विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

(एक आठवडा अर्धसुरक्षीत)

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

Chavdi-main.PNG
चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा
Help-browser.svg
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र नवाप्रश्न जोडा | वाचा
Wikipedia-logo-v2.svg
दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)
Edit-find-replace.svg
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी निवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

Preferences-system.svg
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा
Dheya-beta.PNG
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा
Dialog-information on.svg
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा


०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल. • प्रचालकांना विनंती करण्यापुर्वी उपरोक्त सुचनां आणि संकेत नजरे खालून घाला.
 • आपल्या विनंत्या सुयोग्य विभागातच असा === तिहेरी उपविभाग करून जोडा.
 • जुन्याचर्चा विदागार पानावर हलवताना मुख्य विभागांची रचना बदलली जाणार नाही याची दक्षता घ्या.


प्रचालकांना विनंती[संपादन]

विनंती: 'चेंबुर रेल्वे स्थानक' आणि 'चेंबूर रेल्वे स्थानक' हे २ लेख आहेत. त्यापैकी एकच लेख पुरेसा आहे. कृपया "चर्चा:चेंबुर रेल्वे स्थानक" हे पान बघावे आणि योग्य ती कार्यवाही करावी.

प्रचालकांना विनंती[संपादन]

दादर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्षात दोन स्थानके असून एक मध्य मार्गावर आहे तर दुसरे पश्चिम मार्गावर आहे. दोन्ही स्थानाकांचा संकेत निराळा असून दोन्हीचे फलाट क्र्. १ पासुन सुरु होतात. त्यामुळे एखादा तपशील देताना फलाट क्र्. २ असे लिहिले तर गोंधळ होउ शकतो की कोणत्या मार्गावरचा? मध्य की पश्चिम ? तरी रेल्वेच्या अधिकृत नावानुसार 'दादर मध्य रेल्वे स्थानक' आणि 'दादर पश्चिम रेल्वे स्थानक' असे २ वेगळे लेख तयार केल्यास सोयीचे राहील.

प्रचालकांना विनंती[संपादन]

लोकल्स" वापरावे की "उपनगरीय गाड्या" वापरावे याविषयी मार्गदर्शक तत्व / धोरण आवश्यक आहे .... जेणे करुन लेखनामध्ये सुसुत्रता राहील.

तसेच विकिपिडियावर कित्येक ठिकाणी उपनगरी असा शब्द दिसत आहे. कोणता शब्द बरोबर आहे....उपनगरी की उपनगरीय याचा कृपया खुलासा केल्यास शंका निरसन होईल.

प्रचालकांना विनंती[संपादन]

"लौजी रेल्वे स्थानक" या लेखात बोरीबंदर या स्थानकाचा उल्लेख केला आहे. सध्या भारतीय रेल्वेवर "बोरीबंदर" नावाचे कोणतेही स्थानक अस्तित्वात नाही. तरी योग्य ते संपादन केल्यास लेखाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे मला वाटते.

प्रचालकांना विनंती[संपादन]

अंधेरी या स्थानकात ९ फलाट असून या स्थानकाचा संकेत ADH आणि उपनगरीय संकेत AD असा आहे. कृपया माहिती लिहावी.

प्रचालकांना विनंती[संपादन]

येथे "पळसदरी रेल्वे स्थानक" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे मराठीत 'पळसधरी' आणि हिंदीत 'पलसदरी' असे नाव आहे. तरी योग्य ती सुधारणा आवश्यक असल्यास करावी.

प्रचालकांना विनंती[संपादन]

कित्येक लेखात सह्याद्री पर्वतरांग असा उल्लेख आहे. पण भूशास्त्रानुसार सह्याद्री हा पर्वत नाही. सह्याद्रीला कडा किंवा डोंगररांग असे संबोधणे शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य आहे. आवश्यक तिथे बदल करावेत.

प्रचालकांना विनंती[संपादन]

येथे "छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे नाव मराठीत "श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर" असे आहे. तरी योग्य ती सुधारणा करावी.

