दिवाळी अंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दिवाळीअंक हे मराठी वाङमयीन संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात.

मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.[१] सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.


अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.

विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली दिवाळी अंक स्पर्धा 2014[संपादन]

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू रहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 25 प्रकारामध्ये 25 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणा-या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळी ठसा उमटवणा-या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणा-या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.


विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 25 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.


दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.

============================================================================================================================================================================[संपादन]

दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा… o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा, शेवटच्या तारखेनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे. कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किंवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे. o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल 1000 शब्दात परीक्षण पाठवावे. अथवा अन्य नियतकालिकात आपल्या दिवाळी अंकाबाबत परीक्षण अथवा लेख छापून आला असल्यास त्या लेखाचे कात्रण किवा झेरॉक्स प्रत पाठवावी. o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर) o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती. (पुरस्काराचे नाव, वर्ष, पुरस्कार देणा-या संस्थेचे नाव) o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी - □ दैनिक □ साप्ताहिक □ पाक्षिक □ मासिक □ द्वैमासिक □ त्रैमासिक □ अर्धवार्षिक □ वार्षिक □ अनियतकालिक o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेल्या अन्य सदस्यत्वाचा तपशील. (सदस्यत्वचा प्रकार, वर्ष, संस्थेचे नाव) o एखादी किंवा सर्व प्रवेशिका कोणत्याही कारणाशिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम - अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा / वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.


स्वरूप आणि परंपरा[संपादन]

कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. [२] चंद्रहास जोशींच्या मते "दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते."[३]

इतिहास[संपादन]

१९०५ साली श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' या मासिकाने दिवाळी विशेष अंक काढला होता. 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख या मासिकावर होता. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पानं मराठीत आणि ८ पानं इंग्रजीत होती.रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.[४] दिवाळी अंक या उद्देशास वाहून घेतलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र(२ नोव्हेंबर १८७१ - २३ जून १९२०[५]) यांनी संपादित केलेल्य १९०९ साली प्रकाशित 'मनोरंजन' दिवाळी अंकास जातो.

दिवाळी अंकांचे प्रकार[संपादन]

ऑनलाईन आणि डिजीटल दिवाळी अंक[संपादन]

कविता सागर दिवाळी अंकाला पुरस्कार[संपादन]

साप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कविता सागर" दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे. लवकरच ठाणे येथे होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कविता सागर" चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली 105 वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे व या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी सांगितले.

उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कविता सागर प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कविता सागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कविता सागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. 01 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळी अंक प्रसिद्ध होवून सर्वत्र वितरीत केला गेला. कविता सागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कविता सागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द केले आहे, आणि नुसतेच प्रसिद्ध केले नाही तर हे सर्व लिखाण जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे, यावर्षीचा दिवाळी अंक हा जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहे. कविता सागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कविता सागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.

बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, डॉ. उमेश कळेकर, अनिल पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर बोबडे, मयुर ढोलम, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे.

गतवर्षी कविता सागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल, “कविता सागर” च्या अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कविता सागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कविता सागर" या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे.

ऑडिओ व्हिजूअल दिवाळी अंक[संपादन]

दिवाळी अंक झालेल्या स्पर्धा[संपादन]

(या विभागात प्रस्तावित स्पर्धांची माहिती मुळीच देऊ नये.झालेल्या स्पर्धांत पुरस्कृत दिवाळी अंकांच्या/लेखांच्या/लेखकांच्या संदर्भाने केवळ ससंदर्भ परिच्छेद लेखन करावे.पुरस्कृत दिवाळी अंकांची यादी स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी येथे जोडावी.)

कोल्हापूरची संघटना उभारणार दिवाळी अंकांचे संग्रहालय[संपादन]

सकाळ वृत्तसेवा रविवार, 30 नोव्हेंबर 2014 - 01:00 AM IST


मुंबई: का. र. मित्र यांनी 1909 मध्ये दिवाळी अंकाची सुरुवात केली. त्यानंतर साहित्य क्षेत्रात या अंकांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 106 वर्षांची परंपरा असलेले दिवाळी अंक जतन करण्यासाठी कोल्हापूरच्या जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना प्रयत्न करत आहे, तसेच बंद होत चाललेल्या दिवाळी अंकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी संघटनेतर्फे स्पर्धा व प्रदर्शनही भरवण्यात आले आहे.


अनेक साहित्यिक दिवाळी अंकामध्ये लिहून मोठे झाले. मात्र एवढ्या दीर्घ परंपरेचा वेध घ्यायचा असल्यास संग्रहालय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व अंक एकाच छताखाली पाहता, वाचता यावेत यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहे. यानुसार 30 वर्षांतील सुमारे दीड हजारांहून अधिक अंक जमा करण्यात आले असून, त्याचे जयसिंगपूर येथे वाचनालय वजा संग्रहालय तयार करण्यात आले आहे. दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे जतन करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा संघटनेचे डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केली.


विभागवार पुरस्कार - दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 2014 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दिवाळी अंकांसाठी संपादन, मांडणी, छपाई, बालसाहित्य, विनोदी, कादंबरी, कथा, लेख, मुलाखत, कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक अंक, ध्वनिफिती, ध्वनिचित्र, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण, समाज प्रबोधन, मुखपृष्ठ अशा वेगवेगळ्या विभागांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंक पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सुनील पाटील - 02322 - 225500, 09975873569.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किंवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747
  2. डॉ. अरुणा ढेरे (दिवाळी अंकांच्या संपादकांच्या अधिवेशनाचे वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे). "कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे", prahaar.in, Monday, October 7, 2013. "कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी तपासले. (मराठी मजकूर) 
  3. http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9621&Itemid=2
  4. दिवाळी अंकांची शंभरी लेखक -chinoox, मायबोलीचा ऑनलाईन हितगुज दिवाळी अंक २००८ दिनांक २७/०१/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ९.३६ वाजता जसा दिसला
  5. http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10387