आहे. धन्यवाद.मनोज २१:३७, १० मार्च २०१० (UTC)

माहितगार,वरची माझी भाषा कदाचित कडक वाटेल. पण त्याला कारण थोडेसे आपणच आणि बरेचसे आपली माहिती असलेले विकीपिडीयन्स आहेत, असेही माझे मत आहे. माहितगार कोण, त्यांचा विकिपिडीयातला अनुभव काय हे आपल्या सदस्यपानात वरच, आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही थोडक्यात का होईना टाकायला हवे. तिथे अजूनही माहितगार नवीन आहेत स्वरूपाचे साचे आहेत. असो. काहीशा कडक वाटणार्‍या या कॉमेंटवरही आपण संयम दाखवत प्रतिक्रिया नोंदवली नाहीत,हे उत्तमच झाले. मराठी विकीपीडियावर कायमचे थांबण्याआधी हे नोंदवणे योग्य वाटले म्हणून लिहीले इतकेच. धन्यवाद. निघतो. - मनोज २१:५४, १८ मार्च २०१० (UTC) ता. क. थांबण्याचा निर्णय बदलतो आहे

माझेही लक्ष्य आणि ध्येय मराठीच आहे, कुठे चुकलो असे वाटले तर अशाच मोकळेपणाने नोंदवत रहा.रागवताना जरूर रागवा पण, कुणावरही रागवून कृपया मराठी विकिपीडियाकडे पाठ फिरवू नका. माझ्या स्वतःबद्दल वेळ काढून कधी जरूर लिहीन तरीपण, सध्यातरी, मराठी विकिपीडियास एक एक लिहिणारा सदस्य मिळत जावा म्हणून बर्‍याच प्रार्थना करत आलो आहे आणि मराठी विकिपीडिया आपण आणि सर्व मराठी जनांकडून सर्वदा वापरला जावो एवढी सदीच्छाच नोंदवत आहे.विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक येथे एक प्राथमिक अवस्थेतील प्रकल्प आहे, आपल्या सवडीनुसार याप्रकल्पाच्या विकासाबद्दल आपल्या काही सूचना असल्यास जरूर नोंदवाव्यात धन्यवाद माहितगार ०७:०८, २१ मार्च २०१० (UTC)

चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

[संपादन]

तांत्रिक दृष्ट्या नावात जागा राहिली होती.बाबासाहेबांच्या विचारामध्ये कधीच अंतर नव्हते.म्हणून मी व्याकरणाच्या दृष्टीने माहिती दुस-या लेखात हलवली. आपणास नावातील फरक खालील प्रमाणे दिसून येईल.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

यात डॉ या पदनामानंतर जागा राहते.म्हणून:)

बाकी आपण नवीन पान तयार करता.जर तयार करताना व्याकरणात गल्लत झाली तर आपण ते पुर्ननिर्देशित करू शकता उदा:*कराड चे कर्‍हाड कडे होणारे स्थांनातरण.

व जर काय नावच चुकले तर पान काढा हा साचा वापरावा, विकिपिडियावरील संचालक\प्रशासक हे ते काढून टाकतील.

कळावे. विनोद रकटे

व्वा. आनंद वाटला या उत्तराने. हे माझ्या कधीच लक्षात येणे शक्य नव्हते. विकीपीडियामध्ये इतक्या बारकाईने आणि काळजीपूर्वक पाहणारी दृष्टीही आहे, हे पाहून समाधानही लाभले. आपल्या पुनर्निदेर्शितच्या मोलाच्या माहितीबद्दलही मनःपूर्वक धन्यवाद. - मनोज ०६:०३, १२ मार्च २०१० (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


स्वागत साचा

[संपादन]

नुसते {{स्वागत}} असे लिहा व जतन करा. आमचे माहितगार सध्या एवढ्यात कुठेतरी व्यस्त आहेत. ते असते तर मग काय माहितीच माहिती मिळाली असती. मी तेवढा तज्ञ नाही. मला तात्पुरते कामचलाउ ज्ञान आहे.