मराठी विकिपीडिया सोशल नेटवर्किंग खाते[संपादन]

@Mahitgar:@अभय नातू:@Rahuldeshmukh101:

जसे मे २०१७ पासून नवीन मुखपृष्ठ येतील त्यात सोशल नेटवर्किंग खाते बनवण्याची गरज आहे. ते खाते अधिकृत असतील त्याकरिता आपले मत व्यक्त करा. कुठल्याही खाते बनवण्यास एक ई-मेल लागते, का मराठी विकिपीडिया कडे असे ई-मेल आहे का? ज्यांनी हे खाते बनवले जातीत. एक दुसरी गोष्ट म्हणजे एक फोन नंबर जे सुद्धा महत्वाचे आहे याकरिता. मी मेटावर विचारले की ((उधारण-marathi@wikipedia.org)) असा मिळेल का तर त्यावर काही जवाब दिसत नाही. यावर लवकर झाले की आपण अधिकृत खाते बनू शकते आणि मराठी विकिपीडियाला एक नवीन जागा सोशल नेटवर्किंग साईट्सवर देऊ अशी अपेक्षा आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५४, ६ एप्रिल २०१७ (IST)

marathi@wikipedia.org असा इमेल पत्ता मिळणे शक्य नाही असे वाटते परंतु मराठी विकिपीडियाची अधिकृत मेलिंग लिस्ट केली असता त्याचा इमेल पत्ता वापरता येईल. या पत्त्यावर पाठवलेले विपत्र लिस्टला सबस्क्राइब केलेल्या सगळ्यांना येईल.
हाच इमेल पत्ता वापरून सोशल नेटवर्किंग खातीही तयार करता येतील. इतर विकिपीडियांनी यासाठी काय केले आहे हे कळल्यास सुसूत्रता ठेवता येईल.
अभय नातू (चर्चा) १९:४२, ६ एप्रिल २०१७ (IST)

@अभय नातू:लिस्ट जर तयार करण्यात आली की खूप चांगले होईल. मी इथे पहिले परंतु मराठीचे काही लिंक सापडले नाही. लिस्ट कशी तयार करू याची जाणकारी घ्या की मी मराठी करीता तयार करून सोसिअल मीडियाचे काम चालू करेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:२८, ६ एप्रिल २०१७ (IST)

phabricator[संपादन]

मी येथे phabricator वरच्या प्रस्तावावरून आलो. माझ्या मते येथे कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्णयासाठी कौल घ्यावा. - प्रबोध (चर्चा) ०२:०४, ३ मे २०१७ (IST)

1 मे 2017 बाबत[संपादन]

निवेदन आहे की मुखपृष्ठात एक शुभेच्छा चित्र टका. याचे डेमो सदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ इथे दिसते. यासोबत २ चलचित्र सुद्धा टाका. File:Abhay Natu talks about contributing to Wikipedia.webmFile:Abhay Natu urges to contribute to Marathi Wikipedia.webm १ मे करिता निवेदन --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४९, ३० एप्रिल २०१७ (IST) ॉ

टायवीन,
चित्रात शुद्धलेखनचूक दिसत आहे दिवसाची ऐवजी दिवसाच्या पाहिजे. मुखपृष्ठावर अशी चूक दाखवणे बरोबर नाही. चलचित्रे घालण्यास हरकत नाही परंतु त्यात मी असल्याने त्याला इतर कोणी तरी अनुमोदन दिले तर बरे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:१३, ३० एप्रिल २०१७ (IST)

@अभय नातू: ती चूक मी सकाळी बरोबर करणार. चलचित्र बाबत याला मी नामनिर्देशन केले आहे यावर तुम्ही अनुमोदन दिले तरी चालेल असे वाटते. चित्रात जर अजून चूक असेल तर नोंदवे तेही बरोबर करेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४९, ३० एप्रिल २०१७ (IST) @अभय नातू: चित्रात दिनाचे लिहिले आहे चालेल नाही का?--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:५८, १ मे २०१७ (IST)

महाराष्ट्र दिनाच्या संदेशात चलचित्र घालण्यास माझे अनुमोदन.
शिवाय दर्शनी संदेशातल्या "दिवसाची" शब्दाचे लेखन "दिवसाच्या" असे लिहून दुरुस्त करावे ही विनंती.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १२:५४, १ मे २०१७ (IST)

वरील प्रस्तावास माझेही अनुमोदन. --वि. नरसीकर (चर्चा) १३:००, १ मे २०१७ (IST)

बद्दल केले आहे. चलचित्र टाकून ग्या अशी मागणी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४१, १ मे २०१७ (IST)

बदल झाल्याचे पाहिले. तत्परतेबद्दल धन्यवाद! :)
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १७:३४, १ मे २०१७ (IST)

टायवीन,

चित्र लगेच बदलल्याबद्दल धन्यवाद.

