विकिपीडिया:चर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक विकिपानांवर चर्चा हा विभाग असतो. त्या लेख/पानांबद्दलची चर्चा तेथे केली जाते. चर्चेत भाग घेण्यासाठी चर्चा दुव्यावर टिचकी मारा. आपणांस चर्चा पान दिसू लागेल आणि संपादनया दुव्यावर टिचकी मारल्यावर आपण आपले मत व्यक्त करु शकता. कृपया आधी असलेली माहिती घालवू नये व ~~~~ असे लिहून आपली सही करावी.

साद घालणे[संपादन]

एखाद्या सदस्याशी चर्चा करीत असताना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी साद साच्याचा वापर{{साद|सदस्यनाव}} असा करा. येथे सदस्यनाव ऐवजी दुसऱ्या सदस्याचे नाव घाला.

धन्यवाद[संपादन]

एखाद्या सदस्याला त्यांनी केलेल्या संपादनासाठी धन्यवाद द्यायचे असतील तर त्या पानावर जाउन उजवीकडे इतिहास पहा वर टिचकी मारा. पानाच्या इतिहासात त्या व्यक्तीने केलेल्या संपादनांच्या नोंदीच्या उजवीकडे धन्यवाद असे लिहिले असेल. त्यावर टिचकी देता या संपादनासाठी सार्वजनिकरित्या धन्यवाद पाठवायचे काय? होय नाही अशा प्रकारचा पर्याय तेथेच येईल. त्यापैकी 'होय' वर टिचकी दिले की झाले काम.

अलीकडील बदल मधूनही पानाच्या इतिहासावर जाता येते.