कां कोणजाणे, मला आपली कामाची पद्धत ओळखीची वाटते.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:१६, १५ मार्च २०१० (UTC)

उत्तराबद्दल धन्यवाद. आपल्या शेवटच्या वाक्याने मी विचारात पडलो आहे. - मनोज ०७:२७, १५ मार्च २०१० (UTC)

संवाद

[संपादन]

मी संवाद पुढे सुरु ठेवला तर आपली हरकत नाहीना? आपले उत्तर हे मला उद्देशुन असल्यामुळे माझ्या चर्चा पानावर ते टाकावयास हवे.म्हणजे मला संदेश मिळेल व मी ते बघु शकेल.चला तर. आपणास पुढील कामासाठी शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४५, १५ मार्च २०१० (UTC)

>नरसीकरजी! प्रश्न निर्माण होतो तो तिरक्या शब्दांनी आणि विसंवादाने.< हे आपले विधान मला कळले नाही.काहीतरी कुठेतरी बिनसलेले दिसते. असु द्या. मला जास्त खोलात जायचे नाही. सर्व आपलेच आहेत असे मी समजतो व आपणास एकत्र काम करावयाचे आहे.विकिपीडियावर आपण विश्वबंधुत्वाची भावना घेउन चालत असतो.किती भाषा, किती देश किती लोकं यात सहभाग करीत आहेत.वेगवेगळ्या लोकात भिन्न भिन्न आवड व रुची असते. त्याचा समतोल साधावयास हवा.ज्या प्रमाणे केंद्र सरकारचा, सर्व राज्यासाठींचा Minimum Common Programme असतो तसा. हाही एकप्रकारचा Minimum Common Programme च आहे. तो Minimum Common Programme म्हणजे आपणास मराठी भाषेसाठी योगदान करावयाचे आहे. सर्व हेवेदावे बाजुस ठेउन. मन खूप मोठे करा.सर्व अडथळे आपोआप दुर होतात. काळ हे प्रत्येक गोष्टीवर औषध आहे.माफ करा. मी जास्तच वहावत चाललो आहे. या वयात अनाहुत सल्ले देण्याचा मोहच जणु जडतो. कृपया जे आवडले ते ग्रहण करा न आवडल्यास ते सोडुन द्या.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:१९, १५ मार्च २०१० (UTC)

बदल केला आहे.विचार कळवा.चर्चा हि पाहणे. विनोद रकटे.

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


आभार

[संपादन]

मला समर्थन कौल दिल्याबद्दल आभार. तसेच डॉनला पण कौल द्यावा ही नम्र व आग्रहाची विनंती.त्यांच्या संपादनांची संखया माझेपेक्षा पटीत आहे.आमच्या दोघांचीही नावे एकदमच प्रस्तावित झाली आहेत.पुन्हा एकदा धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) १४:२४, २२ सप्टेंबर २०१० (UTC)

औरंगाबाद

[संपादन]

आपण या लेखात जिल्हाधिकार्‍यांचे नाव बदलले आहे. त्यास यथायोग्य संदर्भ द्यावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०२:५१, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

http://www.aurangabad.nic.in/htmldocs/index.htm दुवा पहा त्यात वरच्या आडव्या पट्टीत कलेक्टर ऑफिस दुव्यावर क्लिक करा जिल्हाधिकारी यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक), फोटो सगळे दिसेल. फक्त त्या पानाचा वेगळा URL येत नाहीय. त्यामुळे तो कसा द्यायचा हे लक्षात आले नाही. आपण एवढे कष्ट घ्याल अशी अपेक्षा आहे. आणखी एक- मी केलेल्या दर दोनचार शब्दांच्या बदलांनाही यापुढे यथायोग्य संदर्भ मागितले जाणार आहेत का? (हे रागात नव्हे तर हसून विचारले आहे, नाहीतर पुन्हा चहाचे निमंत्रण येईल) - मनोज १९:०९, २७ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद

[संपादन]