चलचित्र अजून घातलेले नाही. १ मे आता संपतच आला आहे (भारतात तरी). असे असता अजून एखाद्या दिवशी हे घालावे असे वाटते.

अभय नातू (चर्चा) १९:१५, १ मे २०१७ (IST)


चलचित्र १ मे चा उल्लेख देते असे नाही परंतु ते माझ्याकरीता व अन्य विकिपीडियन करीता एक प्रोत्साहन म्हणून काम करते. असे चलचित्र मराठी विकिपीडिया बाबत आहेत आणि खूप कमी आहेत याला जर ३६५ दिवस मुखपृष्ठवर ठेवले तरीही ते आपल्या करीता प्रोत्साहनपर असेल अशी माझे म्हणणे

मराठी विकिपीडियाच्या १५व्या वाढदिवसाची शुभेच्छा, प्रचालक हे विकिपीडियाचा शान राखवण्यास आपले उल्लेखनीय योगदान देतात. आजचा दिवशी तुमच्या व इतर विकिपीडियनच्या नावानी 

Wikipedia15cake.JPG


--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:४२, १ मे २०१७ (IST)

कॉमन्सवर चढवलेली मराठी भाषेतील काही अमुफ्त पुस्तके.[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर काही मराठी भाषेतील पुस्तके चढवलेली आहेत. त्याने प्रताधिकार उलंघन होते. मराठी भाषेतील असल्यामुळे मी प्रचालकांना @अभय नातू:,@Mahitgar: व अन्य सदस्याना @संदेश हिवाळे: @: निवेदन देतो की प्रताधिकार बाबत खालील सदस्यांना संदेश द्यावेत.

कंमोंस्वारील चालू असलेले तक्रार --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:११, ४ जुलै २०१७ (IST)

हा विषय मुख्यत्वे @सुबोध कुलकर्णी: यांच्याशी संलग्न आहे तो ते पहातील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३२, ४ जुलै २०१७ (IST)

माहितगार सरांशी सहमत आहे. कुलकर्णी सर मदत करा.

--संदेश हिवाळेचर्चा १४:५४, ४ जुलै २०१७ (IST)

@Tiven2240:,
ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
तेथे पाहिले असता सदस्य:Dharmadhyakshya यांनी मराठी विकिपीडियावर त्यांना प्रताधिकाराबद्दल आवाज उठवल्यामुळे बॅन करण्यात आले असे लिहिले आहे. थोडा शोध घेता कळले की सदस्य:Mahitgar यांनी त्यांना बॅन केले होते.
माहितगार,
या बॅनबद्दलची पार्श्वभूमी कोठे मिळेल? विशेषतः हा बॅन घालण्याआधीच्या कृती आणि संवाद याबद्दल मला कुतुहल आहे.
अभय नातू (चर्चा) १९:३१, ४ जुलै २०१७ (IST)

@अभय नातू: हा बॅन बद्दल मी प्रश्न विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#Dharmadhyaksha विचारले व @Mahitgar: यांनी जवाब दिले आहे. मी त्यांच्या बॅन बद्दल आजही विरोध करत आहेत आणि ते जोग्य नाही असे माझे म्हणे आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:४३, ४ जुलै २०१७ (IST)

@Tiven2240:,
पुन्हा एकदा धन्यवाद. तेथील भला मोठा मजकूर वाचून फारसा काही अर्थबोध झाला नाही. त्यातील व्यक्तिशः मजकूर वगळून नेमके मुद्दे काय आहेत हे समजणे फारच कठीण वाटले.
पुन्हा एकदा सवडीने वाचतो म्हणजे कदाचित कळेल. तुम्ही त्या उत्तराचा सारांश काढला असेल तर तो ही वाचायला आवडेल.
अभय नातू (चर्चा)

