विकिपीडिया:कौल/प्रचालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

हे पान विकिपीडिया:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

Usernamekiran

नामांकन

नमस्कार. गेल्या काही दिवसांत मला लक्षात आले कि सध्या फक्त अभय नातू व Tiven हे दोघंच प्रचालक सक्रिय आहेत. प्रचालकीय कामे जास्त नसली तरी मी त्यांना मदत करू इच्छितो. मला मराठी विकिपीडियावर फक्त ७-८ महिन्यांचा अनुभव असला तरी त्यामध्येच मी भरपूर काही शिकलो आहे. तसेच मला इंग्रजी विकिपीडियावर जवळपास ७ वर्षांचा चांगला अनुभव आहे, आणि तेथील मानके/धोरणे पूर्णपणे इथे लागू होत नाहीत याची मला कल्पना आहे.

जर मला प्रचालकपदाचा कौल मिळाला, तर मी प्रामुख्याने चुकीने तयार झालेले पाने वगळणे, प्रताधिकारीत असलेली संपादने वगळणे (revision deletion), व इतर सदस्यांनी केलेल्या विनंत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मला विकिपीडिया वरील लेखांच्या वर्गवारीची चांगली जाण आहे. मी केलेल्या वर्गवारीची माहिती सदस्य:KiranBOT या पानावर आहे. तसेच मला wikimedia/mediawiki सॉफ्टवेअरची चांगल्यापैकी माहिती आहे.

आजतागायत प्रमाणे मला काही शंका असल्यास त्याबद्दल मी चावडीवर किंवा अनुभवी सदस्यांसोबत चर्चा करेल, खात्री नसताना परस्पर एखादे संपादन/काम करणार नाही. जर एखाद्या संपादकाने मला माझ्या कामाविषयी/संपादनांविषयी शंका किंवा मदत विचारल्यास मी त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आशा आहे की आपण या विनंतीवर आपले मत व कौल द्याल. धन्यवाद. —usernamekiran (talk) ११:५५, ५ जून २०२२ (IST)[reply]

कौल

Symbol strong support vote.svg पाठिंबा- माझे समर्थन आहे, मला आशा आहे तुम्ही प्रताधिकार भंग आणि कळसूत्री खात्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महत्वाचे काम कराल. धन्यवाद. - QueerEcofeminist
Symbol strong support vote.svg पाठिंबा - संतोष गोरे
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Khirid Harshad
Symbol strong support vote.svg पाठिंबा- अधिकाराचा गैरवापर करून हद्दपार करण्यात आलेल्या सदस्याला (Khirid_Harshad) आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्न केलात. यावरून आपण सामान्य सदस्यांचा सन्मान कराल अशी आशा वाटली. म्हणून पाठिंबा . - shantanuo


चर्चा

मुदत

  • Gnome-edit-redo.svgअभय नातू: ह्यांना विनंती आहे कि कौल संपण्याची तारीख/मुदत कृपया ठरवून द्यावी. —usernamekiran (talk) २१:२२, ८ जून २०२२ (IST)[reply]
  • संकेतानुसार उमेदवारी जाहीर केल्यानंतर २१ दिवस मुदत असते. त्यानुसार नेमकी तारीख ठरेल. -- अभय नातू (चर्चा) २१:२९, ८ जून २०२२ (IST)[reply]
  • Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार. काल विनंती करून २१ दिवस पूर्ण झाले. पुढील प्रक्रिया करण्यासाठी नम्र विनंती. —usernamekiran (talk) २०:०१, २७ जून २०२२ (IST)[reply]

निकाल

सदस्य:Usernamekiran याच्या बाजूने चार आणि विरुद्ध शून्य मते मिळाली आहेत.

Gnome-edit-redo.svgUsernamekiran:, अभिनंदन. प्रचालकपदाचा सुज्ञपणे वापर कराल ही खात्री आहेच. इतर प्रचालक व जाणते संपादक यांच्याशी संवाद साधून मराठी विकिपीडियाच्या प्रगतीत तुमचा मोठा हातभार लागो अशा अपेक्षेसह.

अभय नातू (चर्चा) ०८:१२, २८ जून २०२२ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमचे व इतर संपादकांचे मनापासून खूप खूप आभार. मी माझ्या परीने चांगले काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करेल. जेव्हा कधी शंका आली तेव्हा इतर संपादकांशी चर्चा करेल. पुन्हा एकदा धन्यवाद. —usernamekiran (talk) १०:५४, २८ जून २०२२ (IST)[reply]