आपल्याच सदस्यपानावर मला संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.मी सरळ अर्थाने लिहिले आहे, कारण जिल्हाधिकार्‍यासारख्या पदावरील माणसाचे नाव बदलले तर ते आपणास कुठेतरी बघुनच माहित झाले असणार.त्याचा संदर्भ दिल्यास ते योग्य होईल या भावनेपोटी.मी आपणास विनंती केली होती.त्यामागे इतर कोणताही गैर हेतु नव्हता व त्यामागचा हेतु प्रामाणिकच होता.आपणास कसे समजायचे तसे समजा.त्यावर माझे नियंत्रण नाही.कोणाबाबत गैरसमज लवकर होतात, योग्य समज करुन घेणे कठिण असते असा माझा अनुभव आहे. असो. चहाच काय इतर कोणत्याही खावु-पिवु घालण्याच्या प्रकारात आम्ही वैदर्भिय कधीच मागे पडत नाही.आपल्या प्रत्यक्ष भेटीची इच्छा आहे.विकिभेटीत जमेल तर बघु.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:०५, २८ सप्टेंबर २०१० (UTC)

1)सगळीच पानं विकिपीडियाचीच आणि सगळ्यांसाठीच खुली. मग सदस्यपानांत आपलं-तुपलं कशाला करीन मी नरसीकरजी! जिथे मुद्दा मांडला त्याखालीच उत्तर, जिथे उत्तर त्याखालीच त्याची प्रतिक्रिया असा आपला सरळसोट मामला आता ठेवला आहे. त्याचा फायदा असा की दोघांमध्ये संवाद-विसंवाद जे काय घडतं त्याचा एक सुसंगत धागा आपोआपच तयार होत जातो. दोघांनाही ते वाचायला सोयीचं पडतं. या चर्चेतून कुणाला मनोरंजन करून घ्यायचं असेल तर त्या प्रेक्षकांचीही सोय होते.
2)तुम्ही ज्या भावनेने हे लिहीले त्यात तुमचा हेतू गैर नव्हता,प्रामाणिक होता हे मलाही माहिती आहे. (तुमचा हेतू प्रामाणिक नाही असं मला वाटलं असतं, तर तसं थेट म्हणायला मी मागेपुढे पाहिलं नसतं.) यापू्र्वीही याच पानावर एक नाव बदलल्यानंतर तुम्ही शंका उपस्थित केल्याची आठवण झाली आणि त्याची मौज वाटून मी ते लिहीलं. असो.-मनोज २१:००, २९ सप्टेंबर २०१० (UTC)

भाषांतरात सहाय्य हवे

[संपादन]
नमस्कार,
संचिका चढवा पद्धतीत कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडिया पद्धतीचा सुटसूटीत पणा आणण्या साठी,इंग्रजी विकिपीडियावरून बेतलेल्या विकिपीडिया:संचिका चढवा पानाचे मराठी भाषांतरात आपले सवडीनुसार सहाय्य हवे आहे
आपला
माहितगार १९:१४, ३ फेब्रुवारी २०११ (UTC)
सहाय्या करिता खूपखूप धन्यवाद, त्या पानाची पूर्ण अमलबजावणी करण्यापूर्वी अजूनही उपपानांचे बरेच काम शिल्लक आहे.शिवाय एका महत्वपूर्ण कायदेविषयक विषयावर नवीन संकेताकरिता सर्व मराठी विकिपीडियनची चर्चा आणि सहमतीची आवश्यकता आहे. एक-दोन आठवड्यात सवडीनुसार पार पाडेन .माहितगार ००:३०, २ मार्च २०११ (UTC)

दालन

[संपादन]