@अभय नातू: तुम्ही एकाद्या वाचा माझ्या प्रमाणे हे सर्व "ओल्ड माहितगार पोलिसी" आहेत ते काही नवीन नाही परंतु मी जेव्हा त्यांना ब्लॉक केले तेव्हा सर्व गोस्ट पाहत होतो आणि माझ्या हिशोबाने ते योग्य नाही. धर्मदक्षय यांनी कॉमन्स वरील चित्र काढली असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सर्व चित्र डिलीट केले आहे. जास्त माहिती धर्मदक्षय पासून माझे झालेले संवाद पहा [१]. जर जोग्य असेल तर ब्लॉक काढण्यास विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४७, ४ जुलै २०१७ (IST)

टायवीन, यापुढे या विषयावर अधिक दबाव टाकू नये आणि मध्यस्तीचे प्रयत्नही करु नयेत हि नम्र आगहाची विनंती. मराठी विकिपीडियाच्या बाबत ते बदनामी थांबवून सहकार्याची भूमिका घेतील तेव्हा मी स्वत:हून योग्यवेळी त्यांच्यावरील बॅन काढेन. त्यांच्या सातत्याने खोटे बोलून बदनामी करण्याने ब्लॅकमेलींगचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरील बॅन काढला जाणार नाही. धर्माध्यक्ष दिशाभूल करत आहेत. धर्माध्यक्षांना victim play करायचे तर play करुद्यात, सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे तरच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. त्यांनी कॉपीराईट फ्री असलेले साहाय्य पानावरील चित्र तेही द्वेषाने वगळले यासाठी त्यांना बॅन केले आहे. कॉपीराईटेड छायाचित्र वगळण्यासाठी त्यांना बॅन केलेले नाही ते फोडत असलेला टाहो दिशाभूल करणारा चुकीचा आणि नाटकबाजीचा आहे.

त्यांच्यावरील पहिला बॅन महाराष्ट्र दिनाच्या काळात नवागत लेखकांना मार्गदर्शन नकरता इंग्रजी विकिपीडियास्टाईल नियम लावून केलेल्या वगळा वगळी साठी तात्पुरताच् होता, त्यानंतर कॉपीराईटमुक्त छायाचित्र वगळण्याचा आगाऊपणा केला, वरुन मराठीभाषा असो की भारत असो त्यांची वृत्ती अरेरावीची असते. त्यांना मी हाताळतो आहे इतरांनी तुर्तास लक्ष घालू नये. मराठी विकिपीडिया स्वतंत्र पॉलीसी बनवतो आणि त्याबाबत तडजोड होणार नाही. तुर्तास विषय येथेच थांबवण्यासाठी आभारी आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:०८, ४ जुलै २०१७ (IST)

प्रताधिकार उल्लंघन करणारी खाती गोठवण्याचा प्रस्ताव[संपादन]

ता.क. वरील सदस्यांचे योगदान व त्यांची चर्चा पाने पाहिला असता लक्षात येईल की यांना वारंवार विनंती, सूचना व इशारे देण्यात आलेले होते व काही वेळा त्यांना तात्पुरता बॅनदेखील देण्यात आलेला होता. यांनी इतर ठिकाणीही केलेले संभाव्य प्रताधिकार उल्लंघन पाहता त्यांना लगेचच एकगठ्ठा बॅन करावे हा प्रस्ताव मी मांडत आहे. किमानपक्षी त्यांच्या योगदानावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अभय नातू (चर्चा) १९:३४, ४ जुलै २०१७ (IST)
सुबोध कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली विकिमिडीया फाऊंडेशनच्या एजन्सीसाठीच काम चालू आहे. सुबोध कुलकर्णींना निरोप दिला आहे. कॉमन्सवरील संपादकांकडे लेखकांच्या मृत्यूच्या तारखा नाहीत -ते डोळ्यावरपट्टी बांधून संशयाने सर्वच याच्यावर डिलीशन साचे लावत आहेत. मृत्यूच्या तारखांची सुबोध कुलकर्णींनी राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतर संस्थांच्या साहाय्याने यादी बनवली आहे, १८४७ च्या कायद्यांतर्गतही येणारी बरीच पुस्तके कॉपीराईट फ्री असणे अभिप्रेत असावे. हा मुद्दा सुबोध कुलकर्णी कॉमन्सवर निपटतील. पुस्तके तशीही मराठी विकिस्रोतासाठी असणार आहेत आणि तेथील अटी पुरेशा कडक ठेवल्या आहेत त्याची सुबोध कुलकर्णींना कल्पना आहे.

