विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/आम्ही कोण
विकिपीडियन्स हा समाज , जगातील मिळेल त्या माणसाकडून माहिती मिळवून, ती जगातील दुसर्या इच्छुक माणसाला मुक्तपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने, सामुदायिकरीत्या विविध सकारात्मक प्रयत्न करणारा समूह आहे. आम्ही एकत्र येतो आणि सोबतच ज्ञानार्जनाच्या आणि ज्ञानदानाच्या सकारात्मक कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने फूल ना फुलाच्या पाकळीचे योगदान करतो. विकिपीडिया या कामाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. विकिपीडिया चहात्यांची सावकाशीने पण निश्चितपणे अशी एक सकारात्मक ओळख बनत चालला आहे. विकिपीडियन समुदायाचा एक घटक म्हणून परस्पर मनमोकळा परिचय आणि सहकार्य असा या पानाचा हेतू आहे. उजव्या बाजूस काही उपयुक्त दुवे देण्याचा प्रयत्न केला आहे. विकिपीडियातील इतर सर्व पानांप्रमाणे येथील बदल तुम्ही स्वत: घडवू शकता. विकिपीडियाच्या चहात्यांनी विकिपीडियाला जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणार्या पहील्या दहा संकेतस्थळात आणि विश्वकोशांमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे .हे स्थान अबाधित ठेवण्याच्या आणि ज्ञानाचे संवर्धन करण्याच्या ध्येयात आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद
विकिपीडिय़ाचे मराठी भाषेतील अंग या नात्याने आम्हाला प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायचे आहे. आपण मराठी भाषेत निर्माण होणार्या ज्ञानाची माहिती येथे देऊ शकता त्या प्रमाणेच जगातील इतर भाषातील ज्ञान मराठी भाषेत आणू शकता.
मराठी विकिपीडिया अद्यापि बाल्यावस्थेत, खरे म्हणजे अर्भकावस्थेत, आहे. आंतरजालाच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेली माहिती आणि ज्ञान ह्यांच्या मानाने सध्याच्या मराठी विकिपीडियामधली माहिती आणि ज्ञान केवळ कणमात्र आहेत. पण हेही खरे की आंतरजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती आणि ज्ञान पोहचवण्याच्या प्रयत्नात मराठी विकिपीडिया खचितच महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही ह्या कामात मदत कराल अशी आम्ही आशा करतो. पुढे वाचा, चर्चा करा, ई मेल यादी
विकिपीडिया समाज
[संपादन]- विकिपीडिया समाज कसा आहे.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर [1]संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता [3]विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
- विकिपीडिया समाज काय नाही.
- आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
- विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
- विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
- विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.