>>एखाद्या दालनाच्या विकासाची जबाबदारी कशी घ्यावी?>>

एखाद्दा दालन पानाचा विकास करता आला तर स्वागतच आहे किंबहूना मराठी विकिपीडियास (विश्वकोशीय परिघातच राहून) वाचकाभिमूख होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने दालनांचे पोषकच काम आहे. नवीन दालन बनवू इच्छित असालतर विकिपीडिया:नवी दालने येथे थोडे सहाय्यपर लेखन आणि आराखडा साचे उपलब्ध आहेत,मी काही दालनांच्या निर्मितीकरताना आराखडा साचांचा उपयोग केला तर काही वेळा दालन मराठवाडा किंवा दालन सुर्यमाला वरून नक्कल(कॉपी) केली.
आपल्या आवडीच्या कोणत्याही दालनावर काम केलेतर स्वागतच आहे.दालन मराठवाडाच्या अनुषंगाने मराठी विकिपीडियावर विवीध विषयांवर बर्‍यापैकी लेखन होत आले आहे त्यात तुमचाही हातभार मोलाचा आहे.दोन एक लेख मुखपृष्ठ सदर म्हणूनही होऊन गेले.अजून मराठवाडा, औरंगाबाद इत्यादी काही लेखांचे उदयोन्मूख लेख म्हणून नामनिर्देशन करता येण्यासारखे आहे असे वाटते.खरेतर हैदराबादमुक्ती संग्राम हा लेख अजून थोड्या मेहनतीने मुखपृष्ठ सदरापर्यंत पोहोचावयास हरकत नसावी एवढेच नव्हेतर तो लेख पुढेचालून इंग्रजीत भाषेत भाषांतरीत करून इंग्रजी विकिपीडियावर टाकता यावा अशी मनीषा आहे.शिवाय मराठवाड्याशी संबधीत सर्व लेखपानांच्या चर्चा पानावर अथवा लेखपानातच (लेखपानांच्या तळाशी असणार्‍या) मार्गक्रमण साचात दालन मराठवाडाची माहिती देणारा दुवा आंतर्भूत करता आलातर वाचकांना दालन पानापर्यंत पोहोचणे सोपे जाईल असे वाटते.
इतर दालनांमध्ये, सद्स्य मैहिहूडॉन यांच्या अविरत मेहनतीने, क्रिडाविषयक दालनाकरिता भरपूर ताजा मजकुर उपलब्ध असतो पण त्यांचे प्रत्यक्षात दालन पानावर वेळ देणे होत नाही, तसेच दुसरे महत्वाचे मागे पडलेले दालन पान म्हणजे दिवाळी अंकाचे कदाचित तेही पहाता येईल.
सरतेशेवटी दालन पानांवर येणार्‍या नवागत सदस्यांना/ व्यक्तींना सध्या दालन पानात योगदान कसे करावे याबद्दल पुरेसे सुलभ सहाय्य अजूनही उपलब्ध नाही. त्यातही काही हातभार लावता आल्यास बरे पडेल.
माहितगार २२:०८, ८ मार्च २०११ (UTC)

हैदराबाद

[संपादन]
जाता जाता सुचले म्हणून आपण मेहनत घेतलेला हैदराबाद लेखही खूप चांगला होत आला आहे. संदर्भ आणि फिनीशींग टच दिल्यास दोही मुखपृष्ठ सदराचा उमेदवार होऊ शकतो माहितगार २२:१४, ८ मार्च २०११ (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, मनोज


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

दिनविशेष

[संपादन]

मनोज नमस्कार, दिनविशेष बाबत सांघिक कामाचे विचाराधीन आहे. मध्यंतरी आपण कुठेतरी देलेला काम करायला आवडेल अशा आशयाचा संदेश मी वाचला होता. दिनविशेष ह्या कामि सोबतच मी एक नवीन प्रयोग पण करीत आहे नार्सिकार जी हे काम सांभाळतात आहे आणि निनाद आणि मंदार अशाच आशयाच्या कामावर काम करतात आहेत. आपणासही ह्या कामात सहभागी होण्यास आवडेल का ? आपण जर आपली उपलब्धता कळवली तर मला आपल्या सोबत काम करण्यात आनंद होईल. कळवावे राहुल देशमुख ०६:४७, २ ऑगस्ट २०११ (UTC)

राहुल, नमस्कार, दिनविशेष हे खरेतर खूप मागे पडलेले काम आहे आणि सांघिक प्रयत्नांशिवाय ते होणे खरोखर अवघड आहे. सहभागास तयार. - मनोज ०४:५९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

