विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/सूचना फलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूचनाफलक[संपादन]

विकिपीडिया लेख संपादन स्पर्धा‎[संपादन]

नमस्कार,

आपले नवीनतम सदस्य केदार सोमण यांनी सुचवल्यावरून मराठी विकिपीडियाने सर्वप्रथम लेख संपादन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याची रूपरेषा ठरवण्यासाठी आपली मदत अत्यावश्यक आहे. याबद्दल प्राथमिक माहिती विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा‎ येथे आहे.

आपले मत व मदत तेथे अपेक्षित आहे. धन्यवाद्

विकिमीडियाचा भारतीय अध्याय (प्रस्तावित)[संपादन]

It is proposed to start an Wikimedia India Chapter of the Wikimedia Foundation. We believe that it is important to spread the concept of free knowledge in India.

Wikimedia India Chapter page is for discussion about the proposal for Wikimedia India Chapter of Wikimedia. This chapter can help coordinate various Indian language Wikipedias and spread the Wikipedia word in India..विकिमीडिया ईंडीया चॅप्टर (प्रस्तावित)ला जरूर भेट द्या. привет лехе!

हार्दिक अभिनंदन[संपादन]

नवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्यानंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दिक अभिनंदन!!! Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)

आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सद्यःच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोचवण्याच्या प्रयत्‍नात मराठी विकिपीडिया खचितच महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो.

तुम्ही मुख्यत्वे तीन प्रकारांनी मदत करू शकता[संपादन]

१. माहिती आणि ज्ञान पुरवणे हे कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. तुमच्या क्षेत्रातले ज्ञान ह्या ज्ञानकोशाद्वारे तुम्ही लोकांना उपलब्ध करू शकता.

२.इंग्लिश आणि इतरही भाषांमधली विविध क्षेत्रांतली माहिती मराठीत भाषांतरित करून ह्या मराठी ज्ञानकोशात तुम्हाला भर घालता येईल.

३. इतर लेखकांनी पुरवलेल्या माहितीत लहानमोठ्या चुका तुम्हाला आढळल्या तर त्या चुका विकीच्या सर्वसाधारण तत्त्वांना धरून दुरुस्त करणे आपणास सहज शक्य आहे.


धन्यवाद.


मराठी विकिपीडियातील वाचनीय लेखांची सूची[संपादन]

  • साहित्य

मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजीराजे भोसले, पु. ल. देशपांडे

  • तंत्रज्ञान

संगणक टंक, ऑपरेटिंग सिस्टिम, मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स

  • पर्यटन

महाराष्ट्र पर्यटन, भारत पर्यटन

Wikimedia Indian chapter[संपादन]

As you might be aware, we are planning to start an India chapter of the Wikimedia Foundation. Please see Wikimedia India for details. We're currently working on the draft of bylaws. If you are interested, please join the discussion on meta, and subscribe to the wikimediaindia-l mailing list. Utcursch १७:५७, १० डिसेंबर २००७ (UTC)

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे[संपादन]

नमस्कार,

चावडीचा नवीन अवतार प्रकट झाला आहे. याच बरोबर विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे हे नवीन पानही अवतरले आहे. या पानावर विकिपीडियाची धोरणे, ध्येय आणि संबंधित विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

तुमच्या प्रतिक्रिया कळवालच.

धन्यवाद...!