सदस्य चर्चा:Anti delete
![]() |
Anti delete, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Anti delete, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,५८० लेख आहे व २४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
![]() दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) ०२:२७, २५ जुलै २०१३ (IST)
संपादन गाळणी विषयी[संपादन]
नमस्कार,
१) संवाद साधण्या करता धन्यवाद. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत. संपादन गाळण्या अधिकाधीक निष्पक्षपणे काम करतील असा प्रयास आहे.संपादन गाळणीत सुयोग्य माहिती/सजगता संदेशाची सुद्धा व्यवस्था केली आहे.
मजकुर वाद असलेल्या लेखात, वगळण अथवा लेखन दोन्ही करण्यापुर्वी संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर वाक्यवार घटकवार उल्लेखनीयता चर्चा करणे अभिप्रेत असल्याची सूचना संबधीत लेखचर्चा पानावर देऊन सुद्धा चर्चा न करता परस्पर अनुत्पादक संपादन युद्ध दीर्घ काळ चालू राहील्यामुळे संपादन गाळण्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकास आणि ओळीस संदर्भ देणे बंधनकारक केले गेले आहे. दिवसाभराच्या कालावधीत अधिकतम जोडावयाच्या आणि वगळावयाच्या दोन्ही प्रकारच्या ओळींच्या लांबीवर बंधने घातली गेली आहेत.
एका दिवसात थोड्याश्याच ओळी जोडता येतील किंवा वगळता येतील, म्हणजे जेणे करून लेखात बदल करू इच्छित असलेल्या सर्वच बाजूंचे संपादक लेखचर्चा पानावर पोहोचून उल्लेखनीयता चर्चा करण्यास बाध्य होतील अशी अपेक्षा आहे.
अर्थात संपादन गाळण्यांचे अद्ययावत करताना अथवा कार्यवाही करताना,निष्पक्षता ठेवण्याच्या दृष्टीने, त्या क्षणी मजकुर जसा होता तसाच ठेवण्यावर भर दिला आहे.अती वगळणनावर मर्यादा आणून सुद्धा पुन्हा मजकुर वगळला गेल्याचे लक्षात आल्या नंतर वगळण्यावर अजून अधिक बंधन आणले आहे.पण मध्यंतरात त्रुटींचा फायदा होऊन काही लेखातील मजकुर वगळला गेला, पण वर म्हटल्या प्रमाणे माझ्या बाजूने मजकुरात हस्तक्षेप करण्याचे टाळलेले आहे. चर्चा पानावर चर्चा जशी पुढे जाईल तसा उल्लेखनियता स्विकारला गेलेला मजकुर लेखात थोडा थोडा करून लावण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थीत आहेच.
गाळण्या अनुभवावर आधारीत सातत्याने अद्ययावत केल्या जात आहेत.(त्रुटीही आढळल्यास कमी करत जाऊ म्हणून अशा संवादाचे स्वागत आहेच) निष्पक्षतेची अधिकतम काळजी घेण्याचा प्रयास आहेच.संपादन गाळणीतून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाल्यास संपादन गाळणीने इतरांची (तुमच्या पेक्षा वेगळ्या दृष्टीकोणी सदस्यांची धरून) सुद्धा संपादने थांबवली आहेत.(तुमच्या पेक्षा वेगळ्या दृष्टीकोणी सदस्यांनी) जिथे संपादन गाळण्यांना वळसा घालण्या करता वेगळ्या पानाची निर्मिती करण्याचा प्रयत्न तातडीने वगळला सुद्धा आहे.
प्रत्येक सदस्याचे दृष्टीकोण वेगवेगळे असू शकतात त्या बद्दल संवाद वाढावयास हवा.आपणास मराठी ज्ञानकोशाचा उत्कर्ष साधावयाचा आहे,या मार्गात सर्वच मराठी मंडळी आपल्या एकमेकांची साथीदार आहेत त्यात आपपर भाव नाही आणि आपणही आपपर भाव ठेवत नाही असा विश्वास आहे.
२) आपला एक संवाद आपणास अभय नातूंशी करावयाचा आहे असे वाटते त्या संदर्भात मी अभय नातूंना संदेश देईन आणि सदस्य जेंशी आपले मजकुर दृष्टीकोण भिन्नता असण्याची शक्यता दिसते तेव्हा त्यांनाही आपणाशी स्वतंत्रपणे संवाद साधण्याची विनंती करेन.
३)माझ्याकडून एक विनंती अशी की रोख व्यक्तीगत करण्याचे टाळून, शक्यतोवर प्रत्येक लेखातील प्रत्येक लेखन मजकुर बदलाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता संबंधीत लेखाच्या चर्चापानावर तर्कसुसंगत चर्चा करण्यावर भर द्यावा.संबधीत लेखचर्चा पानावर स्पेसीफीक एडीट डिफरन्सचे संदर्भ दिलेत तर इतर सदस्यांना चर्चेत सहभागी होणे अधिक सोपे जाण्याची शक्यता वाटते.
काही किंतु न ठेवता संवाद चालू ठेवावा हि विनंती.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५६, १२ ऑक्टोबर २०१३ (IST)
उल्लेखनीयता चर्चेची विनंती[संपादन]
आपण माझ्या चर्चा पानावर केलेल्या चर्चेची नोंद संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था#सदस्य:Anti delete यांचा मजकुर वगळला जाण्या बद्दल आक्षेप आणि उल्लेखनियता चर्चेची विनंती येथे केली. मजकुर वगळणाऱ्या संबंधीत सदस्याच्या चर्चा पानावर सुद्धा उल्लेखनीयता चर्चेची विनंती कळवली.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१४, १२ ऑक्टोबर २०१३ (IST)