टायवीनने निरोप्याचे काम केले आहे, निरोप्याचे काम पार पाडल्या बद्दल त्यांचे आभार मानणे पुरेसे आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४७, ४ जुलै २०१७ (IST)

@Mahitgar: आभार मुळे धन्यवाद :) @सुबोध कुलकर्णी: डिलिशन request पाहिले परंतु जे उसर प्रॉब्लेम वर आपले विचार स्पस्ट कराल तर खूप आभारी --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:५८, ४ जुलै २०१७ (IST)

वर उत्तर दिले आहे, योग्य गोष्टी योग्य वेळी करेन. तुम्ही ह्या विषयात यापुढे लक्ष न घालता; इतर कनस्ट्रक्टीव्ह कामात लक्ष दिल्यास अधिक चांगले राहील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१३, ४ जुलै २०१७ (IST)
माहितगार,
टायवीन यांना निरोपे म्हणून त्यांच्या कामगिरीचे मोल कमी लेखू नका. आणि निरोप्या म्हणल्यास निरोप्यालाच बडविण्याची चूक करू नये ही विनंती. टायवीन यांनी कोठे काय कधी करावे हे तुम्ही-आम्ही सांगू नये असे वाटते.
असो, आपण सुज्ञ आहात. योग्य तेच कराल ही खात्री आहे.
मूळ मुद्दा म्हणजे बॅनचा, तर त्याबद्दल मी मागीलपुढील माहिती बघत आहे. तुमची काही मदत लागल्यास मागेनच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:३७, ५ जुलै २०१७ (IST)


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३१, ५ जुलै २०१७ (IST)

यादी तयार करुन दिल्याबद्दल धन्यवाद. माझी सूचना/सजेशन वाचली असे गृहित धरतो.
अभय नातू (चर्चा) १९:४६, ५ जुलै २०१७ (IST)

सर्व संबंधित सदस्य व प्रचालक,
प्रथमच नमूद करू इच्छितो की, सदर अनियमितता माझ्या संपर्कातील सदस्यांकडून प्रशिक्षण व सरावादरम्यान झालेल्या आहेत. MGS & CIS विकिस्रोत प्रकल्पामध्ये संस्थेने जतनमुल्य असलेली २५०० पुस्तके स्कॅन केलेली आहेत. या पुस्तकांची प्रताधिकाराच्या दृष्टीने छाननी सुरु आहे. त्यासाठी १९१४ पूर्वीची, लेखक मृत्यूनंतर ६० वर्षे झालेली अशा वेगवेगळ्या याद्या बनविणे सुरु आहे. पाबळ येथील विज्ञान आश्रम ही संस्था ग्रामीण भागातील युवा पिढीला केवळ तंत्रज्ञान व संगणक साक्षर न करता विकिपीडिया,विकिस्रोत,विक्शनरी अशा ज्ञाननिर्मिती प्रकल्पाच्या कामातही प्रशिक्षित करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे तेथील १०-१५ युवतींनी या कामात अतिशय पुढाकार घेतल्याने त्यांचे प्रशिक्षण काम करता करता सुरु आहे.दोन कार्यशाळाही घेतल्या गेल्या. त्यांना बॅन न करता अभय नातू यांनी सुचविल्याप्रमाणे - योगदानावर लक्ष ठेवून त्यांना सूचना देत कामात अचूकता आणण्यासाठी थोडे दिवस वेळ द्यावा अशी विनंती मी करत आहे. मीही अधिक सजगतेने अशा चुका घडणार नाहीत याची काळजी घेतच आहे. कॉमन्सवरील पुस्तके वगळण्याची विनंती मीच नोंदविली आहे. नियमात न बसणारी सर्वच पुस्तके यथावकाश यात येतील. आणि प्रताधिकारमुक्त पुस्तकेच काही दिवसांत तेथे असतील, जी क्रमाक्रमाने विकीस्रोतवर ओसिआर करून आणण्याचे प्रस्तावित आहे. आपण सर्व जण हे समजून घ्याल आणि या प्रक्रियेत सहकार्य कराल याची आशा आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१६, ६ जुलै २०१७ (IST) @सुबोध कुलकर्णी: तुमचे बोलणे कळले व कॉमन्स वर त्याची नोंद दिली आहे. जवाब दिल्याबद्दल व काळजी घेतली बद्दल धन्यवाद ---टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:४८, ६ जुलै २०१७ (IST)

