Jump to content

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/अनिर्वाचित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निवड न झालेले लेख

[संपादन]

२००८ भारतीय प्रीमियर लीग

[संपादन]
पाठींबा दिलेला लेख (मे २००८) पाठराख्यांची यादी
२००८ भारतीय प्रीमियर लीग
(नाकारला गेला, जून साठी पुन्हा कौल करता येईल)
पाठिंबा- सध्या आयपीएलची जोरदार चर्चा चालू आहे, त्यामुळे हा लेख संयुक्तिक राहील. - Kaustubh
विरोध- ही स्पर्धा मे अखेरपर्यंत असल्यामुळे लेखात सारखे बदल करण्यात येतील. सदर लेखात बदल करणे धोकादायक आहे. हाच लेख जूनचे सदर करावे.. - अभय नातू
विरोध- वरिलप्रमाणे जूनचे सदर म्हणून योग्य वाटते. - प्रणव कुलकर्णी
विरोध- अभय आणि प्रणव यांच्या मताशी मी सहमत आहे. मासिक सदरातील लेख हा परिपूर्ण, योग्य त्या प्रमाणात माहिती असलेला आणि ज्यात वारंवार मोठे/महत्त्वाचे बदल संभवत नाहीत असा असावा . - Andharikar

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९‎

[संपादन]
पाठिंबा - अभय नातू
- Withdrawn due to lack of support. अभय नातू १९:४८, २८ ऑक्टोबर २००९ (UTC)

सचिन तेंडुलकर

[संपादन]
पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - Andharikar
विरोध- लेख अद्ययावत करण्यासाठी अनेक बदल करावे लागतील. तोपर्यंत विरोध.. - अभय नातू
विरोध- incomplete. - padalkar.kshitij
पाठिंबा - Ckatra
विरोध- अद्ययावत नाही.. - Dakutaa

२०१० इंडियन प्रीमियर लीग

[संपादन]
पाठिंबा - अभय नातू

माजे समर्तन संकेत ०७:०६, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती. माहिती वाढवून लेख सादर करावा.. - Pushkar Pande
विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती.. - Nitin.kunjir

बाबासाहेब अांबेडकर

[संपादन]

प्रताधिकारभंग आणि इतर समस्यांमुळे हे नामांकन रद्द केले गेले -- अभय नातू (चर्चा) २१:४०, ३० सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

पाठिंबा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हा लेख मुखपृष्ठ सदर होण्याइतपत चांगला झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक व्यक्तीमत्त्व व त्यांचा जन्मोत्सव हा जागतिक महोत्सव आहे. अनेक विकि सहकार्यांच्या योगदानातून हा लेख सुधारला गेला आहे. हा मुखपृष्ठ सदरासाठी उत्तम लेख आहे. - संदेश हिवाळे
पाठिंबा- लेख खूप छान व अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.. - LAXMANSALVE
पाठिंबा- या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. सबब हा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून केला जावा. - प्रसाद साळवे
विरोध- येथे दिलेल्या सर्व सुधारणांनतरच हा लेख मुखपृष्ठ सदर केला जावा, प्रस्तुत लेखात मोठ्या प्रमाणात संदर्भहिन, जाहिराबाजीकरणारा,अतिशयोक्तीपुर्ण मजकूर आहे, वारंवार सुचना देऊनही तो मजकूर काढला जात नाहीये, मी प्रत्येक ठिकाणी संदर्भासह प्रस्तूत मजकूर खोटा असल्याचे आणि चुकीचा असल्याचे चर्चापानावर दाखवले आहे, युटूब आणि इतर ठिकाणचे व्हीडीयो किंवा बातम्या ऐतिहासिक घटनांना संदर्भ म्हणून वापरले आहेत, शिवाय दिलेले संदर्भ आणि मजकूर याचा संब्ंधही लागत नाहीये, त्यामुळे सुमारे 150 संदर्भ लेखाला असूनही त्यातील अर्ध्याच्यावर संदर्भ आणि मजकूर यांचा संब्ंध लागत नाहीये. मी लेखात प्रत्येक ठिकाणी संदर्भ तपासत आहे आहे शिवाय, जेथे जमेल तेथे नवे संदर्भ जोडत आहे, परंतू जो पर्यंत सर्व संदर्भ आणि अक्षेप यांचे निरसन केले जात नाही तोपर्यंत माझा विरोध राहिल. कॉपीव्हायो नावाच्या अवजाराने तपासणी केल्यावर आलेल्या निकालानूसार ह्या लेखातील मजकूराचा मोठा भाग(जवळपास ९२%) संबंधीत संकेतस्थळांवरून चक्क नकल करून डकवलेला आहे असे लक्षात येते, ही परिस्थीती लक्षात घेता माझा लेखाला सदर म्हणून घेण्यास स्पष्ट नकार आहे.. - sureshkhole
टिप्पणी - चांगला लेख व मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. लेखाचे विकिकरण करण्याची गरज वाटते आहे.. - Tiven2240
विरोध- मी येथे माझे मत नोंदविले आहे. या लेखाचे अविश्वकोषीय स्वरूप बदलले तर माझा पाठींबा आहे. उचित संदर्भ नसलेले, विधाने/मते यांनी युक्त असे अनेक परिच्छेद लेखात आहेत. संपादक प्रयत्न करत आहेत. तरी वारंवार अविश्वकोषीय माहिती भरली जात आहे.. - सुबोध कुलकर्णी
पाठिंबा- मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. - Nitin.kunjir
विरोध- अविश्वकोशीय स्वरूप बदलावे.विकिकरण करण्याची गरज वाटते आहे.. - आर्या जोशी
पाठिंबा- हा लेख मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. - विनायक कटक
विरोध- नकल-डकव केलेला (लेखाचे चर्चापान पहा) मजकूर बदलला जाई पर्यंत किंवा वगळला जाईपर्यंत नकार. - अभय नातू

हा नामांकन बंद करण्यात आले आहे. लेख काढण्यात येणार आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५२, २० जुलै २०१८ (IST)[reply]