Jump to content

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

’उदयोन्मुख लेख’ म्हणून एखाद्या लेखाचे नामनिर्देशन करण्यासाठी आवश्यक पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे :

  • उदयोन्मुख लेखातील शब्दसंख्या किमान २५० असावी. शब्दसंख्या मोजताना केवळ मुख्य मजकुराचा समावेश करावा; ’वर्ग’, ’साचे’ इत्यादी विकि-मेटाडेटा स्वरूपाचा आशय शब्दसंख्येत गणला जाऊ नये.
  • विषयाशी संबंधित किमान १ चित्र लेखात असावे. अपवाद : प्रसिद्ध मराठी/ भारतीय व्यक्तींशी संबंधित प्रताधिकार-मुक्त चित्रे सध्या खूप कमी संख्येने उपलब्ध असल्यामुळे, केवळ या विषयांवरील लेखांमध्ये एका चित्राच्या किमान आवश्यकतेचा निकष निरपवादपणे लावू नये.
  • किमान २ संदर्भ नोंदवलेले असावेत व त्यासाठी योग्य टॅग वापरावेत.
  • लेखात विषयाबद्दल अतिशय सांगोपांग माहिती नसली तरीही लेखाचा आवाका विषयाशी संबंधित मुख्य मुद्द्यांना सामावण्याइतपत मांडलेला असावा.
  • लेखामधील मराठी भाषा शुद्धलेखन व व्याकरणाच्या दृष्टीने निर्दोष असावी.
  • लेखाची मांडणी, विभागणी सुटसुटीत, सुबोध व आकर्षक असावी.
  • लेखातील आकडे देवनागरी मराठीत असावेत.
  • लेखात अन्य परभाषांमधील मजकूर आवश्यकतेखेरीज वापरू नये. अपवाद : परभाषिक शब्दांची मूळ भाषांमधील/ लिप्यांमधील लेखने किंवा परकीय भाषेवरील भाषाशास्त्रीय लेख