  • धन्यवाद मनोज,
निनादने पण ह्या कामास प्रकल्प हिंदू धर्म मध्ये समाविष्ट करण्याचे आजच मला कळवले आहे. मंदार अगोदरच ह्यावर वेगळे काही काम करतो आहे त्याच्या कामाचे आणि ह्या कामच्या स्वरूपाचे सामान्यी कर्णाचे फक्त आता बाकी आहे. नार्सिकार ह्या कामाची धुरा सांभाळण्यास पहिलेच तयार आहेत. आपल्या सहभागाने ह्या सांघिक प्रयत्नास अधिक बळकटी येईल असे वाटते. थोडे काम अजून पुढे गेले कि संपूर्ण योजना मी मांडतो तोपर्यत मी आपणास अधून मधून उपडेट देतच जाईल. आपणही आपल्या सूचना/विचार/मते/कल्पना कळवाव्या राहुल देशमुख ०५:४९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi मनोज,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०३, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


नवीन नामविश्व "बोली " करता प्रस्ताव

[संपादन]

मनोज, आपण इतरत्र उअप्स्थीत केलेल्या वीषयाच्या अनुषंगाने मी मध्यवर्ती चावडीवर विकिपीडिया:चावडी#नवीन नामविश्व "बोली " करता प्रस्ताव मांडला आहे , तेथे आपले मत प्रार्थनीय आहे. माहितगार २३:३५, २३ ऑगस्ट २०११ (UTC)

हे पान संपादा ची परवानगी

[संपादन]
मित्र मंडळी ट्रांसलेटविकिवर तुम्हाला $2 ची परवानगी नाही, खालील कारणांसाठी: + हे पान संपादा या दोन संदेशांच एकत्रिकरण होऊन तुम्हाला हे पान संपादा ची परवानगी नाही, खालील कारणासाठी: हे एकत्रित वाक्य बनत आहे. मित्रांनो ट्रांसलेटविकिवर मिडियाविकि संदेशांचे अनुवाद करणे आणि सुधारणा करणे या करिता प्रचालकपद असण्याची आवश्यकता नाही, अर्थात अनुवाद/संपादन करू देण्याची परवानगी मागण्याची फॉर्मॅलिटी आहे ती तिथेच करावी लागते. एकुण प्रोसेस लक्षात यावी म्ह्णजे आपल्या नंतरच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाईल या दृष्टीने सदर दुरुस्ती स्वतः करण्याचे टाळतो आहे सध्याच्या नवीन संपादक फळी पैकी प्रत्येकाने ट्रांसलेट विकिवर पुढाकार घेऊन सध्याच्या अनुवादातील ५० -५० तरी संदेश तपासून आवश्यक तेथे सुधारणा कराव्यात हि विनंती माहितगार १८:४३, २९ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा

[संपादन]
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

काय झाले?

[संपादन]

प्रिय मनोज, असे काय झाले ज्यामुळे तुम्ही मराठी विकिपिडीयावर नाराज झाला आहात. विस्ताराने कळवले तर जास्त चांगले.....मंदार कुलकर्णी १७:५२, २० नोव्हेंबर २०११ (UTC)

मी नाराज झालो ही मलाही नवी माहिती आहे LOL.कुणावर तरी नाराज होऊन सोडण्याबिडण्याची भाषा मी करीत नसतो. लेखात भर घालण्याचे मी बंद केले आहे सध्या, इतकेच.-मनोज २१:४४, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

येथील योगदानासाठी

[संपादन]
येथील योगदानासाठी कार्यरत राहिल्याबद्दल समस्त विकिपिडियन्सतर्फे हा तारा - माहितगार ०३:३१, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)

औरंगाबाद

[संपादन]

मनोज नमस्कार,

आपण औरंगाबाद/मराठवाड्यात वास्तव्यास असल्याचे कळते. आपणास माहीतच असेल कि विकीसाम्मेलाना दरम्यान ठरल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया मराठी माध्यमांच्या शाळेतील विध्यार्थ्यान पर्यंत पोहचवण्याचे विचाराधीन आहे. त्या साठी निवडलेल्या ७ शहरांमध्ये औरंगाबाद पण आहे. काय आपणास येथील शाळांशी संपर्क करण्याच्या कामी मदत करण्यास आवडेल ? आपली स्थानिक ओळख आणि विकिपीडियाचा अनुभव आपल्या विभागातील आम विध्यार्थांना ह्या ज्ञानकोशाचा उपयोग करण्याच्या कामी येऊ शकेल. कळवावे राहुल देशमुख २२:२८, ३ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, मनोज