नमस्कार @सुबोध कुलकर्णी:,
वरील गोष्टीचे स्पष्टीकरण केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही व पाबळ येथील सदस्य करीत असलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे. यात सहभागी युवतींनी मारुती चित्तमपल्लींच्या पुस्तकावरुन मराठी विकिपीडियावर पक्ष्यांबद्दलचे अनेक लेख निर्माण केले आहेत. हे लेख लिहिले जात असताना त्यात थेट नक्कल असल्याची शंका आल्याने मी त्यांना अनेकदा साद घातली व सूचना देऊ केल्या. त्यांस काहीही प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रश्नांकित असलेली संपादने चालूच राहिली. असे भविष्यात होऊ नये याची काळजी घेण्याची त्यांना सूचना करता येईल का? कोणतीही शंका असल्यास त्यांनी माझ्याशी (आणि इतरांशीही) थेट संपर्क साधावा. मी शक्य तितकी मदत करेन ही खात्री बाळगावी. असे काम करणारे नवीन सदस्य आपल्याला नक्कीच हवे आहेत आणि म्हणनच तेव्हा शक्य तितका संयम राखून त्यांना सरसकट बॅन केले नाही.
असे असताही प्रताधिकार व संबंधित विषय महत्वाचे आहेत आणि त्याबद्दल त्यांचे मार्गदर्शन व्हावे किंवा त्यांनी येथे माहिती, मदत मागावी असे मला तीव्रपणे वाटते. क्वचित आणि अनवधानाने चुका होणे शक्य आहे, नव्हे अपेक्षितच आहे. त्या चुका लक्षात आल्यावर/आणून दिल्यावर लगेचच त्या सुधारल्या तर उत्तम. त्यासाठी या सदस्यांना येथे (आणि कॉमन्सवरही) इतरांशी संवाद साधण्यास उद्युक्त करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो.


असो, जुनी मराठी पुस्तके स्कॅन करण्याबाबत मला एक प्रश्नवजा सूचना तुमच्यापुढे आणावीशा वाटते. काही पुस्तकांच्या प्रती चाळल्या असता दिसून येते की ती ऑलरेडी जीर्णावस्थेत आहेत. असे असता अधिक वेळ न घालवता भराभर स्कॅन केलेले बरे. या इंटेलेक्युअल प्रॉपर्टीची ताबडतोब प्रत न केल्यास ती कायमची गायब होण्याची शक्यता आहे. तरी अशा (प्रताधिकार मुक्त नसलेल्या परंतु दुर्मिळ असलेल्या) पुस्तकांच्या प्रती काढून त्या सध्या प्रकाशित न करता कुलुपबंद ठेवाव्यात आणि जेव्हा त्या प्रताधिकारमुक्त होतील तेव्हा त्या खुल्या कराव्या. असे करणे लॉजिकल आहे. यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का? सीआयएसचे कायदेतज्ञ याबद्दल माहिती काढू शकतील?
आपल्याकडून व आपल्या सहकाऱ्यांकडून येथे (आणि कॉमन्सवर) अधिकाधिक योगदान व्हावे अशा आशा व अपेक्षेसह,
अभय नातू (चर्चा) १९:४४, ६ जुलै २०१७ (IST)

नमस्कार @सुबोध कुलकर्णी:,

आपण मराठी विकी स्रोत बाबत मांडलेली मीमांसा वाचली. गेल्या १-२ वर्षां पासून A2K दरवर्षी मराठी विकी स्रोत ला आपल्या वार्षिक विकास आराखड्यात मांडत आली आहे. आजवर ह्या काठी मोठा फंड सुद्धा खर्ची घातलेला आहे.

मला असे वाटते कि आता वेळ आली आहे कि ह्यातून निष्पन्न काय झाले ह्याची पण चर्च्या व्हावी कारण आपण लोकांच्या केवळ मोठं मोठ्या गोष्टी कधी पर्यंत ऐकायच्या ? जुलै महिन्यात विकी सोर्स चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे तो मी मराठी विकिपीडिया वाचक वर्गासाठी येथे देतो आहे ह्यात मराठी कुठेच नाही ह्यावर सुबोध आपण स्पष्टीकर द्यावे असे मला वाटते.

Hello all,

We've just published the July 2017 Indic Wikisource statistics. We are very happy to announce that, we have now 11 Indic Wikisources. From the birth of Punjabi Wikisource, within a two month, they have beaten Marathi and Assamese Wikisource.

Here is the top 3 rank according to different criteria few stats ...

As per Number of article

 1. Sanskrit Wikisource ( 17214 pages) - supported by 0.04% scan pages.
 2. Kannada Wikisource ( 12537 pages) - supported by 0.62% scan pages.
 3. Telugu Wikisource ( 11881 pages) - supported by 24.89% scan pages.


As per Number of page Validation

 1. Telugu Wikisource ( 20159 pages)
 2. Tamil Wikisource ( 6312 pages)
 3. Gujarati Wikisource ( 5652 pages)


As per Number of page Proofread

 1. Telugu Wikisource ( 25184 pages)
 2. Bengali Wikisource ( 10793 pages)
 3. Tamil Wikisource ( 9244 pages)

As per percentage supported by scan pages.

 1. Bengali Wikisource (94.64%)
 2. Telugu Wikisource ( 24.89%)
 3. Gujarati Wikisource (20.21%)

Full Indic Wikisource stats here below where Language subdomains are ranked by the number of page verifications : [category q3] + 2x[category q4] https://wikisource.org/wiki/Wikisource:Indic_Wikisource_Stats

I want to specially mention that there are no visible improvement on proofreading works and page content supported by scan at Marathi,Assamese, Sanskrit, Panjabi , and Kannada Wikisource.

Regards,

Jayanta Nath

Indic Wikisource Community

मराठी विकिपीडियावर अपलोडर गट प्रस्ताव[संपादन]

मराठी विकिपीडियावर लेखांची गुणवत्ता वाढवण्यास चित्र जरुरी आहे. मराठी भाषांतील अधिक अधिक मुक्त प्रतिमा नाही त्यामुळे मराठी विकिपीडियावर उपलोअडर गट तयार करण्यास याची सुरुवात केली पाहिजे असे वाटते. विकिपीडिया फेअर ऊस पोलिसी अंतर्गत याची स्थापना करण्यास मी प्रस्ताव सादर करत आहे. माननीय प्रचालक व मराठी विकिपीडिया समुदाय आपल्या मत द्यावे अशी आशा आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२६, १७ जुलै २०१७ (IST)

सदस्य Mahitgar यांची नोंद - मराठी विकिपीडियावर प्रताधिकार कायदे विषयक सुजाण सदस्यबळ अनुपलब्धतेमुळे तुर्तास अस्विकार
अभय नातू (चर्चा) २०:४९, २० जुलै २०१७ (IST)
सदस्य अभय नातू व माहितगार यांचे मताशी सहमत.

--वि. नरसीकर (चर्चा) २१:१३, २० जुलै २०१७ (IST) --वि. नरसीकर (चर्चा) ११:०१, २२ जुलै २०१७ (IST)

स्पष्टीकरण - वरील नोंद माहितगार यांची आहे. मी ती फक्त स्थापित केली. मी यावर (अजुन तरी) माझे मत दिलेले नाही. :-)
अभय नातू (चर्चा) २३:०४, २१ जुलै २०१७ (IST)
सद्य स्थितीत प्रचालक हे uploader आहेतच त्यामुळे वेगळ्या गट निर्मितीची गरज वाटत नाही. संतोष दहिवळ