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२१, १ जानेवारी २०१२ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२१, १ जानेवारी २०१२ (UTC)


राष्ट्रभाषा

[संपादन]

>>>>ते मराठी खेरीज अन्य भाषेत का लिहीतात, मराठी येत नसेल तर अधिक व्यापकतेसाठी त्यांना इंग्रजी सोयीची वाटत नाही का

नमस्ते मनोज जी ,

मै तहे दिल से आपका इस्तकबाल करता हु |

मै किसी अन्य भाषामे नहीं राष्ट्र भाषामे लिखता हु | और आप एक भारतीय (?) होनेके नाते हमारी राष्ट्र भाषा हिंदी है ये तो जनतेही होंगे | राष्ट्र भाषा हिन्दीको अन्य भाषा कहेना और अंगेजी भाषाकी पैरवी हमें आपसे अपेक्षित नहीं थी | यहाँ चर्च्या पृष्ट पर राष्ट्रभाषा में लिखने को श्रीमान अभय नातू और संकल्प द्रविड़ जी ने इसके पाहिले हरकत जताई थी; उनकी बात और है वो विदेशी नमक खाते है | बहोत से सदस्योने उनकी हरकत पे एतराज जताया था जिस करणवश आज राष्ट्रभाषा को प्रतिबंधित करना इन लोगोंको अशक्य हुवा है| आपभी राष्ट्रभाषा हिंदीका गर्व करे ...जय हिंद ! --लकी १९:५१, ३० जानेवारी २०१२ (UTC)

योहानेस गुटेनबर्ग

[संपादन]

मनोज,
मला जर्मन भाषा थोडीफार येते. पर्ंतु मी प्रत्येक विदेशी लेखांमध्ये IPA pronunciation तपासतो. ह्या नुसार yoh-hah-nəs goo-tən-burɡ असा उच्चार केला गेला आहे म्हणून मी ह्या लेखाचे शीर्षक बदलले. हव्या असलेल्या लेखांच्या यादीमधील शीर्षकांना फार अर्थ आहे असे नाही. जेंव्हा केंव्हा व ज्याने कोणी ही यादी बनवली, त्याने उच्चारांकडे विशेष लक्ष दिले नसावे. - अभिजीत साठे ०८:५६, २३ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

[संपादन]
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

राव हज चले == चर्चा विकिपीडिया:चावडी/वादनिवारण येथे हलवली. निनावी (चर्चा) २२:३६, २० मार्च २०१२ (IST)[reply]


चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

[संपादन]

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. मराठी विकिपीडियावरील लोक आपणास आपल्या सुस्प्ष्ट भुमीकेवरून ओळखतात. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:११, ११ जून २०१२ (IST)[reply]

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०

[संपादन]

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:४८, २३ सप्टेंबर २०१२ (IST) भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:२३, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

औरंगाबाद लेणी ,पितळखोरे, नावाने असल्याबाबत

[संपादन]

आपण संपादित केलेली औरंगाबाद लेणी पितळखोरे, व पितळखोरा शीर्षकाखाली असल्याने आपला मजकूर पितळखोरे येथे हलवण्यात आला आहे. कृपया याबाबत खात्री करावी किवा मत नोंदवावे. साळवे रामप्रसाद १८:५९, १२ मार्च २०१४ (IST)

औरंगाबाद लेणी आणि पितळखोरे या दोन वेगळ्या जागा आहेत. खात्री असल्याशिवाय मी येथे एक अक्षरही लिहीत नाही. संतोष, ही वर केलेली हलवाहलव पूर्ववत केल्याबद्दल धन्यवाद - मनोज (चर्चा) ०१:१९, २८ मार्च २०१४ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.