@संतोष दहिवळ: हे तर माहीत आहे; परंतु मराठी विकिपीडियावर जे चित्र लेखात गरज आहे याकरिता हमेशा प्रचालकांना कष्ट का? मराठी उपलोअड विझर्ड पूर्वी बंध करण्यात आले आहे व मराठी विकिपीडियावर कॉपीराईट बदल काही स्पस्ट नाही. सध्या वर्ग:मराठी चित्रपट नामसूची पहा. मराठीत असून यावर चित्र नाही. परंतु इतर विकीवर याचे चित्र आहे तर लोक का मराठीत माहिती घेतली जेव्हा मराठीत चित्रपटाचे चित्रच नाही? लेख केवळ प्रमाणच नव्हे तर दर्जा देखील असला पाहिजे याची ठाऊक प्रचालकांना आहेत परंतु यावर उपाय चर्चा नाही। मिडियाविकी:Sitenoticeवर अनेक नोटिस टाकून जर याचे उपाय दिसत आहे तर चांगले, परंतु मला काही पुढे दिसत नाही व प्रोत्साहन मिळत नाही. याचे परिणाम स्वरूप तुम्ही मराठी विकिपीडियावर सक्रिय असलेली सदस्य पहा पूर्वी ३०० पार आज १३५ सक्रिय सदस्य आहेत. याने मराठी विकिपीडियाची प्रगती फारच दिसत नाही. कॉमन्स व इतर सहप्रकल्पावर मराठी विकिपीडिया नाहीसा झाला आहे परंतु आपण आज सुद्धा आपल्या परीचयात लॉ-विधी विषयाचे अभ्यासक/प्राध्यापक/विद्यार्थी/वकील अथवा संबंधीत संस्था आहेत का ? याना शोदात आहेत. तथास्तु ! --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:००, २३ जुलै २०१७ (IST)

"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक बदलण्याबाबत[संपादन]

"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक "स्मृती मानधना" असे असले पाहिजे, असे वाटते. मराठीत हा बरोबर उच्चार आहे. तसे शीर्षक बदलता येईल का? ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५२, १७ सप्टेंबर २०१७ (IST)

नमस्कार,
स्मृती मानधना हा उच्चार (विशेषतः मानधना या भागाचा) बरोबर असल्याचा संदर्भ कोठे मिळेल? आंतरजालावार अनेक ठिकाणी या नावाचे शुद्धलेखन Mandhana आहे. याचा उच्चार मंधाना किंवा मानधना होउ शकतो. समालोचनात मंधाना हा उच्चार आढळतो. तरी मानधना बरोबर असल्याचा संदर्भ देउन शीर्षक बदलता येईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०४:४२, १८ सप्टेंबर २०१७ (IST)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! वृत्तपत्रातील उल्लेख संदर्भ म्हणून ग्राह्य धरले जात असतील तर हे काही संदर्भासाठी दुवे :

http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-smruti-mandhana-talking-68329 http://www.lokmat.com/oxygen/blue-jersey-girls/

०८:३१, १८ सप्टेंबर २०१७ (IST)

वृत्तपत्रातील factual संदर्भ नक्कीच ग्राह्य धरता येतील परंतु नावांच्या , विशेषतः अमराठी नावांच्या उच्चाराबद्दल मराठी वृत्तपत्रांतून असंख्य चुका आढळतात. तरी वरील दोन संदर्भांशिवाय एखादा मिळाल्यास उत्तम.
सध्यापुरते वरील मजकूर लेखाच्या चर्चापानावरही नोंदवीत आहे म्हणजे इतर वाचकांच्याही ध्यानात येउन त्यांचाकडून संदर्भ मिळण्याची शक्यता वाढेल.
अभय नातू (चर्चा) ०९:१६, १८ सप्टेंबर २०१७ (IST)

"बाबासाहेब घोरपडे" या शीर्षकाविषयी[संपादन]

इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या विषयीच्या पानाचे शीर्षक बाबासाहेब घोरपडे असे आहे. खरेतर बाबासाहेब हे त्यांचे संबोधनात्मक नाव होते. त्यांच्या नावे इचलकरंजीत असलेल्या संस्थांची नावे सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह आणि नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटी अशीच आहेत. तेव्हा ह्या पानाचे नाव सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे किंवा नारायणराव घोरपडे असे असले पाहिजे, असे वाटते. यावर चर्चा व्हावी, अशी विनंती.

ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५७, १७ सप्टेंबर २०१७ (IST)


नारायणराव घोरपडे यांनी अनुवाद लेखन आणि स्फुट लेखन कोणत्या नावाने केले आहे ?
बाकी वस्तुनिष्ठतेचा भाग म्हणून ज्ञानकोशांचा कल व्यक्तीपूजा टाळण्याकडे असतो याची आपणास कल्पना असेलच, आवश्यक उल्लेखापलिकडे बिरुदावल्या टाळलेल्या बऱ्या असो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३०, १७ सप्टेंबर २०१७ (IST)